NCP Youth | Girish Gurnani | पालखी मार्गाच्या पाहणी बाबत राष्ट्रवादी युवक चे अतिरिक्त आयुक्तांना निवेदन

Categories
Breaking News cultural PMC Political पुणे

पालखी मार्गाच्या पाहणी बाबत राष्ट्रवादी युवक चे अतिरिक्त आयुक्तांना निवेदन

आगामी आषाढी वारी सोहळ्या निमित्त पालखी चे प्रस्थान लवकरच पुण्यात होणार आहे. याच अनुषंगाने वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी काळजी घ्यावी व वेळ असता उपाययोजना कराव्यात असे निवेदन राष्ट्रवादी युवक चे कोथरूड चे अध्यक्ष .गिरीश गुरूनानी यांनी आज अतिरिक्त आयुक्त कार्यालयात कुणाल खेमणार साहेब यांच्याकडे दिले.

पालखी मार्गाची पाहणी करून अडथळा आणि धोकादायक वृक्षांची छाटणी, फिरती शौचालये, औषधांची फवारणी, पिण्याचे स्वच्छ पाणी, उघड्या चेंबर्स ना झाकण बसवणे तसेच अग्निशमन वाहने ही पुरवावित अश्या अनेक योजनांबद्दल गुरुनानी यांनी मा. अतिरिक्त आयुक्त यांच्या बरोबर चर्चा केली. अतिरिक्त आयुक्तांनी ही या वेळी सर्व निवेदन लक्षात घेऊन त्यावर नक्कीच उपाय केले जातील असे आश्वासन ही दिले.

कोरोना रुग्णांची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता त्या वर ही ठोस उपाय व्हायला हवेत असे मत ही आयुक्तां समोर मांडण्यात आले. पालखी सोबत वैद्यकीय पथक व औषध व्यवस्थाही असावी अशी मागणी ही या वेळी करण्यात आली. तसेच वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये अथवा कोणताही अडथळा निर्माण होऊ नये याच विचारातून आयुक्तांची भेट घेण्यात आल्याचे गुरूनानी यांनी माध्यमांशी बोलत असताना सांगितले.

या वेळी राष्ट्रवादी युवकचे मोहित बराटे,केदार कुलकर्णी,ऋषिकेश शिंदे,अजिंक्य साळुंखे,कृष्ण पुजारी आदि कार्यकर्ते उपस्थिती होते.

Kothrud : Girish Gurnani : पावसाळ्यापूर्वी कोथरूडमधील सर्व कामे पूर्ण करावीत : गिरीश गुरनानी यांची मागणी

Categories
PMC पुणे

पावसाळ्यापूर्वी कोथरूडमधील सर्व कामे पूर्ण करावीत

: कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांची मागणी

पुणे : पावसाळा सुरू होण्यास काही महिनेच उरले आहेत. प्रत्येक वर्षी पावसामुळे कोठे ना कोठे मोठे नुकसान होत असते. याचीच दक्षता म्हणून कोथरूडमध्ये पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करावीत. मागच्याचवर्षी काही झोपडपट्ट्यामध्ये पाणी शिरले, काही भागात झाडे पडली, फलक उन्मळून पडली, उघड्या डींपीमध्ये पाणी शिरले, अशा भरपूर गोष्टींमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले, असे निवेदन कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी कोथरूड क्षेत्रिय अधिकारी केदार वझे यांना यावेळी दिले.

निवेदनात नमूद केल्यानुसार, गेल्यावर्षीप्रमाणे यावषी ही परिस्थिती येऊ नये यासाठी आपण पावसात पाणी तुंबणाऱ्या भागांची पाहणी करावी, चेंबर साफ करावी, पूरनियंत्रण परिस्थिती हाताळण्यासाठी विभागांनी अंतर्गत समन्वय ठेवावा. पावसाळ्यात गटारे तुबुंन घाणीचे साम्राज्य पसरले जाते, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो त्याकडे लक्ष दिले पाहिजे, तसेच मान्सून पूर्व नियंत्रण उपाययोजनांशी स॔ब॔धित कामे प्राधान्याने पार पाडावीत, इ. सर्व कामे जर पावसाळ्यापूर्वी पूर्ण केल्यास नागरिकांना होणाऱ्या मोठ्या त्रासातून मुक्तता होईल.

यावेळी राष्ट्रवादी युवक चे शशांक काळभोर, सौरभ ससाणे,संकेत शिंदे आदि उपस्थित होते.

NCP Youth Kothrud : अंध विद्यार्थिनींना उपयोगी साहित्याचे वाटप करत प्रशांत जगताप यांचा वाढदिवस साजरा : राष्ट्रवादी युवक काँग्रेस, कोथरूड विधानसभा मतदार संघाचा उपक्रम 

Categories
cultural Political पुणे

अंध विद्यार्थिनींना उपयोगी साहित्याचे वाटप करत प्रशांत जगताप यांचा वाढदिवस साजरा

: राष्ट्रवादी युवक काँग्रेस, कोथरूड विधानसभा मतदार संघाचा उपक्रम

राष्ट्रवादी युवक काँग्रेस, कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या वतीने ‘द पूना स्कुल ऑफ ब्लाइंड गर्ल्स’ (कोथरूड) च्या 95 अंध विद्यार्थिनींना उपयोगी साहित्याचे वाटप ,भोजन कार्यक्रम आणि फळ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत दादा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष मा प्रशांत दादा जगताप यांनी शाळेतील अंध विध्यार्थींसमवेत केक कापून वाढदिवस साजरा केला.

प्रशांत दादा जगताप यावेळी बोलताना म्हणाले, ‘या उपक्रमाच्या माध्यमातून वेगळाच आनंद आणि समाधान मिळाले. जेवणाचा आनंद घेताना अंध विद्यर्थिनींच्या चेहऱ्यावरील आनंद मनाला समाधान देणारा होता’.तसेच माझ्या वाढदिवसाचा हा अतिशय अविस्मरणीय क्षण म्हणून माझ्या नेहमी स्मरणात राहील

‘समाजात जनजागृती निर्माण करणे आणि सामाजिक उपक्रमातून मदत करणे हा हेतू या उपक्रमाचा होता’ असे ‘राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे कोथरूड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरुनानी म्हणाले.

या वेळी शहर युवक अध्यक्ष मा.किशोर कांबळे, मिलिंद वालवडकर,केदार कुलकर्णी,शेखर तांबे,सौरभ ससाणे,ओंकार शिंदे,सुनील हरळे,किशोर भगत,मधुकर भगत, ऋषिकेश शिंदे,श्रीकांत भालगरे,ऋषिकेश कडू,अजु शेख,आदी सहकारी उपस्थित होते.

NCP Youth : राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे डहाणूकर कॉलनी आणि वनदेवी चौकात २ शाखांचे उद्घाटन

Categories
Political पुणे

राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे डहाणूकर कॉलनी आणि वनदेवी चौकात २ शाखांचे उद्घाटन

राष्ट्रवादी परिवार संवाद… पर्व ५, पश्चिम महाराष्ट्र यात्रेचे कोथरूड कर्वेनगर येथे आगमन झाले. या निमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या वतीने २ शाखेंचे भव्य उद्घाटन करण्यायत आले. डहाणूकर कॉलनी आणि वनदेवी चौकात या शाखांचे उद्घाटन आज पार पडले. या शाखांचे उद्घाटन रविकांत जी वरपे, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश व किशोर कांबळे,अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला हजेरी लावून युवांनी व इतर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला आहे. डहाणूकर कॉलनी आणि वनदेवी चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्याचे काम या शाखांच्या माध्यमातून होणार असल्याची खात्री असल्याचे कोथरूड युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी दिली.

कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष  गिरीश गुरुनानी कार्याध्यक्ष मोहित बराटे आणि उपाध्यक्ष किशोर जी भगत यांनी संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनाची धुरा सांभाळली होती.

याप्रसंगी मिलिंद वालवडकर ,अमोल गायकवाड, मधुकर भगत, अजू शेख, ओमकार शिंदे, राहुल बोडके, सुनील हरळे, वैभव कोठुळे, शशांक काळभोर,ऋषिकेश शिंदे,केदार कुलकर्णी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

NCP Yuvak : Karvenagar : कर्वेनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करणार : गिरीश गुरनानी

Categories
Political पुणे

कर्वेनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करणार : गिरीश गुरनानी

राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे कर्वेनगर परिसरामध्ये २ शाखांचे  उद्घाटन

पुणे : कर्वे नगर येथील प्रभाग क्रमांक ३६ मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या २ शाखांचे भव्य उद्घाटन आज पार पडले. कॅनल रोड चौक कमिन्स कॉलेज जवळ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या दोन ठिकाणी स्थित असलेल्या या शाखांचे उद्घाटन  हर्षवर्धन मानकर,अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड व किशोर कांबळे,अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला हजेरी लावून युवांनी व इतर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. कर्वेनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्याचे काम या शाखांच्या माध्यमातून होणार असल्याची खात्री असल्याचे कोथरूड युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी म्हणले.

यावेळी स्थानिक युवा नेते स्वप्निल दुधाने म्हणाले की येत्या १५ दिवसात कर्वेनगर परिसरामध्ये आणखीन १५ नवीन शाखांचे भव्य उद्घाटन करणार असल्याचे शब्द त्यांनी कोथरूड युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांना दिले

कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष  गिरीश गुरनानी आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे उपाध्यक्ष श्री. स्वप्नील दुधाने यांनी संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनाची धुरा सांभाळली होती.


याप्रसंगी शहर युवक कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर, बंडु शेठ तांबे, संतोष बराटे, रेश्माताई बराटे, पल्लवीताई शेडगे, निलेश शिंदे, धनंजय पायगुडे, समीर बराटे, मोहित बराटे, किशोर शेडगे, मधुकर भगत, वैभव कोठुळे, पुष्कर भिलारे, तेजस भागवत, श्रीकांत बालघरे, ऋषिकेश कडू, विजय बाबर, आशिष शिंदे, लखन सौदागर, शशांक काळभोर,अमोल गायकवाड,मंगेश भोंडवे,प्रीतम पायगुडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Traffic problem in Kothrud : Youth NCP : कोथरूड मधील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी युवक राष्ट्रवादी चे पोलिसांना साकडे

Categories
Breaking News Political social पुणे

कोथरूड मधील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी युवक राष्ट्रवादी चे पोलिसांना साकडे

पुणे : कोथरूड मधील गुजरात कॉलोनी व आझाद नगर परिसरातील रहिवासी व व्यापारी यांच्या तक्रारींना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस ने पुढाकार घेतला. वाहतुक कोंडी फोडण्यासाठी युवक राष्ट्रवादीने  पोलिसांना साकडे घातले असून समस्या सोडवण्याची मागणी करण्यात  आली आहे.

अनियंत्रित आणि अनियमित वाहतुकी बद्दलच्या तक्रारी येथील रहिवासी यांनी कोथरूड युवक राष्ट्रवादी चे अध्यक्ष गिरीश गुरूनानी यांच्या कडे मांडल्या होत्या. नो पार्किंग मध्ये गाड्या लावणे, पी १, पी २ चे आखलेल्या धोरणानुसार पालन न करणे, रस्त्याच्या कडेलाच चार चाकी गाड्या लावून खरेदी साठी दुकान मध्ये जाणे अश्या अनेक चिंता व त्या मुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून येथील लोकांनी शेवटी युवक राष्ट्रवादी कडे धाव घेतली. या बाबींमुळे पादचाऱ्यांना अतोनात त्रास तर सहन करावाच लागतो पण त्याचसोबत त्यांच्या असुरक्षिततेची टांगती तलवार ही असते. असे या लोकांनी आज गुरूनानी यांना सांगितले. या समस्यांवर त्वरित उपाय म्हणून आज कोथरूड वाहतूक पोलीस विभागातील पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांची भेट घेऊन गुरूनानी यांनी निवेदन दिले.

पायगुडे यांनी तत्काळ कारवाई करण्याची हमी यावेळी युवक राष्ट्रवादी व कोथरूड वासियांना दिलेली आहे. या वेळी माध्यमांशी बोलत असताना गुरूनानी म्हणाले “पोलिसांनी आम्हाला ही समस्या त्वरित सोडवण्याची हमी दिलेली आहे आणि मी आशा करतो की तसेच होईल व या परिसरातील अनियंत्रित वाहतुकीची कोंडी सुटून येथील रस्ता व पादचाऱ्यांबरोबरच येथील रहिवासी व व्यापारी देखील मोकळा श्वास घेऊन येथे वावरू शकतील.”

Girish Gurnani : कोथरूड राष्ट्रवादी युवकचा अनोखा सामाजिक उपक्रम : विशेष मुलांसाठी रंगपंचमी, होळी कार्यक्रमाचे आयोजन 

Categories
Political social पुणे

कोथरूड राष्ट्रवादी युवकचा अनोखा सामाजिक उपक्रम

: विशेष मुलांसाठी रंगपंचमी, होळी कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : रंगपंचमी,होळीच्या निमित्ताने बावधन स्थित अनिकेत सेवाभावी संस्था संचलित मतिमंद मुलामुलींचे निवासी पुनर्वसन प्रकल्प येथे कोथरूड राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने विशेष कार्यक्रम राबवण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदार संघ अध्यक्ष  गिरीश गुरनानी व त्याच्या सहकाऱ्यांनी या विशेष मुलांसाठी नाश्त्याचे आयोजन केले व त्यांच्यासोबत रंगपंचमीचे अनेक रंग उधळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. चिमुकल्यांसोबत हे युवा कार्यकर्तेही मग्न होऊन सण साजरा करत असल्याचे या वेळी बघायला मिळाले.

युवाशक्ती च्या सहाय्याने आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या सर्व युवा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मदतीने त्यांचे अध्यक्ष गिरीश गुरनानी वेळोवेळी असे कार्यक्रम आयोजित करत असतात. समाजसेवेचे अविरत व्रत या सर्व युवांनी घेतले असल्याचे या सर्व कार्यक्रमांमधून दिसून येते. या मुलांच्या निरागस आनंदात हरवून गेल्याचे आणि त्यांच्या हर्शोल्हासाने होळी या सणाचा उत्साह द्विगुणित झाल्याचे गुरनानी यांनी या प्रसंगी सांगितले.

सदर कार्यक्रमास कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी युवक चे अमोल गायकवाड, सुनील हरळे, ओमकार शिंदे, सौरभ ससाणे, ऋषिकेश शिंदे आदि कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.