Kalagram | वर्षभरात साकारणार कलाग्राम | पु. ल. देशपांडे उद्यानाचा तिसरा टप्पा होणार पूर्ण

Categories
Breaking News PMC social पुणे

सिंहगड रोडवर कलाग्राम देखील वर्षभरात होणार विकसित

पुणे महापालिकेकडून नाट्यगृह प्रमाणेच सिंहगड रोडवर वर्षभरात कलाग्राम (kalagram) विकसित करण्यात येणार आहे. पु ल देशपांडे उद्यानात कलाग्राम विकसित करण्यात येणार आहे. यात 600 आसनव्यवस्थेचे ऍम्पिथिएटर व 60 गाड्यांचे ड्राइव्ह इन थिएटर बांधण्यात येणार आहे. (PMC Pune)
महानगरपालिकेने शहरात 200 हून अधिक उद्याने (Garden) बांधली आहेत.  यामध्ये पी.एल.  देशपांडे गार्डनचाही समावेश आहे.  वेगवेगळ्या टप्प्यांतर्गत या उद्यानाचे काम सुरू आहे.  जपानी गार्डन पहिल्या टप्प्यात बांधण्यात आले.  त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मुघल गार्डन बांधण्यात आले आहे.  आता तिसऱ्या टप्प्यात येथे कलाग्राम विकसित करण्यात येणार आहे.  या कलाग्राम अंतर्गत विविध राज्यांतील कलांचे आविष्कार येथे दाखविण्यात येणार आहेत.  जेणेकरून बाहेरील राज्यातील कलाकारांनाही येथे काम करण्याची संधी मिळेल.  त्यानुसार हे काम करण्याची जबाबदारी स्मार्ट सिटीवर सोपविण्यात आली होती. मात्र स्मार्ट सिटीकडून या कामात दिरंगाई करण्यात आली. त्यामुळे काही लोकप्रतिनिधींनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे महापालिकेनेच याचे काम करावे असे ठरले. त्यानुसार महापालिका हे काम करणार आहे.  (Pune Municipal Corporation)
 महापालिका आयुक्तांनी अर्थसंकल्पात 8 कोटीची तरतूद कलाग्राम साठी केली आहे. आगामी वर्षभरात याचे काम पूर्ण करण्यात येईल.
– हर्षदा शिंदे, विभाग प्रमुख, भवन रचना 

Theatre | पुणे महापालिकेकडून नाट्यरसिकांसाठी आनंदाची बातमी!

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

पुणे महापालिकेकडून नाट्यरसिकांसाठी आनंदाची बातमी!

| सिंहगड रोडवरील छत्रपती शिवाजी राजे भोसले नाट्यगृह वर्षभरात नाट्यरसिकांच्या सेवेत होणार हजर

पुणे | पुणे शहरात पुणे महापालिकेकडून अजून एक नाट्यगृह बांधण्यात येत आहे. सिंहगड रोडवर छत्रपती शिवाजी राजे भोसले नाट्यगृहाचे काम सुरु आहे. याचे जवळपास निम्मे काम झाले असून आगामी वर्षभरात हे नाट्यगृह नाट्यरसिकांच्या सेवेसाठी हजर होणार आहे. यावर्षी बजेटमध्ये त्यासाठी 2 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
800 आसन व्यवस्थेचे हे नाट्यगृह असणार आहे. सोबतच कलादालन देखील असणार आहे. सिंहगड रोडवरील फन टाइम थिएटर च्या नजदिक हे नाट्यगृह होणार आहे. याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. यासाठी 12 कोटीं खर्च येणार आहे. महापालिकेच्या भवन रचना विभागाकडून याचे काम करण्यात येत असून जवळपास निम्मे काम पूर्ण करण्यात आले आहे. आगामी वर्षभरात याचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. यासाठी चालू बजेटमध्ये 2 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
शहरात सद्यस्थितीत महत्वाची 6 नाट्यगृहे आहेत. महापालिकेच्या महत्वाच्या नाट्यगृहामध्ये बालगंधर्व रंगमंदिर, गणेश कला क्रीडा रंगमंच, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक, पं भीमसेन जोशी कलामंदिर, महात्मा फुले सांस्कृतिक भवन, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह यांचा समावेश आहे. या नाट्यगृहामध्ये चांगलीच गर्दी असते. प्रेक्षक आणि नाटककारांच्या  देखील ही नाट्यगृहे पसंतीस उतरली आहेत. त्याच धर्तीवर सिंहगड रोडवर देखील नाट्यगृह असावे, अशी पुणेकर खासकरून सिंहगड रोडवरील नागरिकांची मागणी होती. त्यानुसार मागील बजेटमध्ये तरतूद करण्यात आली होती. आता वर्षभरातच हे नाट्यगृह रसिकांच्या सेवेला हजर होणार आहे.
——
सिंहगड रोडवरील नाट्यगृहाचे काम जवळपास निम्मे पूर्ण झाले आहे. आम्हांला सर्व निधी उपस्थित झाल्यास आम्ही याचे पूर्ण काम वर्षभरात पूर्ण करू शकू. यामुळे शहरात अजून एका नाट्यगृहाची भर पडणार आहे. 
 
हर्षदा शिंदे, विभाग प्रमुख, भवन रचना.