Pune PMC Property Tax | व्यावसायिक मिळकतीच्या लिलावातून पुणे महापालिकेला मिळणार जवळपास 60 कोटींचे उत्पन्न

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

Pune PMC Property Tax | व्यावसायिक मिळकतीच्या  लिलावातून पुणे महापालिकेला मिळणार जवळपास 60 कोटींचे उत्पन्न 

| एकूण 203 मिळकतीचा करण्यात येणार लिलाव 

Pune PMC Property Tax |  पुणे | पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाकडून (PMC Property tax Department) कर वसुलीवर जोर देण्यात आला आहे. विविध कारणामुळे पुणेकर टॅक्स भरण्याबाबत उदासीन आहेत. त्यामुळे वसुली करण्यासाठी उपाय करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून व्यावसायिक मिळकती (Commercial Properties) सील केल्या जात आहेत. त्यापैकी 203 मिळकतीचा लिलाव केला जाणार आहे. याबाबतचे प्रॉपर्टी टॅक्स विभागाचे नियोजन तयार झाले आहे. यामधून पुणे महापालिकेला 60 कोटींचे उत्पन्न मिळेल, अशी माहिती उपायुक्त अजित देशमुख यांनी दिली. (Pune PMC Property Tax) 

महापालिकेच्या कर संकलन विभागाला चालू आर्थिक वर्षात 1400 कोटी हुन अधिक उत्पन्न मिळाले आहे. मात्र महापालिका आयुक्तांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात मात्र विभागाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो आहे. कारण समाविष्ट गावांतील नागरिक मिळकतकर भरण्यास टाळाटाळ करत आहेत. तसेच व्यावसायिक मिळकत धारक देखील टॅक्स भरत नाहीत. विभाग प्रमुखानी खात्याला जास्तीत जास्त वसूली करण्याबाबत आदेश दिले आहेत. विभागीय निरीक्षक (DI) आणि पेठ निरीक्षक (SI) यांना यासाठी कर्मचारी देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक दिवशी किमान 50 व्यावसायिक मिळकती करण्याचे आदेश दिले आहेत. दररोज 15-17 मिळकती सील केल्या जात आहेत. तसेच विभागप्रमुखानी बिल्डर करून भोगवटा पत्र लवकरात लवकर भरून घेण्याचे आदेश दिले आहेत. (Pune Property tax). 

देशमुख यांनी सांगितले कि, दरम्यान मिळकतकर विभाग आता या सील केलेल्या प्रॉपर्टीचा लिलाव करणार आहे. पहिल्या टप्प्यात आम्ही 207 मिळकतीचे नियोजन केले होते. मात्र यातील 4 लोकांनी टॅक्स ची रक्कम जमा केली आहे. त्यामुळे आता 203 मिळकतीचा लिलाव केला जाणार आहे. यातून पुणे महापालिकेला 60 कोटीं इतके उत्पन्न मिळेल. याबाबतची आमची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. 
 

– अशी असेल लिलावाची प्रक्रिया 

 
– अधिपत्र (Warrant) बजावणे 
– 7 दिवसात रक्कम जमा नाही केली तर जप्तीची नोटीस देणे. यासाठी 21 दिवसाची मुदत देणे. 
– त्यानंतर रक्कम नाही भरली तर लिलाव प्रक्रियेसाठी बांधकाम आणि मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून मिळकतीचे मुल्याकंन करणे. 
– ही प्रक्रिया झाल्यानंतर मिळकतीचा लिलाव करणे आणि याबाबत वर्तमानपत्रात जाहीर नोटीस देण्यासाठी महापालिका आयुक्तांची मान्यता घेणे. 
– लिलाव प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना मिळकतीच्या मूल्यांकन रकमेच्या 10% बयाणा रक्कम महापालिकेकडे ऑनलाईन पद्धतीने जमा करावी लागणार आहे. 
 

—–
News Title | Pune PMC Property Tax | The Pune Municipal Corporation will get an income of around 60 crores from the auction of commercial income