PMC Pune Digital Services | पुणे महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीच्या डिजिटल सेवांनी जी-२० बैठकीसाठी आलेले प्रतिनिधी प्रभावित

Categories
Breaking News PMC देश/विदेश पुणे

PMC Pune Digital Services | पुणे महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीच्या डिजिटल सेवांनी जी-२० बैठकीसाठी आलेले प्रतिनिधी प्रभावित

PMC Pune Digital Services | पुणे स्मार्ट सिटी (Pune Smart City) आणि पुणे महानगरपालिकेतर्फे (Pune Municipal Corporation) नागरिकांसाठी माहिती तंत्रज्ञानावर (IT) आधारित विविध उपयोजक, संकेतस्थळ आणि ऑनलाईन सुविधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जी-२० बैठकीसाठी बैठकीसाठी (G 20 Summit in Pune) आलेल्या प्रतिनिधींसमोर याचे सादरीकरण करण्यात आले. टांझानिया (Tanzaniya) , केनिया (Kenyia) , सिएरा लिओन (Siara Leone)व अन्य देशांच्या प्रतिनिधींनी औत्सुक्याने या प्रकल्पांची माहिती घेतली आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे कौतुक केले. त्यांच्या देशातही नागरिकांसाठी सुविधा देणारे माहिती तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प राबविण्याचा मनोदय व्यक्त केला. असे पुणे महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख राहुल जगताप (PMC IT Deparment Head Rahul Jagtap) यांनी सांगितले. (PMC Pune Digital Services)

 

जी-२० डिजिटल अर्थव्यवस्था (G 20 Digital Economy Working Group) कार्यगट बैठकीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल जे डब्ल्यू मेरिएट येथे केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत आयोजित प्रदर्शनाला बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी भेट देऊन विविध दालनांची माहिती घेतली. भारतातील डिजीटल सेवांबाबत विशेष रुची दाखवताना डिजिटल सामर्थ्याचे दर्शन घडविणारे हे प्रदर्शन पाहून परदेशी प्रतिनिधी प्रभावित झाले.

भारतातील डिजीटल प्रगतीसंदर्भात यावेळी सदस्यांनी माहिती घेतली आणि विविध नाविन्यपूर्ण उपक्रमात विशेष रुची दाखवली. जागतिक पातळीवर तांत्रिकदृष्ट्या मागे असलेल्या देशांना भारताने नेहमीच सहकार्य केले असल्यामुळे येणाऱ्या काळात भारताकडून प्रगत डिजिटल तंत्रज्ञान मिळण्याची अपेक्षा आहे. भारतात डिजीटल सार्वजनिक पायाभूत सुविधांविषयी (DPI – Digital Public Infrastructure) अनेक चांगले उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रदर्शनात आधार, युपीआय प्रणाली, डिजीलॉकर, उमंग उपयोजक, शैक्षणिक उपयोगी दीक्षा उपयोजक व संकेतस्थळ, भाषिनी उपयोजक व संकेतस्थळ, ई-संजीवनी राष्ट्रीय टेलीमेडीसीन प्रणाली, सहकारी कृषी पणन बाजारपेठ जोडणीचा ई-नाम प्रकल्प आणि सॉईल हेल्थ कार्ड, ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी), डीजीटल प्लॅटफॉर्मबाबत माहितीपूर्ण दालनांतून या प्रकल्पांची माहिती प्रतिनिधींनी उत्सुकतेने घेतली.

आधार, भाषिणी ॲपबाबत विशेष रुची

रुग्णांना दूरध्वनीवर किंवा ऑनलाईन वैद्यकीय सल्ला देण्यासंदर्भातील ई-संजीवनी योजनेबाबत माहिती देणाऱ्या दालनाला सुरीनाम आणि सिएरा लिओनच्या प्रतिनिधींनी भेट दिली. ऑनलाईन पद्धतीने या सेवेचा लाभ घेण्याबाबतची प्रक्रीया त्यांनी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून जाणून घेतली. युपीआय व आधार ओळख प्रणालीच्या उपक्रमाची माहिती प्रतिनिधींनी बारकाईने जाणून घेतली. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव अल्केश कुमार शर्मा यांनी माहिती दिली. भारतातील ‘भाषिणी’ ॲप हे अत्यंत नाविन्यपूर्ण असून सर्वांसाठी सहज उपलब्ध असा हा शब्दकोष असल्याची प्रतिक्रिया सुरीनामच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.

पुणे शहर व राज्याच्या इतर भागातील नागरिकांनीदेखील प्रदर्शनाला भेट देऊन माहिती घेतली. विशेषत: उमंग आणि भाषिणी ॲपचे भेट देणाऱ्यांना विशेष आकर्षण होते.


News Title |PMC Pune Digital Services | Pune Municipal Corporation and smart city’s digital services impressed delegates for G-20 meeting

G 20 Summit in Pune | जी-२० डिजीटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या बैठकीसाठी रविवारी ५० प्रतिनिधींचे आगमन

Categories
Breaking News Commerce cultural social देश/विदेश पुणे

G 20 Summit in Pune | जी-२० डिजीटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या बैठकीसाठी रविवारी ५० प्रतिनिधींचे आगमन

| प्रशासनातर्फे पारंपरिक पद्धतीने स्वागत

G 20 Summit in Pune | पुणे येथे १२ ते १४ जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या डिजीटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या (G 20 Digital Economy Working Group) बैठकीत सहभागी होण्यासाठी  विविध देशांच्या सुमारे ५० प्रतिनिधींचे रविवारी सायंकाळपर्यंत लोहगाव विमानतळावर आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्व प्रतिनिधीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. (G 20 Summit in Pune)
            आगमन झालेल्या  प्रतिनिधींमधे ऑस्ट्रेलिया, केनिया, श्रीलंका, ओमान, नायजेरिया, सिंगापूर, इंडोनेशिया, रशिया, मॉरीशस, इंग्लंड, लाओस या देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर वित्तीय विकास आणि अर्थव्यवस्थेला स्थिरता देण्यासाठी महत्वाच्या असलेल्या जागतिक संस्थांच्या प्रतिनिधींचाही  यात  समावेश आहे. (G 20 Summit)!
            आगमनप्रसंगी जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रतिनिधींचे पुणेरी पगडी घालून आणि शाल देऊन स्वागत करण्यात आले. ढोल ताशाच्या गजरात आणि तूतारीच्या निनादात पारंपरिक पद्धतीने पाहुण्यांचे स्वागत करतांना खास महाराष्ट्राच्या संस्कृतीचेही पाहुण्यांना दर्शन घडविण्यात आले.  स्वागतासाठी पुणे महानगरपालिका उपायुक्त डॉ.चेतना केरुरे, राजशिष्टाचार विभागाचे उपजिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार उपस्थित होते.
            बैठकीसाठी येणाऱ्या विविध देशांच्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी प्रशासनाने जय्यत तयारी तयारी केली आहे. भरजरी पोशाखात ढोल ताशा पथक, तूतारी वादाक ठेवण्यात आले आहे. जी-२० परिषदेसाठी निश्चित करण्यात आलेल्या ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेचे आणि स्वागतपर संदेशाचे फलक सर्वत्र प्रदर्शित करण्यात आले आहे.

*’नमस्ते इंडिया’म्हणून पाहुण्यांचा प्रतिसाद*
            आगमन झालेल्या प्रतिनिधींचे ‘अतिथी देवो भव:’ या संकल्पनेवर महाराष्ट्रीय संस्कृतीने स्वागत करताना त्यामागचा हेतू विषद केला असता, स्वागताने भारावलेल्या प्रतिनिधींनी उत्साहात आणि मोठ्या आवाजात ‘नमस्ते इंडिया’ असा प्रतिसाद देऊन आपला आनंद व्यक्त केला. आगमनाप्रसंगी झालेल्या अनोख्या पद्धतीच्या स्वागतामुळे प्रतिनिधींच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
*केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांचे आगमन*
 ‘डिजीटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुप’च्या बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांचे पुणे येथे आज सायंकाळी आगमन झाले. याप्रसंगी प्रशासनाच्यावतीने त्यांचे पुणेरी पगडी, शाल देऊन स्वागत करण्यात आले.
०००
News title | G20 Summit in Pune |  50 delegates arrived on Sunday for the G-20 Digital Economy Working Group meeting