Ajit Pawar Birthday | ४०० रोपांचे वृक्ष लागवड करून उपमुख्यमंत्रीअजित दादा पवार यांचा वाढदिवस साजरा 

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Ajit Pawar Birthday | ४०० रोपांचे वृक्ष लागवड करून उपमुख्यमंत्रीअजित दादा पवार यांचा वाढदिवस साजरा

Ajit Pawar Birthday | महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच कर्तव्यदक्ष,संवेदनशील,अभ्यासू आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सखोल जाण असणारे नेतृत्व अजित दादा पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या 63 वाढदिवसानिमित्त चिंचवडविधानसभा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अरुण (बापू) पवार व लोकनियुक्त आदर्श सरपंच बालाजी (काका) पवार यांच्या माध्यमातून गावातील जेष्ठ नागरिक व ग्रामस्थ यांच्या शुभहस्ते मौजे धारूर या ठिकाणी ५ ते ६ फुट उंचीच्या ४०० रोपांचे वृक्ष लागवड (Tree Plantation) करून वाढदिवस साजरा करण्यात आला. (Ajit Pawar Birthday)

यावेळी धारूर गावाचे लोकनियुक्त सरपंच मा.बालाजी (काका) पवार बोलताना वृक्ष आपल्या जीवनात सर्वात मोठी आणि महत्वपूर्ण भूमिका निभावतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत. त्याच बरोबर झाडांची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांचे जतन केले पाहिजे.आपणा सर्वांना मिळून झाडे लावून,झाडे जागवून आपल्या भरत भूमीला सुजलाम सुफलाम सश्य श्यामलाम बनवले पाहिजे. वृक्ष लागवड बद्दल नागरिकामध्ये जनजागृती केली व धारूर गावामध्ये करंज ,चिंच , आवळा , वड , पिंपळ , कडुलिंब , अशा प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात आली.

यावेळी गावातील अरुण बापू पवार विचार मंचाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. श्रीराम कदम, बालाजी गुरव,दत्ता शिंदे, सोमनाथ कोरे, विशाल पवार, प्रदीप कदम ,ग्रा. सदस्य धारूर, विठ्ठल पाटील, विजय पवार, महेश गुरव,बापू गायकवाड, कुंडलिक वाघमारे अनिल शिंदे,गोरोबा जगताप,बंडू खांडेकर,दत्ता खांडेकर,उमेश पवार सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते.


News Title |Ajit Pawar Birthday | Celebrating Deputy Chief Minister Ajit Dada Pawar’s birthday by planting 400 saplings

NCP youth |Girish Gurnani | अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादी युवक कडून सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप!

Categories
Breaking News Political social पुणे

 अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचारी यांना राष्ट्रवादी युवकचे रेनकोट वाटप

कोणत्याही सण-समारंभावेळी व अडचणीच्या वेळी आपले कर्तव्य बजावण्यात कधीही कसूर न करणारे सफाई कर्मचारी म्हणजे गाडगे बाबांचे शिष्यच जणू! विरोधी पक्षनेता मा.अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज कोथरूड गुजरात कॉलनी येथील सफाई कर्मचारी यांना रेनकोट वाटपाचे कार्यक्रम राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभेचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्या वतीने आयोजित करण्यात आले.

यावेळी गिरीश गुरनानी म्हणाले आपल्या आरोग्याची पर्वा न करता समाजाच्या स्वास्थ्यासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या या आरोग्यदूतांना प्रोत्साहन देणे, ही आपली जबाबदारी आहे, असे मला प्रामाणिकपणे वाटते.

अत्यंत उत्साहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी कर्मचारी बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद शब्दांत व्यक्त करण्यासारखा नाही.

या वेळी राष्ट्रवादी युवकचे अमोल गायकवाड,प्रथमेश नाईक,तेजस बनकर,पृथ्वी दहीवल,आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते….

Plastic collection campaign | अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ओतूर महाविद्यालयात प्लास्टिक संकलन अभियानाचे उद्घाटन

Categories
cultural Education Political पुणे

 अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ओतूर महाविद्यालयात प्लास्टिक संकलन अभियानाचे उद्घाटन

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूरमध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते मा श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व प्लास्टिक संकलन अभियान या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अभय खंडागळे यांनी दिली.

उपक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा परिषद सदस्य तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य  मोहितशेठ ढमाले, अनिल शेठ तांबे अध्यक्ष ग्रामविकास मंडळ ओतूर व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य,  राजेंद्र डुंबरे संचालक ग्रामविकास मंडळ ओतूर तसेच  प्रशांत डुंबरे उपसरपंच ग्रामपंचायत ओतूर आदी मान्यवर उपस्थित होते.

अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाविद्यालय परिसरामध्ये कल्पवृक्ष समजल्या जाणाऱ्या नारळाच्या वृक्षांची लागवड करण्यात आली तसेच पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी महाविद्यालय व ओतूर परिसरातून प्लास्टिकचे संकलन केले यामध्ये पाण्याच्या वापरलेल्या बाटल्या दुधाच्या पिशव्या औषधाच्या बाटल्या इत्यादी प्लास्टिक वस्तूंचे संकलन केले. प्लास्टिक संकलन हा उपक्रम इथून पुढे दर महिन्याच्या २२ तारखेला राबवला जाणार आहे. सदर जमा केलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंचे रिसायकलिंग करण्यात येणार आहे. प्लास्टिक संकलन व रिसायकलिंग उपक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष मा. राजेंद्र घाडगे, मानद सचिव अँड संदीप कदम, खजिनदार अँड मोहनराव देशमुख, उपसचिव एल एम पवार, सहसचिव प्रशासन ए एम जाधव आदी संस्था पदाधिकाऱ्यांनी बहुमोल मार्गदर्शन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही.एम शिंदे, उपप्राचार्य डॉ के डी सोनवणे, वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ बी एम शिंदे, हिंदी विभाग प्रमुख डॉ डी एम टिळेकर, मराठी विभाग प्रमुख डॉ व्ही वाय गावडे, गणित विभाग प्रमुख प्रा एम व्ही देशमुख, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ एन एन उगले, एनसीसी विभाग प्रमुख डॉ एन एच हांडे महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ यूपी पनेरू आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ ए एम बिबे, डॉ एन पी काळे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विशेष श्रम घेतले.

Ajit Pawar Birthday | ध्येयापर्यंत जाण्यासाठी दररोजच्या जीवनात कसं वागायचे हे  अजितदादांकडून शिकण्यासारखे | प्रशांत जगताप

Categories
Political पुणे महाराष्ट्र

ध्येयापर्यंत जाण्यासाठी दररोजच्या जीवनात कसं वागायचे हे  अजितदादांकडून शिकण्यासारखे | प्रशांत जगताप

 

भारतीय राजकारणात जी प्रमुख राजकीय घराणी आहेत, त्या घराण्यांमध्ये पवार कुटुंबीयांचं नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. प्रामुख्याने राजकीय कुटुंब अथवा राजकीय वारसा याबाबत जेव्हा बोलले जाते त्यावेळी जवळपास सर्वच ठिकाणी मागच्या पिढीने केलेल्या कामात पुढच्या पिढीकडून वाढ करण्याचा प्रयत्न केला जातो. आदरणीय अजितदादा पवार मात्र या नेहमीच्या घराणी पद्धतीतील नेते नाहीत तर त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आणि शिस्तप्रिय,प्रशासनावर मजबूत पकड असणारे,रोखठोक स्वभाव असणारे नेते हीच त्यांची कार्यशैली प्रसिद्ध झाली.

माझ्या राजकीय कारकीर्दीत माझे राजकीय आदर्श तथा श्रद्धास्थान आदरणीय पवारसाहेब असले तरी माझे राजकीय गुरु हे अजितदादाच आहेत. कारण आयुष्यात किती उंचीपर्यंत जाण्याचे धेय्य ठेवायचं हे जरी पवार साहेबांनी शिकवले असलं तरी त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी दररोजच्या जीवनात कसं वागायचे हे मात्र अजितदादांकडून शिकण्यासारखे आहे.

माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीलाच जसे मी दादांच्या जवळ गेलो तसे तसे दादांकडून काही गोष्टी शिकायला मिळाल्या.ज्यात ” कुठल्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असला तर त्या गोष्टी त्या यंत्रणे कडून करून घेता येतात”, हे मी दादांकडून शिकलो.
साधारणतः राजकीय व्यक्ति नेहमी आपल्या मर्जीतील अधिकारी एखाद्या संस्थेत बसले पाहिजेत, आपल्याला अडचण होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या पाहिजेत यासाठी आग्रही असतात. परंतु साधारण वीस वर्षांपूर्वी मी दादांजवळ असताना एक किस्सा जवळून पाहिला. बदलीसाठी आलेल्या राजकीय कार्यकर्त्यांना दादांनी खडसावून सांगितले की, “जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यासोबतच जर तुम्ही व्यवस्थित संबंध जपले तर कुठल्याही अधिकाऱ्याची बदली करण्याची वेळ येत नाही. शिवाय जसे राजकीय लोकांचे एकमेकांसोबत संबंध असतात तसेच बदली होऊन जाणारे अधिकारी देखील पुढच्या अधिकाऱ्यांना सांगून जातो की, “ह्या ह्या व्यक्ती पासून सावध रहा”. त्यामुळे राजकीय आयुष्यात वाटचाल करत असताना जी प्रशासकीय यंत्रणा आहे तिच्यासोबत जर व्यवस्थित जुळवून घेतले तर ती यंत्रणा देखील तुमच्यासोबत उत्साहाने काम करू शकते. कुठलेही नियमबाह्य काम करण्यासाठी अधिकाऱ्यांवर कधीही दडपण दबाव आणू नये , अधिकाऱ्यांना देखील काम करण्याची उत्सुकता असते परंतु राजकीय उदासीनतेमुळे अधिकारी काम करू शकत नाहीत. त्यांना जर निपक्षपातीपणें काम करू दिले तर आपल्या भागाचा विकास हा निश्चित होतो”. हे एकच नाही तर अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यात आदरणीय दादांनी संबंध जपण्यापासून संबंध टिकवण्यापर्यंत वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केले. त्याचाच परिणाम म्हणून आज पुणे शहरात आम्ही दादांचे शिलेदार म्हणून अभिमानाने कुठल्याही कार्यालयात जाऊन लोकहिताची कामे करून घेऊ शकतो.

देशाच्या संसदीय कार्यप्रणालीमध्ये तसेच राज्यांच्या विधिमंडळांमध्ये आजवर अनेक मातब्बर नेते होऊन गेले. त्यांनी आपापल्या परीने त्या त्यावेळेस त्यांचा काळ गाजवला , परंतु या सर्व नेत्यांमध्ये केवळ अजितदादा असे आहेत की, जे सकाळी सात वाजता मंत्रालयातील आपल्या दालनात कामासाठी हजर असायचे. कित्येक कार्यक्रमांना अजितदादांनी सकाळी सहा- सात ची वेळ दिली आहे व त्यावेळी किंबहुना वेळेच्या पूर्वी दादा तिथे हजर असतात. स्वतः सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करणे, दिवसभराच्या आपल्या कामांमध्ये काहीही काम शिल्लक न ठेवणे ,ज्या कार्यक्रमात गेलो आहोत त्या कार्यक्रमात पूर्णपणे त्या त्या विषयावर सखोल माहिती देणे तिथल्या श्रोत्या वर्गाला उगीच काहीतरी भंपक आश्वासने देण्यापेक्षा जी वस्तुस्थिती आहे, त्या वस्तुस्थितीशी निगडित संवाद साधने. आपल्या संकल्पना लोकांवर थोपवण्यापेक्षा लोकांना आपल्याकडून काय हवे आहे..? हे पाहत सुसंवादातून काम पूर्णत्वास घेऊन जाणे हे अजितदादांचे विशेष गुण. कार्यक्रमात आयोजकांना जर अजितदादांना बोलवायचे असेल तर इतर मान्यवरांपेक्षा अजितदादा येणार असल्याने कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थितच करावे लागते. याचे कारण म्हणजे दादा एखाद्या इमारतीच्या उद्घाटनास आल्यास त्या इमारतीच्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर पासून ते सजावटीपर्यंत कामाचा दर्जा, टेक्निकली मेजरमेंट, सजावट,रंगरंगोटी, नीटनेटकेपणा, स्वच्छता या सर्व बाबींमध्ये अजितदादा बारकाईने लक्ष देतात. विशेष म्हणजे यांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आयोजकांच्या कानात सांगण्याची पद्धत दादांकडे नाही, दादा तिथे सगळ्यांसमोर त्या आयोजकास या चुकीबद्दल जाब विचारतात. कारण आपण लोकांच्या पैशातून काम करत असताना , तो निधी योग्य प्रकारे वापरला गेला पाहिजे. त्या निधीतून उभ्या राहणाऱ्या वास्तू या वर्षानुवर्ष टिकल्या पाहिजे. लोकांचा पैसा हा जपून योग्य ठिकाणी वापरत लोकांना उच्च प्रतीच्या सोयी सुविधा निर्माण करून देणे हा देखील अजितदादांनी आम्हास घालून दिलेल्या शिस्तीचाच एक भाग आहे.

राज्याचा कारभार सांभाळत असताना पुणे शहरावर दादांचे विशेष लक्ष असते. दादा पुणे शहर व जिल्ह्याचे पालकमंत्री असताना प्रशासकीय दिरंगाईमुळे कोणी वंचित राहिल्याची एकही घटना घडलेली नाही, याचे कारण म्हणजे दादा पालकमंत्री असताना सातत्याने दर आठवड्यात पुणे जिल्ह्यातील प्रशासनाची आढावा बैठक पार पडत असे. या बैठकीमुळे प्रशासकीय योजनांची अंमलबजावणी असेल, प्रशासकीय पातळीवर काही निर्णय घ्यावयाचे असतील तर ते तात्काळ घेतले जाऊन पुढच्या आठवड्यात त्या निर्णयानच्या अंमलबजावणी मध्ये आलेल्या त्रुटी बाबत दादा आढावा घेत असे. यामुळे प्रशासकीय अधिकारी देखील एक गोष्ट जाणून होते की दादांकडे कुठल्याही विभागाची तक्रार घेऊन नागरिक जाता कामा नये. प्रशासकीय यंत्रणा देखील पूर्ण ताकदीनिशी काम करत असे.

महानगरपालिकेत नव्याने गावे समाविष्ट करत असताना दादांनी स्पष्टपणे भूमिका मांडली होती की, कुठल्याही प्रकारे पुणे शहरालगतच्या परिसरात अनधिकृत बांधकामे वाढता कामा नये. शहरालगतची जी गावे आहेत तेथे बकाल वस्ती होऊ नये यासाठी दादांनी ती गावे महापालिकेत समाविष्ट करून घेतली. तत्कालीन भाजपला त्या गावात सोयी सुविधा देणे शक्य झाले नाही. तरीदेखील दादांचा मात्र हाच आग्रह होता की या गावांना महापालिकेचे सर्व सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे. या गावांचा देखील सुनियोजित विकास झाला पाहिजे. पुण्याचा रिंग रोड प्रकल्प हा देखील दादांचा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे केवळ पुणे शहरातून जाणाऱ्या हायवेमुळे पुणे शहर नागरिकांना रहदारीचा सामना करावा लागू नये तसेच पुण्यातील कुठल्याही भागातून शहराबाहेर पडायचे असल्यास एक ट्राफिक मुक्त महामार्ग असावा या संकल्पनेतूनच दादांनी रिंग रोड प्रकल्प आणला. उपमुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला भरीव निधी देखील दिला. स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्पाला देखील दादांनी मंजुरी दिली. भामा – आसखेड प्रकल्प, एस.आर.ए प्रकल्पांच्या सदनिकांची साईज वाढवणे असे अनेक निर्णय दादांनी पुण्यासाठी घेतले.ज्याचे दीर्घकालीन परिणाम पुणेकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी भविष्यात दिसतील.
कोवीड च्या काळात ज्याप्रमाणे आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेत होतो, त्याचप्रमाणे आदरणीय दादांनी पुणे शहर व जिल्ह्याची काळजी घेतली. अधिकाऱ्यांसोबत कायम सुसंवाद ठेवत जंबो कोवीड सेंटर, खाजगी रुग्णालय – शासकीय रुग्णालयांमध्ये उपचाराचा दर्जा वाढवत सोयी सुविधा निर्माण करणे. पुढच्या काही दिवसांचा विचार करत ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध करून देणे या सर्व गोष्टी दादांनी अतिशय काळजीपूर्वक हाताळल्या.
आज दादांच्या ६३ व्यां वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना दादांच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची जी अपेक्षा आहे, तीच मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो की , दादांना भविष्यात आम्हाला मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले पाहायचे आहे, त्यासाठी कार्यकर्ता म्हणून वाटेल ती मेहनत घ्यायची आमची तयारी आहे .

दादा औक्षवंत व्हा..!

– प्रशांत जगताप
(अध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.
महापौर २०१६-१७ )