Tushar Patil BJP | सिनरजी इमारतीच्या बांधकामात विकसकाने अनियमितता केली असल्याची तुषार पाटील यांची तक्रार
| महापालिका शहर अभियंता यांच्याकडे कारवाईची केली मागणी
याबाबत पाटील यांनी शहर अभियंता यांना पत्र दिले आहे. त्यानुसार सॅलसबरी पार्क येथे सिनरजी या इमारतीचे बांधकाम करण्यात आलेले आहे. इमारतीचे बांधकाम हे बांधकाम करण्याच्या परवानगी दाखल्याप्रमाणे प्रत्यक्षात करण्यात आलेले आहे का ? तसेच सदरील इमारतीचे बांधकाम सुरु असताना त्याचे वेळोवेळी प्लिंथ चेकींग करण्यात आलेली आहे. तसेच सदर इमारतीचे बांधकाम पुर्णत्वाचा दाखला पुणे मनपामार्फत देण्यात आलेला आहे का ? त्याप्रमाणे प्रत्यक्ष जागेवार बांधकाम करण्यात आलेले आहे का ? याची स्थळ पाहणी अहवाल घेण्यात आलेला आहे का ? जर बांधकाम करण्याच्या परवान्याप्रमाणे बांधकाम केले गेले नसल्यास संबंधितांवर आजतागात काय कारवाई करण्यात आलेली आहे का? अशी माहिती मागितली आहे.
तसेच सदर गळकतीचे बांधकाम करणेकरिता एकूण किती एफ.एस.आय. मंजूर आहे ? व बांधकामाकरिता किती टी. डी. आर. वापरण्यात आलेला आहे ? त्याप्रमाणे प्रत्यक्षात बांधकाम करण्यात आलेले आहे का ? आणि जर मंजूर एफ. एस. आय. पेक्षा जास्त बांधकाम करण्यात आलेले असल्यास आजतागात संबंधितांवर कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे ? त्याचप्रमाणे जर बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतला असल्यास, सदनिकेच्या बांधकामामध्ये कोणत्या निकषान्वये बदल करण्यास परवानगी देता येते ? जर बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतल्यानंतर सदनिकेमध्ये नियमबाहय बदल केले असल्यास त्यावर कारवाई का करण्यात आलेली नाही ? तसेच सदर संपूर्ण मिळकतीची फायर ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आलेले आहे का ? तसेच फायर सेफ्टी ऑडिट करण्यात आले आहे का ? त्याप्रमाणे प्रत्यक्ष जागेवर फायर विभागाने स्थळ पाहणी केलेली आहे का ? जर प्रत्यक्ष मिळकतीमध्ये मोकळ्या जागेवर अनाधिकृत मॅकेनिकल पार्किंग उभारले असल्यास व त्यामुळे सदर मिळकतीमध्ये भविष्यात जर आग लागण्याची दुर्घटना घडल्यास प्रत्यक्ष जागेवर आगीचा बंब पोहचण्यास अडचण निर्माण होवून कोणतिही मोठी जीवीतहानी झाल्यास त्यास जबाबदार कोण ? असे प्रश्न पाटील यांनी उपस्थित केले आहेत.