Chandrkant Patil | शहीद जवानाच्या मुलांना शिक्षणासाठी चंद्रकांत पाटील यांच्याकडून 5 लाखाची मदत

Categories
Breaking News Political social पुणे

शहीद जवानाच्या मुलांना शिक्षणासाठी चंद्रकांत पाटील यांच्याकडून 5 लाखाची मदत

| तुषार पाटील व अर्चना पाटील यांनी घरी जाऊन कुटुंबियांना दिला चेक

| भवानी पेठ भागातील शहिद वीर जवान कै. दिलीप ओझरकर (Dilip Ozarkar) यांच्या तेरावा विधीनिमित्त पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी उपस्थित राहत श्रद्धांजली अर्पण केली. त्यावेळी या या वीर जवानाच्या कुटुंबाला पाहून भावना अनावर होऊन दादांनी तत्क्षणी त्यांना मदत करण्याची घोषणा केली होती. या दिलेल्या शब्दानुसार दादांनी भाजपतर्फे या शहीद जवानांच्या दोन्ही चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी ५ लाख रुपयांचा धनादेश आज भाजप पुणे शहर उपाध्यक्ष तुषार पाटील व मा. स्थायी समिती सदस्य अर्चना पाटील यांच्या मार्फत कुटुंबीयांना दिला.


देशासाठी बलिदान दिलेली व्यक्ती जरी परत येणार नसली तरी, त्याच्या कुटुंबीयांना मदतीचा दिलेला हा हात आयुष्य थोडेफार सुकर करेल. यावेळी शहीद कुटुंबातील जवानाची पत्नी, त्यांचे चिमुकली मुले आणि आई वडील उपस्थित होते. तसेच त्यावेळी स्थानिक गणपती मंडळाचे अध्यक्ष नीलेश राऊत, उमेश यादव, संध्या पवार दिनेश रासकर, राहुल मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

दादांच्या या कृतीमुळे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्ष देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या मागे ठामपणे उभा असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली.

Mahatma Phule Memorial Bhavani Peth |  महात्मा फुले स्मारक परिसरात झालेली अस्वच्छता व असामाजिक तत्वांचा उच्छाद तातडीने बंद करा

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Mahatma Phule Memorial Bhavani Peth |  महात्मा फुले स्मारक परिसरात झालेली अस्वच्छता व असामाजिक तत्वांचा उच्छाद तातडीने बंद करा

| शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी

 

Mahatma Phule Memorial Bhavani Peth |भवानी पेठेतील महात्मा फुले स्मारकाच्या (Mahatma Phule Memorial Bhavani Peth) परिसरात झालेली अस्वच्छता व असामाजिक तत्वांचा उच्छाद तातडीने बंद करण्याची मागणी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांनी महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे केली आहे.

याबाबत भानगिरे यांनी महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले आहे. त्यानुसार स्त्री  शिक्षणाचा जागर करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai phule) स्मारकाच्या परिसरात अस्वच्छता पसरली आहे. स्मारकाच्या अनुषंगाने त्यांचे विविध विचार समाजात रुजू करण्याचे मोठे कार्य सुरू असताना गेल्या काही दिवसापासून भवानी पेठ येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात अस्वच्छता तसेच काही असामाजिक तत्वे सामाजिक सलोखा बिघडावा या उद्देश्याने तेथे मोठ्या प्रमाणावर बाटल्यांचा खच, दुर्गंधीचे साम्राज्य आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक हे विद्येचे व ज्ञानाचे आदान प्रदान करणारे ज्ञानमंदिर ठरावे यासाठी पुणे महानगरपालिका (Pune municipal Corporation) सातत्याने प्रयत्नरत असली पाहिजे. या पत्राद्वारे आम्ही विनंती करतो की तात्काळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात यावा तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने तिथे सुरक्षा रक्षक नेमून त्या परिसरात कोणतेही असमाजिक तत्वे सक्रिय होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. स्मारकाच्या परिसरात जानार्जन करण्यासाठी विद्यार्थ्याना पुस्तके व अभ्यासिकेची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी, आम्ही पुन्हा आपणांस विनंती करतो की स्मारकाच्या परिसरात असामाजिक तत्वे सक्रिय होऊ नये, यासाठी आपण तातडीने कारवाई करावी. असे भानगिरे यांनी म्हटले आहे.


 

News Title | Immediately stop the unsanitary and anti-social elements in the Mahatma Phule memorial area | Shiv Sena city chief Pramod Nana Bhangire’s demand to Municipal Commissioner