Chief Auditor objection | ‘उज्वल  प्रकाशात’, ‘महापालिका अंधारात!’ | टाटा प्रोजेक्ट्स च्या उज्वल कंपनी कडून पुणे मनपाचे आर्थिक नुकसान | मुख्य लेखापरीक्षकांनी आक्षेप काढत कंपनी कडून  १५ कोटी वसूल करण्याचे दिले आदेश | विद्युत विभागाचा हलगर्जीपणा कारणीभूत

Categories
Breaking News PMC पुणे

‘उज्वल  प्रकाशात’, ‘महापालिका अंधारात!’

| टाटा प्रोजेक्ट्स च्या उज्वल कंपनी कडून पुणे मनपाचे आर्थिक नुकसान

| मुख्य लेखापरीक्षकांनी आक्षेप काढत कंपनी कडून  १५ कोटी वसूल करण्याचे दिले आदेश

| विद्युत विभागाचा हलगर्जीपणा कारणीभूत

पुणे | पुणे शहरातील पथ दिव्यांच्या माध्यमातून वीज बचत करण्यासाठी महापालिकेकडून प्रकल्प राबवण्यात येत आहे. हे काम टाटा प्रोजेक्ट्स च्या उज्वल कंपनीला देण्यात आले आहे. मात्र कंपनी कडून महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे प्रकाशात आले आहे. याबाबत महापालिकेच्या मुख्य लेखापारीक्षकानी जोरदार आक्षेप काढले आहेत. तसेच कंपनी कडून त्याबदल्यात १५ कोटी वसूल करण्याचे आदेश देखील मुख्य लेखापरीक्षकांनी विद्युत विभागाला दिले आहेत.
वास्तविक पाहता हे काम विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांचे असताना देखील मुख्य लेखापरीक्षकांनी ही बाब उघडकीस आणली आहे. विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे हे नुकसान झाले आहे. आता मात्र उशिरा जाग आलेल्या विद्युत विभागाने तात्काळ उज्वल कंपनीला पत्र लिहित ही रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत. जमा नाही केले तर आम्ही बिलातून वसूल करून घेऊ, असा इशारा देखील विद्युत विभागाने दिला आहे.
महापालिकेच्या विद्युत विभाग मार्फत २०१० सालापासून शहरात एलईडी पथदिवे उभारण्यात आले आहेत. रस्त्यावरील प्रकाशासाठी एलईडी पथदिवे उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले होते कारण यामुळे उर्जा बचत होत होती. त्यानुसार इस्को तत्वावर टेंडर काढण्यात आले होते. यामध्ये पथदिवे सहित प्रत्येक फिडर स्काडा सिस्टीम च्या अंतर्गत बसवण्याचा कामाचा समावेश होता. त्यानुसार हे काम टाटा प्रोजेक्ट्स च्या उज्वल कंपनीला देण्यात आले. कंपनीला कामानुसार रनिंग बिले देखील देण्यात येऊ लागली. आतापर्यंत ११८ कोटींची बिले देखील देण्यात आली. मात्र कंपनी प्रत्यक्ष जागेवर बसवलेल्या फिटिंग नुसार बिले न देता वाढीव बिले देत असल्याचे समोर आले आहे. ही बाब मुख्य लेखापरीक्षक यांनी निदर्शनास आणून दिली.
मुख्य लेखापरीक्षकांनी काढलेल्या आक्षेपानुसार रनिंग बिलामध्ये T५ फिटिंग चे ५६ watt चे consumption equivalent sodium ७० watt म्हणजे ८३.५१ watt घेण्यात आले आहे. तसेच T५ ४*२४ फिटिंग चे ९६ watt चे onsumption equivalent sodium १५० watt म्हणजे १८०.८४ watt घेण्यात आले आहे. त्यामुळे वीज बचती मध्ये वाढ होऊन ठेकेदारास देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ झाली आहे. त्यामुळे पुणे मनपाचे आर्थिक नुकसान होत आहे.
आक्षेपानुसार प्रत्यक्ष जागेवर बसविलेल्या फिटिंगच्या Wattage नुसार देय्यके अदा होणे अपेक्षित आहे. सर्व बिलांसाठी एनर्जी सेहिंग काढण्यासाठी T-५ फिटिंगचे ५६watt चे consumption equivalent sodium ७०watt म्हणजे ८३.५१watt घेण्याऐवजी actual wattege प्रमाणे म्हणजेच ५६watt तसेच ८ lux घेऊन तसेच T५ (४*२४) फिटिंगचे ९६watt चे consumption equivalent sodium १५०watt म्हणजे १८०.८४ watt घेण्याऐवजी actual wattege प्रमाणे म्हणजेच ९६watt तसेच वरील
तक्त्यानुसार १५ lux घेऊन एनर्जी सेहिंग काढणे अपेक्षित आहे.  T-५ फिटिंगसाठी IS standards प्रमाणे lux level, रस्त्याची रुंदी, पोलची उंची, पोलमधील अंतर या बाबी विचारात घेऊन Joint Survey करून equivalent sodium घेणे अपेक्षित आहे. ज्या ठिकाणी T-५
फिटिंग्जचे आवश्यक lux मिळत नाही फक्त याच T-५ साठी जॉईंट सर्वे रिपोर्ट वरून equivalent sodium घेणे अपेक्षित आहे, सर्व T-५ साठी नाही असे या अटी व शर्ती नुसार दिसून येते. परंतु या ठिकाणी सर्वच T-५
Fitting चे Without Survey जास्त Wattege equivalent म्हणून घेऊन ज्यादा बिल देण्यात आलेला आहे. त्यामुळे बिलांची वसुलपात्र रक्कम काढण्यात आली आहे.

तसेच विद्युत विभागाने ११/१०/२०२१ पासून वेळोवेळी जॉईंट सर्वे रिपोर्ट विभागाकडे सादर करण्यासाठी तोंडी तसेच लेखी मागणी करून सुद्धा आज तागायत आपण या विभागाकडे जॉईंट सर्वे रिपोर्ट दिलेला नाही. सदर रिपोर्ट बाबत अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) व मा. महापालिका आयुक्त यांनी सुद्धा प्रत्येक बैठकीत सूचना केलेले आहे. त्यामुळे जॉईंट सर्वे रिपोर्ट नसताना आपणास बिल क्रमांक ९ ते ७२ जे जादा वीजबचतीचे बिल अदा करण्यात आले.  ते निविदा अटी व शर्तीमधील तक्तानुसार T-5 फिटिंगचे Equivalent घेऊन वीजबचतीचे बिल देणे अपेक्षित असताना तसे न दिल्याचे मुख्य लेखापरीक्षक यांचे तपासणीअंती दिसून आलेले असून तसे कागदपत्रांवरूनही स्पष्ट होत आहे. म्हणून  सहमहापालिका आयुक्त तथा मुख्य लेखापरीक्षक पुणे मनपा यांनी  १०,५६,८५,६०५.७७/ रक्कम वसूल करण्यास सूचना केल्या आहेत.

त्याचप्रमाणे लेखापरीक्षक यांनी दुसरा आक्षेप काढला आहे. त्यानुसार कंपनी कडून स्काडा सिस्टीम चालू केली नसतानाही काही बिले विद्युत विभागाकडून अदा करण्यात आली आहेत. टेंडर मधील अटीनुसार बिल अदा करण्यासाठी स्काडा consumption रिपोर्ट आवश्यक आहे. मात्र हा रिपोर्ट नसताना देखील बिल अदा केले गेले. त्यामुळे अदा केले गेलेल्या बिलापैकी ५ कोटी ४४ लाख कंपनी कडून वसूल करावेत. असे एकूण १५ कोटी उज्वल कंपनी कडून वसूल करण्याचे आदेश मुख्य लेखापरीक्षकांनी विद्युत विभागाला दिले आहेत.

याला विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. वास्तविक पाहता हे काम विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांचे असताना देखील मुख्य लेखापरीक्षकांनी ही बाब उघडकीस आणली आहे. विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे हे नुकसान झाले आहे. आता मात्र उशिरा जाग आलेल्या विद्युत विभागाने तात्काळ उज्वल कंपनीला पत्र लिहित ही रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत. जमा नाही केले तर आम्ही बिलातून वसूल करून घेऊ, असा इशारा देखील विद्युत विभागाने दिला आहे. यावर आता उज्वल कंपनीची काय भूमिका असेल, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Illegal Hoardings : अनधिकृत होर्डिंग वरून अतिरिक्त आयुक्त, विभाग प्रमुख धारेवर  : महापालिका आयुक्तांनी शहर साफ करण्याचे दिले आदेश 

Categories
Breaking News PMC पुणे

अनधिकृत होर्डिंग वरून अतिरिक्त आयुक्त, विभाग प्रमुख धारेवर

: महापालिका आयुक्तांनी शहर साफ करण्याचे दिले आदेश

पुणे : शहरात अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट झाल्याने महापालिका प्रशासनाने यावर कारवाई करण्यासाठी एक अभियान सुरु केले होते. शिवाय महापालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून दंडाची रक्कम वाढवून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. आयुक्तांनी आदेश दिल्याने थोडे दिवस कारवाई केली गेली. मात्र मनुष्यबळाचे कारण देत ही कारवाई थांबवली गेली. शहरात ठिकठिकाणी आणि विशेष म्हणजे कुठलीही परवानगी नसताना विद्युत पोलवर बॅनर, फ्लेक्स लावले जाताहेत. यावर ना गुन्हे दाखल होताहेत ना दंड वसूल केला जातो. यावरून आता महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी अतिरिक्त आयुक्त आणि विभाग प्रमुख यांचा चांगलाच क्लास घेतला. शिवाय कारवाई करून शहर साफ ठेवण्याचे देखील निर्देश दिले. दरम्यान आयुक्तांच्या या आदेशानंतर आकाशचिन्ह विभागाने तात्काळ कारवाई करण्यास सुरवात केली आहे. विशेष म्हणजे अभय दिले गेलेल्या विद्युत पोलवरील फ्लेक्स काढण्यास सुरुवात झाली आहे.
शहरात ठिकठिकाणी आणि विशेष म्हणजे कुठलीही परवानगी नसताना विद्युत पोलवर(light pole)  बॅनर, फ्लेक्स(Banner, felx) लावले जाताहेत. यावर ना गुन्हे दाखल होताहेत ना दंड वसूल केला जातो. याबाबत ‘कारभारी’ वृत्तसंस्थने आवाज उठवला होता. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने(pmc civic body) एक जाहीर प्रकटन दिले होते. ज्यात इशारा दिला होता की हे फलक काढून टाका शिवाय यापुढे लावल्यास त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल केला जाईल. महापालिकेच्या या इशाऱ्यानंतर आता शहराचे विद्रुपीकरण थांबेल, असा विश्वास व्यक्त केला जात होता. तरीही जाहिरात फलकाचे मालक हे फलक काढून घेत नाहीत.

: मुख्य रस्त्यावरील विद्युत पोल वर फलक

शहरात अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट झाल्याने महापालिका प्रशासनाने यावर कारवाई करण्यासाठी एक अभियान सुरु केले होते. शिवाय महापालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून दंडाची रक्कम वाढवून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. आयुक्तांनी आदेश दिल्याने थोडे दिवस कारवाई केली गेली. मात्र मनुष्यबळाचे कारण देत ही कारवाई थांबवली गेली. शहरात ठिकठिकाणी आणि विशेष म्हणजे कुठलीही परवानगी नसताना विद्युत पोलवर बॅनर, फ्लेक्स लावले जाताहेत. यावर ना गुन्हे दाखल होताहेत ना दंड वसूल केला जातो. उल्लेखनीय बाब म्हणजे नगरसेवकांनी याबाबत तक्रारी करून देखील प्रशासन ढिम्मच होते. प्रशासनाच्या या भूमिकेवरून कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. त्यानंतर प्रशासनाने जाहीर प्रकटन दिले होते. तरीही कारवाई करण्यात आली नव्हती. यावरून आता महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी अतिरिक्त आयुक्त आणि आकाशचिन्ह विभागाचे विभाग प्रमुख यांचा चांगलाच क्लास घेतला. शिवाय कारवाई करून शहर साफ ठेवण्याचे देखील निर्देश दिले. दरम्यान आयुक्तांच्या या आदेशानंतर आकाशचिन्ह विभागाने तात्काळ कारवाई करण्यास सुरवात केली आहे. विशेष म्हणजे अभय दिले गेलेल्या विद्युत पोलवरील फ्लेक्स काढण्यास सुरुवात झाली आहे.

Illegal Hoardings : Electric Poles : विद्युत पोल वरील जाहिरात फलक काढा अन्यथा फौजदारी खटला!  : ‘कारभारी’ च्या बातमीनंतर महापालिका प्रशासनाची आक्रमक भूमिका 

Categories
Breaking News PMC पुणे

विद्युत पोल वरील जाहिरात फलक काढा अन्यथा फौजदारी खटला! 

 

: ‘कारभारी’ च्या बातमीनंतर महापालिका प्रशासनाची आक्रमक भूमिका 

पुणे : शहरात ठिकठिकाणी आणि विशेष म्हणजे कुठलीही परवानगी नसताना विद्युत पोलवर बॅनर, फ्लेक्स लावले जाताहेत. यावर ना गुन्हे दाखल होताहेत ना दंड वसूल केला जातो. याबाबत ‘कारभारी’ वृत्तसंस्थने आवाज उठवला होता. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने एक जाहीर प्रकटन दिले आहे. ज्यात इशारा दिला आहे की हे फलक काढून टाका शिवाय यापुढे लावल्यास त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल केला जाईल. महापालिकेच्या या इशाऱ्यानंतर आता शहराचे विद्रुपीकरण थांबेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

: मुख्य रस्त्यावरील विद्युत पोल वर फलक

शहरात अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट झाल्याने महापालिका प्रशासनाने यावर कारवाई करण्यासाठी एक अभियान सुरु केले होते. शिवाय महापालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून दंडाची रक्कम वाढवून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. आयुक्तांनी आदेश दिल्याने थोडे दिवस कारवाई केली गेली. मात्र मनुष्यबळाचे कारण देत ही कारवाई थांबवली गेली. शहरात ठिकठिकाणी आणि विशेष म्हणजे कुठलीही परवानगी नसताना विद्युत पोलवर बॅनर, फ्लेक्स लावले जाताहेत. यावर ना गुन्हे दाखल होताहेत ना दंड वसूल केला जातो. उल्लेखनीय बाब म्हणजे नगरसेवकांनी याबाबत तक्रारी करून देखील प्रशासन ढिम्मच होते. प्रशासनाच्या या भूमिकेवरून कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. यावर ‘कारभारी’ ने आवाज उठवला होता. त्यानंतर आता महापालिका प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

: काय आहे जाहीर प्रकटन

विद्युत विभाग पुणे महानगरपालिका तर्फे जाहीर प्रकटन करण्यात येत आहे की पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील पथदिव्यांचा खांबावरून केबल टाकून अनधिकृतपणे व्यवसाय केला जात आहे. तसेच अनधिकृतपणे पथदिव्यांच्या खांबावर जाहिरात फलक व इतर फलक लावले जात असल्याने पुणे शहरातील नागरिकांच्या जीवितास घातक । धोका निर्माण झाला आहे.तसेच या उपरी केबलच्या कामामुळे पुणे मनपाचे पोल /बॅकेट/फिटिंग पडण्याची शक्यता असून पुणे मनपाच्या मालमत्तेचे नुकसान होत आहे.
या सर्व कामांमुळे पुणे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याने अशाप्रकारे अनाधिकृत जाहिरात, इतर फलक तसेच उपरी केबल पुणे मनपाच्या पथदिव्यांच्या खांबावर यापुढे कोणीही लावू नये. अन्यथा त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र महानगरपालिका कायदा १९४९ कलम ३७६(२) आणि महाराष्ट्र मालमत्तेचा विरुपाणास प्रतिबंध करण्याकरता अधिनियम १९९५ कलम २ (बी) मधील तरतुदीनुसार संबंधित व्यक्तीवर दिवाणी अथवा फौजदारी खटला दाखल करण्यात येईल.
पुणे शहरातील नागरिकांनी विद्युत पोल व फिटिंग संबंधित कोणते असुरक्षितता सदृश्य परिस्थिती आढळल्यास अथवा दिवा बंद असल्यास खालील संपर्क दूरध्वनी वर तक्रार नोंदवावी.
संपर्कासाठी टोल फ्री क्रमांक(P.M.C. Care)- १८०० १०३० २२२ (वॉट्स अॅप नं.) – ९६८९९००००२