NCP Youth Kothrud | सुप्रिया सुळे यांच्याबद्दल चुकीचे विधान केल्याबद्दल कोथरूड युवक राष्ट्रवादी ची अब्दुल सत्तर यांच्या विरोधात पोलिसात तक्रार

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

सुप्रिया सुळे यांच्याबद्दल चुकीचे विधान केल्याबद्दल कोथरूड युवक राष्ट्रवादी ची अब्दुल सत्तर यांच्या विरोधात पोलिसात तक्रार

पुणे येथील कोथरूड पोलिस स्टेशन मध्ये आज कोथरूड युवक राष्ट्रवादी अध्यक्ष गिरीष गुरनानी यांनी शिंदे गटातील कॅबिनेट मंत्री अब्दुलसत्तार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना भिकारचोट अशी गलिच्छ भाशा वापरून मा सुप्रिया ताई सुळे यांचा अपमान केला आहे. अशी गलिच्छ भाषा वापरल्यामुळे नागरिकांमध्ये तसेच कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व तेढ निर्माण करण्याचे काम कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेले आहे असे #गुरनानी यांनी सांगितले. त्यांनी पुरावा म्हणून व्हिडिओ ची क्लिप पोलिस निरीक्षक बडे साहेब यांच्याकडे सुपूर्द केली आहे.कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वर कलम ५०४, ५०५ व २६८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा व कठोर कार्यवाही व्हावी अशी विनंती करणारे पत्र त्यांनी मा. पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप साहेब व बाळासाहेब बडे यांच्या कडे दिले आहे.

कोथरूड राष्ट्रवादी युवक वतीने संघटक सचिव केदार कुलकर्णी आणि उपाध्यक्ष सुनील हरळे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. या वेळी कोथरूड राष्ट्रवादी युवकचे अनेख कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थिती होते.

NCP Youth | Girish Gurnani | कैसे लगे अच्छे दिन? – राष्ट्रवादी युवक ने जनतेला केला प्रश्न

Categories
Breaking News Political social पुणे

कैसे लगे अच्छे दिन? – राष्ट्रवादी युवक ने जनतेला केला प्रश्न

| शहरात अनेक ठिकाणी दिवाळी निमित्त सरकार ची केली पोलखोल

शहरात ठिकठिकाणी बॅनर बाजी करत युवक राष्ट्रवादी चे गिरीश गुरूनानी यांनी जनतेला दिवाळी निमित्त शुभेच्छा देतानाच जनतेला प्रश्न ही विचारला आहे. “कैसे लागे अच्छे दिन, लौटा दो हमारे बुरे दिन” असे वाक्य लिहत हे बॅनर जनतेचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच २०१४ व २०२२ च्या अत्यावश्यक वस्तूंच्या किमतींचा तुलनात्मक तक्ता लावत युवक राष्ट्रवादी ने केंद्र शासित भाजपा सरकार च्या आर्थिक धोरणांवर आघात केला आहे.

या विषयी बोलत असताना युवक राष्ट्रवादी चे कोथरूड अध्यक्ष गिरीश गुरूनानी म्हणाले की केंद्र शासित भाजपा सरकार ने खरंच जनतेची दिवाळी गोड केली आहे का हे या किमतींकडे बघून जनतेनेच ठरवावे. सामान्य जनतेवर होत असलेल्या महागाईच्या माऱ्याला केवळ आणि केवळ केंद्रातील भाजपा सरकारच कारणीभूत असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले. “आमदनी अठन्नी खर्चा रुपया” हे वाक्य लिहलेले फलक हातात धरत त्यांनी गृहिणींना ही कोलमडत असलेल्या बजेट बद्दल प्रश्न केला आहे. GST च्या माऱ्याने बेजार झालेल्या व्यापाऱ्यांच्या व्यथा मांडण्याचा ही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. दुधाचे भाव २ – २ रुपयाने वाढवत वाढवत आता ५२₹ प्रती लिटर ला पोचले आहेत असे ही त्यांनी निक्षून सांगितले.

वरील सर्व बाबींचा विचार करून सामान्य जनतेने स्वतः ठरवावे की त्यांना हा महागाई चा राक्षस डोक्यावर बसवून नाचायचे आहे की मग येत्या निवडणुकीत सरकार ला त्यांची जागा दाखवून द्यायची आहे, असे आवाहन गुरूनानी यांनी केले. या आशयाचे बॅनर शहरातील महत्वाचे भाग जसे चांदणी चौक, कोथरूड पेट्रोल पंप, नळ स्टॉप, डेक्कन पेट्रोल पंप, ज्ञानेश्वर पादुका चौक,बालगंधर्व, तसेच बिग बाजार आणि डी मार्ट बाहेर ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने झळकावण्यात आले आहेत.

या वेळी राष्ट्रवादी युवक चे अमोल गायकवाड,श्रीकांत भालगरे,शशांक काळभोर,संकेत शिंदे,ऋषिकेश कडू,प्रीतम पायगुडे,ऋषिकेश शिंदे,रवी गाडे,तेजस बनकर ,आरव दिघे, अविनाश गायकवाड आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

NCP Youth | Girish Gurnani | राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या सदस्य नोंदणी अभियान रथ मोहिमेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद | २५८ जणांनी केली नोंदणी

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या सदस्य नोंदणी अभियान रथ मोहिमेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद | २५८ जणांनी केली नोंदणी

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सभासद नोंदणी अभियान रथ मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. ही मोहीम कोथरूड विभागात ७ ठिकाणी राबविण्यात आली. या सर्व भागात सदस्य नोंदणीला उत्तम प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

मोहिमेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष किशोर कांबळे यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहरचे कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर आणि मनोज पाचपुते उपस्थित होते.

कोथरूड विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, पुरोगामी विचारांचा वारसा असणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाचा विस्तार करणे हा या अभियानामागील उद्देश होता असे राष्ट्रवादी युवकचे कोथरूड अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी सांगितले.

सभासद नोंदणी अभियान रथ कोथरूड विभागात विविध मध्यवर्ती भागात फिरविण्यात आला. त्यामध्ये भारती विद्यापीठ चौक केळेवाडी, वनाज कॉर्नर, सागर कॉलनी, शिवांजली मित्र मंडळ शास्त्रीनगर, कोथरूड डेपो चौक, गोसावी वस्ती, डी मार्ट चौक करणारा आणि कर्वेनगर चौकात या सभासद अभियान रथाच्या माध्यमातून २५८ जणांनी नोंदणी केली अशी माहिती युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी दिली.

या अभियान रथाचे नेतृत्व प्रत्येक चौकात विविध कार्यकर्त्यांनी केली त्यामध्ये स्वप्नील दादा दुधाने,सुशांत काळभोर, तेजस बनकर, पृथ्वी दहिवाल, आशिष शिंदे,लखन सौदागर सूरज गायकवाड, अनमोल केमसे, दिनेश भगत, अमित गोडंबे, मोहित बराटे आणि बंटी शेठ तांबे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असे गिरीश गुरनानी म्हणले.

MP Supriya Sule | NCP Youth | सुप्रिया सुळेंचा खोटा फोटो प्रसिद्ध केल्याबद्दल माजी नगरसेविके विरोधात पोलिसात तक्रार | कोथरूड युवक राष्ट्रवादी आक्रमक

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

सुप्रिया सुळेंचा खोटा फोटो प्रसिद्ध केल्याबद्दल माजी नगरसेविके विरोधात पोलिसात तक्रार

| कोथरूड युवक राष्ट्रवादी आक्रमक

पुणे येथील कोथरूड पोलिस स्टेशन मध्ये आज कोथरूड युवक राष्ट्रवादी अध्यक्ष गिरीश गुरुनानी यांनी शिंदे गटातील माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

शितल म्हात्रे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला खोटा फोटो प्रसिद्ध केल्याचे या वेळी गुरूनानी यांनी सांगितले. त्यांनी पुरावा म्हणून फोटो ची मूळ प्रत तसेच म्हात्रे यांनी प्रसिद्ध केलेल्या खोट्या फोटो ची प्रत पोलिसांकडे सुपूर्द केली. तसेच म्हात्रे यांच्या वर कलम ५०४, ५०५ व २६८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा व कठोर कार्यवाही व्हावी अशी विनंती करणारे पत्र त्यांनी पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप  यांच्या कडे दिले.

 

Misbehavior in the subway | भुयारी मार्गामध्ये होणाऱ्या गैरप्रकारा विरोधात युवक राष्ट्रवादी चे कोथरूड पोलिस व महापालिकेस निवेदन

Categories
Breaking News PMC Political पुणे

भुयारी मार्गामध्ये होणाऱ्या गैरप्रकारा विरोधात युवक राष्ट्रवादी चे कोथरूड पोलिस व महापालिकेस निवेदन

भुयारी मार्गात चालू असलेली गुन्हेगारी रोखून, साफ सफाई करून ते मार्ग सर्वसामान्य जनतेसाठी लौकरात लौकर चालू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कोथरूड चे अध्यक्ष गिरीश गुरूनानी यांनी केली.  वेळेतच उपायोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा देखील गिरीश गुरनानी यांनी प्रशासनाला दिला

पुण्यात बऱ्याच ठिकाणी महानगरपालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी रस्ता ओलाडण्याकरिता लाखो रुपये खर्चून भुयारी मार्ग बनवले आहेत. पण ज्या कारणासाठी हे मार्ग बनवले आहेत त्या व्यतिरिक्त इतरच गोष्टींसाठी ते वापरले जात आहेत समाज कंटक अश्या भुयारी मार्गांचा वापर स्वतःचे “अड्डे” म्हणून करत आहेत असेच चित्र अनेक ठिकाणी दिसते. काही भुयारी मार्गांना सार्वजनिक मुतारी चे स्वरूप आलेले आहे तर काही ठिकाणी पत्त्यांचे डाव रचले जातात तर काही ठिकाणी काही लोक खुशाल दारू पीत बसतात.महापालिकेने नेमलेले सुरक्षा रक्षक कधीच भुयारी मार्गाच्या प्रवेशाला उपस्थित नसतात.
अश्या मार्गांचा वापर वास्तविक स्त्रिया, गरोधर महिला व अबालवृद्ध नागरिक सुरक्षित रित्या रस्ता ओलांडण्यासाठी करू शकतात. पण तिथे चालत असलेल्या गचाळ कारभारामुळे नागरिक जाण्याचे टाळतात.

या सर्व प्रकारा विरुद्ध राष्ट्रवादी युवक कोथरूड चे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी कोथरूड पोलिस ठाणे येथे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब बडे यांना व पुणे महानगरपालिकेत मुख्य अभियंता श्रीनिवास बोलाना यांना निवेदन देऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. भुयारी मार्गात चालू असलेली गुन्हेगारी रोखून, साफ सफाई करून ते मार्ग सर्वसामान्य जनतेसाठी लौकरात लौकर चालू करावे अशी विनंती गिरीश गुरूनानी यांनी केली. या वेळी वेळेतच उपायोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा देखील गिरीश गुरनानी यांनी प्रशासनाला दिला .या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे संकेत शिंदे ,ऋषिंकेश शिंदे आदि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Girish Gurnani | राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ममता फाउंडेशनमध्ये रक्षाबंधन साजरा

Categories
Breaking News cultural Political पुणे

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ममता फाउंडेशनमध्ये रक्षाबंधन साजरा

पुणे: कात्रज येथील ममता फाउंडेशनमधील एचआयव्ही बाधित अनाथ निराधार मुलांनी रक्षाबंधनाचा आनंद घेतला. संस्थेतील मुलींनी स्वतः बनविलेल्या राख्या बांधून सण साजरा केला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम पार पडला.

गिरीश गुरनानी म्हणाले, ‘आई-वडिलांच्या कुशीत खरे बालपण असते, परंतु कित्येक बालकांच्या नशिबी असे बालपण येतच नाही. ममता फाउंडेशनमधील अशा अनाथ निराधार मुलांनी स्वतः बनविलेल्या राख्या आणि त्याचे बॉक्स खूप आकर्षक होते. राखी बांधताना मुलींच्या चेहऱ्यावरील आनंद मनाला समाधान देणारा होता.

समाजात जनजागृती निर्माण करणे आणि सामाजिक उपक्रमातून मदत करणे हा हेतू या उपक्रमाचा होता.या उपक्रमाच्या माध्यमातून वेगळाच आनंद आणि समाधान मिळाले.’

यावेळी अमोल गायकवाड ,मिलिंद शिंदे, विशाल विचारे, सागर पळे, मंगेश भोंडवे, संतोष सोनावणे आदी उपस्थित होते.

NCP youth |Girish Gurnani | अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादी युवक कडून सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप!

Categories
Breaking News Political social पुणे

 अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचारी यांना राष्ट्रवादी युवकचे रेनकोट वाटप

कोणत्याही सण-समारंभावेळी व अडचणीच्या वेळी आपले कर्तव्य बजावण्यात कधीही कसूर न करणारे सफाई कर्मचारी म्हणजे गाडगे बाबांचे शिष्यच जणू! विरोधी पक्षनेता मा.अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज कोथरूड गुजरात कॉलनी येथील सफाई कर्मचारी यांना रेनकोट वाटपाचे कार्यक्रम राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभेचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्या वतीने आयोजित करण्यात आले.

यावेळी गिरीश गुरनानी म्हणाले आपल्या आरोग्याची पर्वा न करता समाजाच्या स्वास्थ्यासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या या आरोग्यदूतांना प्रोत्साहन देणे, ही आपली जबाबदारी आहे, असे मला प्रामाणिकपणे वाटते.

अत्यंत उत्साहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी कर्मचारी बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद शब्दांत व्यक्त करण्यासारखा नाही.

या वेळी राष्ट्रवादी युवकचे अमोल गायकवाड,प्रथमेश नाईक,तेजस बनकर,पृथ्वी दहीवल,आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते….

Doctor’s Day | डॉक्टर्स डे निमित्त दहा कोरोना योद्धा डॉक्टर्स चा सन्मान

Categories
Breaking News Political social आरोग्य पुणे

डॉक्टर्स डे निमित्त दहा कोरोना योद्धा डॉक्टर्स चा सन्मान

पुणे | रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी कोरोनाकाळातसुद्धा देवदूताची भूमिका बजावणाऱ्या डॉक्टर्स चा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सन्मान करण्यात आला. शुक्रवारी ‘डॉक्टर्स डे’ च्या निमित्ताने कोथरुड परिसरातील दहा डॉक्टरांच्या कार्याचा गौरव केला गेला, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कोथरूड चे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी दिली.

‘कोरोनाच्या काळात रात्रंदिवस रुग्णसेवेचे व्रत जपणारे डॉक्टर्स देवदूतच आहेत. त्यांच्या कौशल्याने आणि ज्ञानाने अनेकांना जीवनदान मिळाले. कोरोना महामारीत आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक रुग्णांवर उपचार करून आपले कर्तव्य पार पाडले. त्यांचे मनोबल वाढून त्यांच्या कार्याला स्फूर्ती मिळावी या उद्देशाने हा सन्मान केला गेला असे कोथरूड राष्ट्रवादी युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी म्हणाले.

डॉक्टर्स डे चे औचित्य साधून अशा कोरोना योद्धा डॉक्टरांचा सत्कार करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. डॉक्टर करत असलेल्या कष्टाच्या बळावरच कोरोनाचा लढा आपण यशस्वीपणे लढत आहोत, त्यांच्या या सेवेला सलाम!’, असे गिरीश गुरनानी म्हणाले.

डॉक्टर डे निमित्ताने कोथरूड परिसरातील डॉ. सुहास नेने,डॉ. सुरेश बोरकर, डॉ.अशोक सोहोनी, डॉ.मिताली कुलकर्णी, डॉ.समीर नारकर, डॉ. विजय तरटे, डॉ स्वाती सुराणा, डॉ. एस.एम.भाटे,डॉ बी. एम. गदादे,डॉ. मीना पाटील या डॉक्टरांचा सन्मान केला. सन्मानचिन्ह आणि शाल असे सत्काराचे स्वरूप होते.

यावेळी ऋषिकेश कडू, सुनील हरळे, ऋषिकेश शिंदे,तेजस बनकर,पृथ्वी दहीवाळ आदि उपस्थित होते.

NCP Youth | Girish Gurnani | राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे गुजरात कॉलनी,वनाज कॉर्नर परिसरामध्ये  शाखा उद्घाटन

Categories
Breaking News Political पुणे

राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे गुजरात कॉलनी,वनाज कॉर्नर परिसरामध्ये  शाखा उद्घाटन

कोथरूड येथील प्रभाग क्रमांक 31 मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसची भव्य शाखा उद्घाटन आज पार पडली. या शाखेचे उद्घाटन हर्षवर्धन मानकर,अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड व किशोर कांबळे,अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला हजेरी लावून युवांनी व इतर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला आहे,गुजरात कॉलनी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्याचे काम या शाखेचे माध्यमातून होणार असल्याची खात्री असल्याचे कोथरूड युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी म्हणले.

कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष  गिरीश गुरुनानी आणि विधानसभा उपाध्यक्ष अमोल गायकवाड यांनी संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनाची धुरा सांभाळली होती.

शाखेच्या अध्यक्ष पदी पृथ्वी दहीवाळ आणि उपाध्यक्ष पदी दत्ता दिघे यांची नियुक्ती करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रभागचे अध्यक्ष तेजस बनकर आणि संघटक मंगेश भोंडवे यांनी केले

याप्रसंगी युवक कार्याध्यक्ष मोहित बराटे ,नवनाथ खिलारे,धनंजय पायगुडे, शशांक काळभोर,विजय बाबर, आशिष शिंदे, लखन सौदागर, रवी गाडे,ऋषिकेश शिंदे,मिलिंद शिंदे,आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

NCP Youth Vs BJP | काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी युवकची भाजपा विरोधात बॅनरबाजी

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी युवकची भाजपा विरोधात बॅनरबाजी

कोथरूड मधील सिटी प्राइड मल्टिप्लेक्स येथे आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गिरीश गुरूनानी यांनी काश्मिरी पंडितांच्या होणाऱ्या हत्यांचा संदर्भ घेत भाजपा विरोधात बॅनरबाजी करत आंदोलन केले.

या वेळी माध्यमांशी बोलत असताना गिरीशी गुरनानी म्हणाले “भाजपा ने फक्त आणि फक्त मतांसाठी आणि समाजात तेढ निर्माण करण्याच्या हेतूने “द काश्मीर फाईल्स” या चित्रपटाचे जोरात प्रमोशन केले होते. कुठे फुकट चित्रपट दाखविणे, तर कुठे दमदाटी करून चित्रपट लावणे अश्या अनेक प्रकारातून भाजपा या चित्रपटाला पाठिंबा देऊन द्वेषाचे राजकारण करत होते. पण आज जेव्हा काश्मीर मध्ये खरेच काश्मिरी पंडितांच्या एका पाठोपाठ एक अश्या निर्घृण हत्या होत आहेत तेव्हा मात्र भाजपा या वर काहीच अँक्शन घेताना दिसत नाही.” भाजपा चे जे नेते “द काश्मीर फाईल्स” चे तोंडभरून कौतुक करताना थकत नव्हते, आता काश्मिरी पंडितांच्या हत्यांवर एक चकार शब्दही काढत नाहीत अशीही खंत त्यांनी व्यक्त केली.

शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली,  पवार साहेबांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचे ही गुरूनानी यांनी सांगितले. कंगना राणावत, आर्यन खान, हनुमान चालीसा, मशिदी वरचे भोंगे, ग्यानव्यापी मस्जिद इत्यादी मुद्दे भाजपा साठी जास्त महत्वाचे आहेत, पण काश्मिरी पंडितांचे प्राण नाही. त्यांच्या नेत्यांना लोकांच्या जीवांची काहीच काळजी दिसत नाही अशी घणाघाती टीका त्यांनी सत्ताधारी पक्षावर चढवली. जनतेला खडबडून जागे करण्यासाठी हे आंदोलन गरजेचे असल्याचे त्यांचे मत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे श्रीकांत बालघरे,संकेत शिंदे,ऋषिकेश कडू,रवी गडे,प्रीतम पायगुडे सामाजिक कार्यकर्ते राहुल खंदारे आदि उपस्थित होते.