Senior Citizens Health | शामाप्रसाद मुखर्जी ज्येष्ठ नागरीक मोफत तपासणी पूर्ववत करा | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे आयुक्‍तांना निवेदन

Categories
Breaking News PMC Political social आरोग्य पुणे
Spread the love

शामाप्रसाद  मुखर्जी ज्येष्ठ नागरीक मोफत तपासणी पूर्ववत करा

| माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे आयुक्‍तांना निवेदन

| 2023-24 या आर्थिक वर्षात निधीची तरतूद करण्याची केली मागणी

 

ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या शामाप्रसाद मुखर्जी ज्येष्ठ नागरीक मोफत तपासणी योजनेला यंदाच्या महापालिका अर्थसंकल्पात तरतूद केली नाही. परिणामी आरोग्य तपासणीसाठी मोठा आर्थिक बुर्दंड ज्येष्ठांना बसणार आहे. खासगी रुग्णालय, संस्थांमध्ये जाऊन तपासणी करण्याचा खर्च पेलवणार नाही. परिणामी ज्येष्ठांच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होईल. हे टाळण्यासाठी शामाप्रसाद मुखर्जी ज्येष्ठ नागरीक मोफत तपासणी योजना पुर्ववत करा, अशी मागणी पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आयुक्‍त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे. तसेच 2023-24 या वर्षाच्या महापालिका अर्थसंकल्पात या योजनेच्या निधीची देखील तरतूद करण्याची मागणी डॉ. धेंडे यांनी केली आहे.

डॉ. धेंडे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पुणे शहर हे ज्येष्ठ नागरीकांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. सध्याच्या महागाईच्या काळामध्ये या ज्येष्ठ नागरीकांना स्वतःचे आरोग्य निरोगी करण्याकरीता आरोग्याच्या तपासणीवरसाठी मोठा खर्च करावा लागत आहे. खासगी रुग्णालयातील आरोग्य तपासणी महाग झालेल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांना सातत्याने आरोग्य तपासण्या कराव्या लागत आहेत. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनीच्या तपासण्या व इतर आजारांकरीता रक्तांमधील तपासण्या, एक्‍स-रे, सोनोग्राफी व काही विशीष्ट तपासण्या आदींचा समावेश आहे.

गेल्या वर्षी सुमारे 30 हजार ज्येष्ठ नागरीकांनी शामाप्रसाद मुखर्जी ज्येष्ठ नागरीक मोफत तपासणीचा लाभ घेतला होता. त्याकरीता क्रस्ना डायग्नोस्टिक लिमिटेड या खासगी संस्थेला निधी उपलब्ध करून दिला होता. परंतू यावर्षी 2023-2024 च्या अंदाजपत्रकामध्ये निधी उपलब्ध केलेला नाही. त्यामुळे या ज्येष्ठ नागरीकांना आर्थिक बुदंड सोसावा लागत आहे.

त्यामुळे तात्काळ संबंधित आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरीकांच्या आरोग्य तपासण्याकरीता ज्येष्ठ नागरीकांकडून पैसे न घेता निधी मंजूर करून द्यावा. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय टळणार आहे. या बाबत सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावा. योजनेला निधी मंजूर केल्यास ज्येष्ठ नागरिकांमधून समाधानाची भावना व्यक्‍त केली जाईल, असे डॉ. धेंडे म्हणाले.
————————-