Devendra Fadnavis in Pune | Jagdish Mulik | देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुणे भाजप शहर अध्यक्षांचे तोंड भरून कौतुक 

Categories
Breaking News Political पुणे

Devendra Fadnavis in Pune | Jagdish Mulik | देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुणे भाजप शहर अध्यक्षांचे तोंड भरून कौतुक

Devendra Fadnavis in Pune | Jagdish Mulik | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी फडणवीस यांनी भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांचे तोंड भरून कौतुक केले. फडणवीसांनी केलेल्या या कौतुकाने अजून काही वर्ष तरी अध्यक्ष मुळीकच राहणार हे स्पष्ट होत आहे. (Devendra Fadnavis in Pune)
भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी फडणवीस यांनी मुळीक यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
फडणवीस म्हणाले, जगदीश हा खूप शांत स्वभावाचा माणूस आहे. त्याला फक्त काम करणे एवढेच माहित आहे. शांत असला तरी लोकांशी प्रेमाने बोलणे, लोकांशी चांगले संबंध ठेवणे, हे जगदीशला चांगले जमते. फडणवीस पुढे म्हणाले, जगदीश माझ्याकडे कधीही वैयक्तिक कामासाठी येत नाही. तो येतो तो लोकांच्याच कामासाठी. लोकांशी चांगला संपर्क असलेला नेता हा जगदीश आहे.
मागील काही दिवसापूर्वी शहरात भाजप शहर अध्यक्ष यांच्या बदलण्याच्या वावड्या उठल्या होत्या. काही काळाने त्या शांत देखील झाल्या. मात्र आता फडणवीस यांच्या कौतुकाच्या वर्षावाने पुढील काही वर्ष तरी मुळीकच अध्यक्ष राहणार, हे स्पष्ट होत आहे.
—–
News Title | Devendra Fadnavis in Pune | Jagdish Mulik Devendra Fadnavis praises Pune BJP city president

BJPs Ghar Ghar Chalo Sampark Abhiyan in pune | भाजपाच्या घर चलो संपर्क अभियानाचा पुण्यात शुभारंभ 

Categories
Breaking News Political पुणे

BJPs Ghar Ghar Chalo Sampark Abhiyan in pune | भाजपाच्या घर चलो संपर्क अभियानाचा पुण्यात शुभारंभ

| कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मोदीजींचे विकासकार्य जनतेपर्यंत पोहचवावे

| उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आवाहन

 

BJPs Ghar Ghar Chalo Samprak Abhiyan in pune | Devendra Fadnvis In pune |देशाचे लोकप्रिय पंतप्रधान  नरेंद्र मोदीजी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात गत नऊ वर्षांचा कार्यकाळ हा विकासपर्वचा काळ राहिला आहे. त्यामुळे  मोदीजींच्या नेतृत्वातील विकासपर्वचे काम कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जनतेपर्यंत पोहचवावे असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी केले. तसेच कर्नाटकच्या विजयावर आनंद व्यक्त करणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे, असा टोलाही यावेळी विरोधकांना लगावला. (BJPs Ghar Ghar Chalo Sampark abhiyan in pune)

भारतीय जनता पक्षाच्या ‘घर चलो’ या संपर्क अभियानाचा शुभारंभ आणि भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (BJP pune city president Jagdish Mulik) यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि पालकमंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नामदार फडणवीस बोलत होते. (Devendra Fadnavis in Pune)

यावेळी व्यासपीठावर आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे,राहुल कुल, सिद्धर्थ शिरोळे,भीमराव तापकीर, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, मेधा कुलकर्णी, बापू पठारे, प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी,राजेश पांडे, चिटणीस वर्षा डहाळे यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नामदार देवेंद्रजी फडणवीस म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताने सर्वाधिक गतीने विकास केला. कोरोना काळानंतर अनेक देश मंदीच्या सावटाखाली आहेत. पण आपला देश विकासाच्या वाटेवर आजही मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे विकसित देश देखील आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहात आहे. आज माननीय मोदीजींचे नेतृत्व जगमान्य झाले आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे देखील माननीय मोदीजींशी बोलण्यासाठी आतूर असतात. त्यामुळे मोदीजींच्या नेतृत्वातील विकासपर्वचे काम कार्यकर्त्यांनी सर्वांपर्यंत पोहोचविले पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ते पुढे म्हणाले की, आज कर्नाटक निवडणुकीतील विजयावर विरोधक आनंदोत्सव साजरा करत आहेत. बेगामी शादी में अब्दुल दिवाना अशी स्थिती आहे. आज विरोधकांनी कितीही आनंदोत्सव साजरा केला तरी आगामी लोकसभा निवडणुकीत २८ पैकी २५ जागांवर भारतीय जनता पक्ष नक्कीच विजय होईल. वास्तविक, विरोधकांनी आत्मचिंतन केले पाहिजे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत अर्धा टक्का ही मतं मिळू शकली नाहीत. असा टोला ही त्यांनी यावेळी लगावला.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्यांचे मूल्यमापन नेहमीच होत असते. कोरोना काळात भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरून काम करत होता. त्यामुळे जगदीश मुळीक यांनी असेच आपले कार्य सातत्याने सुरू ठेवावे अशी सूचना केली. तसेच घर चलो संपर्क अभियानाद्वारे कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी ओबीसी आघाडीचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी ही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केले.‌तर स्वागत गणेश घोष यांनी केले.

News Title |BJPs Ghar Ghar Chalo Sampark Abhiyan in Pune BJP’s Ghar Chalo Sampark campaign launched in Pune

Sharad Pawar | Kasba | कसबा जिंकण्याची आम्हांला अपेक्षा नव्हती | शरद पवार

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

कसबा जिंकण्याची आम्हांला अपेक्षा नव्हती | शरद पवार

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पुण्यातील शिवाजीनगरातील मोदी बाग येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी रवींद्र धंगेकरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी १० हजार ९४० मतांनी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला. कसबा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होताच धंगेकर यांनी केसरीवाडा येथील मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानी जाऊन टिळक कुटुंबीयांची भेट घेतली होती. तसेच त्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते विद्यमान खासदार गिरीश बापट यांचीदेखील दोन दिवसांपूर्वी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली होती. यावेळी गिरीश बापट यांनी धंगेकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या होत्या.

गेल्या काही दिवसांपासून पुणे-मुंबईसह महाराष्ट्रात कसबा पोटनिवडणुकीची चर्चा चालू आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी ११ हजाराहून जास्त मतांनी भाजपाच्या हेमंत रासने यांचा पराभव केला. त्यामुळे २८ वर्षांपासून भाजपाच्या हातात असणारा हा मतदारसंघ काँग्रेसनं जिंकला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून भाजपावर टीका केली जात असताना भाजपाकडूनही त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. यावर आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका मांडली आहे. तसेच, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला आहे.

यावेळी बोलताना शरद पवारांनी आपल्या स्वत:लाच कसबा निवडणूक जिंकण्याची अपेक्षा नव्हती, असं म्हटलं आहे. “तो भाजपाचा गड आहे असं बोललं जात होतं. तिथे अनेक वर्षं गिरीश बापटांनी प्रतिनिधित्व केलं होतं. पुण्यातील बिगर भाजपा वर्गाशी मैत्रीचे संबंध हे बापटांचं वैशिष्ट होतं. त्यामुळे त्यांचं वर्चस्व असलेला मतदारसंघ आपल्याला जड जाईल असा आमचा अंदाज होता. पण शेवटी शेवटी त्यांनी बापटांच्या सल्ल्याने निर्णय घेतले की नाही याची कुजबुज ऐकायला मिळाली. त्यामुळे बापटांना किंवा टिळकांना डावलून घेतलेल्या निर्णयांचा फटका बसेल आणि त्याचा फायदा होईल असा अंदाज होता”, असं शरद पवार म्हणाले.

Devendra Fadnavis | MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आणि संजय राऊत यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

Categories
Breaking News Education Political social पुणे महाराष्ट्र

 MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आणि संजय राऊत यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

वर्णनात्मक परीक्षा पद्धत २०२५ पासून लागू करावी याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला. मात्र, अद्याप महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे साेमवारी २० राेजी एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले. झाशीची राणी लक्ष्मीबाई चाैकात एकत्र जमून त्यांनी धरणे आंदाेलन केले. जाे पर्यंत एमपीएससी वर्णनात्मक परीक्षेबाबत निर्णय घेणार नाही ताेपर्यंत आमरण उपाेषणाला सुरुवात केली आहे. यासंदर्भात राज्य सरकार सातत्याने पाठपुरावा करत असून. त्यांनी जर री कन्सिडर केला नाही तर राज्य सरकारला न्यायालयात जाण्याचा विचार करावा लागेल असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

फडणवीस म्हणाले, एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागणीबाबत राज्य सरकारने तत्परतेने निर्णय घेऊन आयोगाला कळवलं होतं. एमपीएससी ही स्वायत्त संस्था आहे त्याला डायरेक्ट आदेश देऊ शकत नाही. एमपीएससी ने राज्य सरकारला कळवले असून आपला प्रस्ताव आम्ही फुल कोरम समोर ठेवला. फुल कोरमने ही सांगितलं की नवीन पॅटर्न यावर्षीच लागू केला पाहिजे. याला मुख्यमंत्र्यांनी त्वरित उत्तर देऊन हे मान्य होणार नाही असे सांगितले.

 विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणार 

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये निराशा तयार होत आहे. त्यामुळे थोडासा वेळ दिला पाहिजे. कोणाचाही विरोध नवीन पॅटर्नला नाही. 2025 पासून लागू करा हीच मागणी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा त्यांना सांगितले असून तुमचा निर्णय रीकन्सिडर करा. यासंदर्भात राज्य सरकार सातत्याने पाठपुरावा करत असून. त्यांनी जर री कन्सिडर केला नाही तर राज्य सरकारला न्यायालयात जाण्याचा विचार करावा लागेल. आम्हाला शेवटी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहावे लागेल. त्यांना निराश करून चालणार नाही ते उद्याचं भविष्य आहेत. त्यासाठी जे जे लागेल ते करू माझी फक्त एक विनंती आहे कोणीही यात राजकारण आणू नये. विद्यार्थी हिताचे निर्णय सर्वांना घ्यावे लागतील.

अशा निर्बुद्ध लोकांना मी काय उत्तर देऊ’ | देवेंद्र फडणवीस

 धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत २००० कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले”, असं म्हणत संजय राऊत गंभीर आरोप केला आहे. यावरून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचा समाचार घेतला. अशा निर्बुद्ध लोकांना मी काय उत्तर देऊ असं फडणवीस यावेळी म्हणाले आहेत. ते पुण्यात बोलत होते.

राऊत यांनी बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील असा इशारा दिला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. माझी खात्रीची माहिती आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते. असं राऊत यांनी म्हटलं आहे. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे. तर आज फडणवीस  यांनी राऊतांवर निशाण साधला.

फडणवीस म्हणाले, राजकारणात माणूस कधी वर तर कधी खाली जातो. आणि इतक निराश होऊन मनात येईल ते बोलायचं यातून त्यांच्या बुद्धीची लोकं किंव करतात. त्यांच्या बोलण्याने काही परिणाम होत नाही. संजय राऊत निर्बुद्धपणे बोलतात. अशा निर्बुद्ध लोकांना मी काय उत्तर देऊ असं सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.