Promotion committee | PMC pune | पदोन्नतीने टॅक्स विभागात येण्यासाठी समितीची बैठक होण्याआधीच जोरदार लॉबिंग!  | प्रशासन अधिकारी व अधीक्षक होण्यासाठी बरेच इच्छुक 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

पदोन्नतीने टॅक्स विभागात येण्यासाठी समितीची बैठक होण्याआधीच जोरदार लॉबिंग!

| प्रशासन अधिकारी व अधीक्षक होण्यासाठी बरेच इच्छुक

पुणे | महापालिकेतील कर आकारणी तसेच बांधकाम विभागात जाण्यासाठी बरेच महापालिका कर्मचारी फिल्डिंग लावून असतात. यासाठी पदोन्नती समिती बैठकीकडे कर्मचारी डोळे लावून बसलेले असतात. महापालिका प्रशासनाकडून शुक्रवारी पदोन्नती समिती बैठक आयोजित केली आहे. यामध्ये प्रशासन अधिकारी आणि अधीक्षक पदासाठी देखील बढती दिली जाणार आहे. खास करून टॅक्स विभागात प्रशासन अधिकारी आणि अधीक्षक पदावर येण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरु आहे. पदोन्नती समिती बैठक होण्याआधीच ही फिल्डिंग सुरु असल्याने महापालिकेत याबाबत जोरदार  चर्चा सुरु आहे.
अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशानुसार सामान्य प्रशासन विभागाने पदोन्नती समितीची बैठक शुक्रवारी आयोजित केली आहे. 11 वाजलेपासून 6 वाजेपर्यंत हे काम चालणार आहेz  यामध्ये विविध विभागातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जाणार आहे. मात्र यातील प्रशासन अधिकारी आणि अधीक्षक पदासाठी होणारी पदोन्नती विशेष चर्चेत आहे. कारण कर आकारणी आणि कर संकलन विभागात अधीक्षक आणि प्रशासन अधिकाऱ्याच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे इथे येण्यासाठी कर्मचाऱ्यांनी जोरदार लॉबिंग सुरु केली आहे. काही लोकांची नावे देखील अंतिम झाल्याची चर्चा आहे.
नुकतीच अतिरिक्त आयुक्तांनी टॅक्स विभागातील 3 अधीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामुळे तेथील जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी इथे येण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. अशा परिस्थितीत आता प्रशासन नेमकी कुणाला संधी देणार? लॉबिंग करून ज्यांची नावे अंतिम झाली त्यांना कि इतर विभागातील कर्मचाऱ्यांना, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.