PMC Pune Assistant Health Officer | राजेश दिघे यांना सहायक आरोग्य अधिकारी पदी  पदोन्नती

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

PMC Pune Assistant Health Officer | राजेश दिघे यांना सहायक आरोग्य अधिकारी पदी  पदोन्नती

| महापालिका आयुक्तांनी जारी केले आदेश

PMC Pune Assistant Health Officer | (Author: Ganesh Mule) महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकाऱ्याचे एक पद रिक्त आहे. त्यानुसार पदोन्नतीने (Promotion) हे पद भरले जाणार होते. वैद्यकीय अधिकारी राजेश दिघे (Rajesh Dighe) यांना सहायक आरोग्य अधिकारी पदावर पदोन्नती देण्याबाबत बढती समितीच्या बैठकीत (pmc promotion committee) निर्णय घेण्यात आला. त्यानुसार याबाबतचा प्रस्ताव महिला बाल कल्याण समितीच्या  (Women and children welfare committee) माध्यमातून  मुख्य सभेसमोर (PMC General Body) ठेवण्यात आला होता. याला मंजुरी मिळाल्यानंतर आता महापालिका आयुक्तांनी दिघे यांना सहायक आरोग्य अधिकारी पदी रुजू होण्याचे आदेश (PMC commissioner order) दिले आहेत. (PMC pune assistant health officer)

पुणे महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम २०१४ नुसार सहाय्यक आरोग्य अधिकारी या पदाच्या मंजूर पदांपैकी ३ पदे नामनिर्देशनाने/सरळसेवेने व ४ पदे वैद्यकिय अधिकारी / निवासी वैद्यकिय अधिकारी या संवर्गातून पदोन्नतीने भरणेची तरतुद करण्यात आलेली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) सुधारित आकृतीबंधानुसार सहाय्यक आरोग्य अधिकारी या संवर्गाची एकूण ७ पदे मंजूर करण्यात आलेली असून ५ पदे आरोग्य विभागाकरिता व २ पदे घनकचरा व्यवस्थापन विभागाकरिता मंजूर करण्यात आलेली आहेत. नामनिर्देशनाने / सरळसेवेने मंजूर करण्यात आलेल्या ३ पदांपैकी २ पदे यापुर्वी भरलेली असून सद्यस्थितीत १ पद रिक्त आहे. तसेच पदोन्नतीसाठी मंजूर करण्यात आलेल्या ४ पदांपैकी ३ पदे (तात्पुरत्या/ तदर्थ पदोन्नतीने) भरलेली असून सद्यस्थितीत १ पद रिक्त होते. (Pmc Pune news)

यासाठी वैद्यकीय अधिकारी राजेश दिघे हे पात्र ठरत होते. त्यानुसार बढती समितीने दिघे यांना सहायक आरोग्य अधिकारी करण्याबाबत निर्णय घेतला आहे. त्याला महिला बाल कल्याण समितीच्या माध्यमातून मुख्य सभेची मान्यता मिळणे आवश्यक आहे. त्यानुसार हा प्रस्ताव मान्यतेसाठी  ठेवण्यात आला होता. मंजुरी मिळाल्यानंतर आता महापालिका आयुक्तांनी दिघे यांना सहायक आरोग्य अधिकारी पदी रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. (Pune Municipal Corporation News)
—-
News Title | PMC Pune Assistant Health Officer | To Rajesh Dighe Promotion to the post of Assistant Health Officer | The order was issued by the Municipal Commissioner

PMC Pune Water Supply Department | पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंता पदी कुणाची वर्णी लागणार?

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune Water Supply Department | पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंता पदी कुणाची वर्णी लागणार?

: प्रशासनाकडून मुख्य अभियंता पदासाठीची पदोन्नतीची प्रक्रिया सुरु

PMC Pune Water Supply Department | (Author: Ganesh Mule) | पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता (Water Supply department Chief Engineer) पद हे गेल्या काही महिन्यापासून रिक्त आहे. सद्यस्थितीत प्रभारी म्हणून अधिक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर (Superintendent Engineer Anirudh Pawaskar) हे काम पाहत आहेत. दरम्यान महापालिका प्रशासनाने (Pune civic body) हे पद भरण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. सेवाज्येष्ठतेने (seniority) पदोन्नतीच्या (Promotion) माध्यामातून हे पद भरले जाणार आहे. यासाठी महापालिकेतील तीन अधिक्षक अभियंता पात्र होत आहेत. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे प्रकरण तयार केले असून लवकरच ते महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील पदोन्नती समितीच्या बैठकी (Promotion Committee) समोर ठेवले जाणार आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आली. (PMC Pune Water supply department)

: गोपनीय अहवालामुळे अडकली होती पदोन्नती

पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता म्हणून वी जी कुलकर्णी (chief engineer V G Kulkarni) काम पाहत होते. मात्र त्यांची बदली पथ विभागाचे मुख्य अभियंता पदी झाली. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. या पदावर सद्यस्थितीत अधिक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर हे काम पाहत आहेत. मुख्य अभियंता हे पद पदोन्नतीने भरण्यात येणार आहे. त्यासाठी सेवाज्येष्ठता हा निकष लागू होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने मागील वर्षी जून महिन्यात पदोन्नतीची प्रक्रिया सुरु केली होती.  नंतर काही तांत्रिक कारणाने ऑगस्ट महिन्यापर्यंत  वेळ वाढवून देण्यात आला. पुन्हा ही मुदत 31 मार्च पर्यंत वाढवून देण्यात आली. कारण काही अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल (Confidential Report) मिळाले नाहीत. गोपनीय अहवालामुळे याला उशीर झाला. त्यानंतर आता प्रशासनाने प्रक्रिया सुरु केली आहे. (PMC Pune Chief engineer)
सामान्य प्रशासन विभागाच्या माहितीनुसार पदोन्नतीच्या माध्यमातून यासाठी तीन अधिकारी पात्र होत आहेत. त्यात अधिक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर (Anirudh Pawaskar) , अधिक्षक अभियंता युवराज देशमुख (Yuvraj Deshmukh) आणि अधिक्षक अभियंता नंदकिशोर जगताप (Nandkishor Jagtap) यांचा समावेश आहे. प्रशासनाने हे प्रकरण तयार केले असून लवकरच आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील पदोन्नती समिती बैठकीत हे प्रकरण ठेवले जाणार आहे. त्यानुसार हे पद भरले जाणार आहे. (PMC Pune water supply department chief engineer) 
—-
News Title | PMC Pune Water Supply Department |  Who will be appointed as Chief Engineer of Water Supply Department? :  The promotion process for the post of Chief Engineer has been started by the administration

Promotion committee | PMC pune | पदोन्नतीने टॅक्स विभागात येण्यासाठी समितीची बैठक होण्याआधीच जोरदार लॉबिंग!  | प्रशासन अधिकारी व अधीक्षक होण्यासाठी बरेच इच्छुक 

Categories
Breaking News PMC पुणे

पदोन्नतीने टॅक्स विभागात येण्यासाठी समितीची बैठक होण्याआधीच जोरदार लॉबिंग!

| प्रशासन अधिकारी व अधीक्षक होण्यासाठी बरेच इच्छुक

पुणे | महापालिकेतील कर आकारणी तसेच बांधकाम विभागात जाण्यासाठी बरेच महापालिका कर्मचारी फिल्डिंग लावून असतात. यासाठी पदोन्नती समिती बैठकीकडे कर्मचारी डोळे लावून बसलेले असतात. महापालिका प्रशासनाकडून शुक्रवारी पदोन्नती समिती बैठक आयोजित केली आहे. यामध्ये प्रशासन अधिकारी आणि अधीक्षक पदासाठी देखील बढती दिली जाणार आहे. खास करून टॅक्स विभागात प्रशासन अधिकारी आणि अधीक्षक पदावर येण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरु आहे. पदोन्नती समिती बैठक होण्याआधीच ही फिल्डिंग सुरु असल्याने महापालिकेत याबाबत जोरदार  चर्चा सुरु आहे.
अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशानुसार सामान्य प्रशासन विभागाने पदोन्नती समितीची बैठक शुक्रवारी आयोजित केली आहे. 11 वाजलेपासून 6 वाजेपर्यंत हे काम चालणार आहेz  यामध्ये विविध विभागातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जाणार आहे. मात्र यातील प्रशासन अधिकारी आणि अधीक्षक पदासाठी होणारी पदोन्नती विशेष चर्चेत आहे. कारण कर आकारणी आणि कर संकलन विभागात अधीक्षक आणि प्रशासन अधिकाऱ्याच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे इथे येण्यासाठी कर्मचाऱ्यांनी जोरदार लॉबिंग सुरु केली आहे. काही लोकांची नावे देखील अंतिम झाल्याची चर्चा आहे.
नुकतीच अतिरिक्त आयुक्तांनी टॅक्स विभागातील 3 अधीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामुळे तेथील जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी इथे येण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. अशा परिस्थितीत आता प्रशासन नेमकी कुणाला संधी देणार? लॉबिंग करून ज्यांची नावे अंतिम झाली त्यांना कि इतर विभागातील कर्मचाऱ्यांना, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.