LED fittings | PMC | महापालिका घेणार 27500 LED फिटिंग!  | 20 कोटीपर्यंतच्या खर्चाला इस्टिमेट कमिटीची मान्यता 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिका घेणार 27500 LED फिटिंग!

| 20 कोटीपर्यंतच्या खर्चाला इस्टिमेट कमिटीची मान्यता

पुणे | महापालिकेच्या विद्युत विभागाकडून 27 हजार 500 LED फिटिंग ची खरेदी केली जाणार आहे. शहरात वेगवगळ्या ठिकाणी हे फिटिंग लावले जाणार आहेत. यासाठी 20 कोटी पर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी टेंडर प्रक्रिया केली जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच इस्टिमेट कमिटीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. अशी माहिती विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांनी दिली.
महापालिकेने गेल्या काही वर्षांपासून पथदिव्यासाठी LED फिटिंग लावणे सुरु केली आहे. ऊर्जा बचत करण्यासाठी हे फिटिंग लावले जातात. शिवाय केंद्र सरकारने देखील याबाबतचे धोरण आखले होते. मात्र काही कालावधीनंतर हे फिटिंग बदलणे गरजेचे असते. त्यानुसार महापालिका 27500 नवीन LED फिटिंग खरेदी करणार आहे.  यामध्ये 36 watt led fitting – 16000,  तर 65 watt led fitting – 10500 चा समावेश आहे. यासाठी 20 कोटी पर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. याबाबतचा प्रस्ताव विद्युत विभागाकडून इस्टिमेट कमिटीसमोर ठेवण्यात आलेला होता. याला कमिटीने मान्यता दिली आहे.
दरम्यान ही खरेदी करण्यासाठी विद्युत विभागाकडून टेंडर प्रक्रिया राबवणार आहे. या आधी EESL या सरकारी कंपनीकडून ही खरेदी केली जात होती. सरकारने याबाबत परिपत्रक काढले होते. त्यामुळे महापालिकेवर हे बंधन होते. यावेळी मात्र महापालिका टेंडर प्रक्रिया करणार आहे. यासाठी देखील इस्टिमेट कमिटीने मान्यता दिली आहे. असे कंदूल यांनी सांगितले.