Illegal Hoardings : Electric Poles : विद्युत पोल वरील जाहिरात फलक काढा अन्यथा फौजदारी खटला!  : ‘कारभारी’ च्या बातमीनंतर महापालिका प्रशासनाची आक्रमक भूमिका 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

विद्युत पोल वरील जाहिरात फलक काढा अन्यथा फौजदारी खटला! 

 

: ‘कारभारी’ च्या बातमीनंतर महापालिका प्रशासनाची आक्रमक भूमिका 

पुणे : शहरात ठिकठिकाणी आणि विशेष म्हणजे कुठलीही परवानगी नसताना विद्युत पोलवर बॅनर, फ्लेक्स लावले जाताहेत. यावर ना गुन्हे दाखल होताहेत ना दंड वसूल केला जातो. याबाबत ‘कारभारी’ वृत्तसंस्थने आवाज उठवला होता. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने एक जाहीर प्रकटन दिले आहे. ज्यात इशारा दिला आहे की हे फलक काढून टाका शिवाय यापुढे लावल्यास त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल केला जाईल. महापालिकेच्या या इशाऱ्यानंतर आता शहराचे विद्रुपीकरण थांबेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

: मुख्य रस्त्यावरील विद्युत पोल वर फलक

शहरात अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट झाल्याने महापालिका प्रशासनाने यावर कारवाई करण्यासाठी एक अभियान सुरु केले होते. शिवाय महापालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून दंडाची रक्कम वाढवून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. आयुक्तांनी आदेश दिल्याने थोडे दिवस कारवाई केली गेली. मात्र मनुष्यबळाचे कारण देत ही कारवाई थांबवली गेली. शहरात ठिकठिकाणी आणि विशेष म्हणजे कुठलीही परवानगी नसताना विद्युत पोलवर बॅनर, फ्लेक्स लावले जाताहेत. यावर ना गुन्हे दाखल होताहेत ना दंड वसूल केला जातो. उल्लेखनीय बाब म्हणजे नगरसेवकांनी याबाबत तक्रारी करून देखील प्रशासन ढिम्मच होते. प्रशासनाच्या या भूमिकेवरून कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. यावर ‘कारभारी’ ने आवाज उठवला होता. त्यानंतर आता महापालिका प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

: काय आहे जाहीर प्रकटन

विद्युत विभाग पुणे महानगरपालिका तर्फे जाहीर प्रकटन करण्यात येत आहे की पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील पथदिव्यांचा खांबावरून केबल टाकून अनधिकृतपणे व्यवसाय केला जात आहे. तसेच अनधिकृतपणे पथदिव्यांच्या खांबावर जाहिरात फलक व इतर फलक लावले जात असल्याने पुणे शहरातील नागरिकांच्या जीवितास घातक । धोका निर्माण झाला आहे.तसेच या उपरी केबलच्या कामामुळे पुणे मनपाचे पोल /बॅकेट/फिटिंग पडण्याची शक्यता असून पुणे मनपाच्या मालमत्तेचे नुकसान होत आहे.
या सर्व कामांमुळे पुणे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याने अशाप्रकारे अनाधिकृत जाहिरात, इतर फलक तसेच उपरी केबल पुणे मनपाच्या पथदिव्यांच्या खांबावर यापुढे कोणीही लावू नये. अन्यथा त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र महानगरपालिका कायदा १९४९ कलम ३७६(२) आणि महाराष्ट्र मालमत्तेचा विरुपाणास प्रतिबंध करण्याकरता अधिनियम १९९५ कलम २ (बी) मधील तरतुदीनुसार संबंधित व्यक्तीवर दिवाणी अथवा फौजदारी खटला दाखल करण्यात येईल.
पुणे शहरातील नागरिकांनी विद्युत पोल व फिटिंग संबंधित कोणते असुरक्षितता सदृश्य परिस्थिती आढळल्यास अथवा दिवा बंद असल्यास खालील संपर्क दूरध्वनी वर तक्रार नोंदवावी.
संपर्कासाठी टोल फ्री क्रमांक(P.M.C. Care)- १८०० १०३० २२२ (वॉट्स अॅप नं.) – ९६८९९००००२

Leave a Reply