Pune PMC Property Tax | सील केलेल्या व्यावसायिक मिळकतीचा पुणे महापालिका करणार लिलाव!

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

Pune PMC Property Tax | सील केलेल्या व्यावसायिक मिळकतीचा पुणे महापालिका करणार लिलाव! 

 

| मिळकत कर विभागाकडून वसुलीवर जोर 

 
 
Pune PMC Property Tax |  पुणे | पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाकडून (PMC Property tax Department) कर वसुलीवर जोर देण्यात आला आहे. विविध कारणामुळे पुणेकर टॅक्स भरण्याबाबत उदासीन आहेत. त्यामुळे वसुली करण्यासाठी उपाय करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून विभाग प्रमुखांनी खात्यातील 30 विभागीय पेठ निरीक्षकांना (DI) प्रत्येक दिवशी किमान 50 व्यावसायिक मिळकती (Commercial Properties) सील करण्याचे उद्दिष्ट्य दिले आहे. त्यानुसार 16-20 मिळकती सील करण्यात येत आहेत. दरम्यान आता या सील केल्या मिळकतीचा लिलाव केला जाणार आहे. अशी माहिती मिळकतकर विभागाकडून देण्यात आली. (Pune PMC Property Tax)

महापालिकेच्या कर संकलन विभागाला चालू आर्थिक वर्षात 1400 कोटी हुन अधिक उत्पन्न मिळाले आहे. मात्र महापालिका आयुक्तांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात मात्र विभागाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो आहे. कारण समाविष्ट गावांतील नागरिक मिळकतकर भरण्यास टाळाटाळ करत आहेत. तसेच व्यावसायिक मिळकत धारक देखील टॅक्स भरत नाहीत. या नागरिकांना अपेक्षित आहे कि महापालिका अभय योजना राबवेल. मात्र प्रशासनाची अशी कुठलीही भूमिका सध्या दिसून येत नाही. (PMC Pune Property tax Department)

विभाग प्रमुखानी खात्याला जास्तीत जास्त वसूली करण्याबाबत आदेश दिले आहेत. विभागीय निरीक्षक (DI) आणि पेठ निरीक्षक (SI) यांना यासाठी कर्मचारी देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक दिवशी किमान 50 व्यावसायिक मिळकती करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र हे करताना टॅक्स विभागातील कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. नागरिक टॅक्स करण्याबाबत उदासीन दिसताहेत. तसेच काही ठिकाणी कोर्ट केसेस असल्याने अडचणी येत आहेत. तरीही दररोज 15-17 मिळकती सील केल्या जात आहेत. तसेच विभागप्रमुखानी बिल्डर करून भोगवटा पत्र लवकरात लवकर भरून घेण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे काही काळाने का होईना उत्पन्न वाढेल, असा विभागाला विश्वास आहे. (Pune Property tax) 
 
दरम्यान मिळकतकर विभाग आता या सील केलेल्या प्रॉपर्टीचा लिलाव करणार आहे. याआधी महापालिकेने कात्रज भागात लिलाव केला होता. त्यामधून महापालिकेला 4 कोटीहून अधिक उत्पन्न मिळाले होते. त्यानुसार महापालिका या सील केलेल्या मिळकती लिलावासाठी काढणार आहे. त्यातून महापालिकेला चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. असे विभागाकडून सांगण्यात आले. 
—–
 
News Title |