Eid-ul-Zuha | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना गुरुवारी सुट्टी! | महापालिकेकडून परिपत्रक जारी

Categories
Breaking News PMC पुणे

Eid-ul-Zuha | महापालिका कर्मचाऱ्यांना गुरुवारी सुट्टी! | महापालिकेकडून परिपत्रक जारी

Eid-ul-Zuha | बकरी ईद (ईद उल झुआ) (Eid-ul-Zuha) या सणानिमित्त जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टीच्या (Public Holiday) दिनांकात बदल करण्यात आला आहे. ही सुट्टी 28 जून म्हणजे बुधवारी दर्शवण्यात आली होती. मात्र सण 29 ला म्हणजे गुरुवारी येत असल्याने सार्वजनिक सुट्टी गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारने सुट्टी जाहीर केल्यानंतर महापालिकेने (Pune Municipal Corporation Circular) देखील गुरुवारच्या सुट्टीचे परिपत्रक जारी केले आहे.  (Eid-ul-Zuha)

शासनाने सन २०२३ करीता जाहीर करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांमधील बकरी ईद (Bakraid) ची सार्वजनिक सुट्टी बुधवार, २८.०६.२०२३ रोजी दर्शविण्यात आली होती. मात्र हा  सण गुरुवार, २९.०६.२०२३ रोजी येत असल्याने २८.०६.२०२३ रोजीची सुट्टी रद्द करुन गुरुवार, २९.०६.२०२३ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. असे राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय कडून काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. मात्र महापालिका प्रशासनाकडून याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले नव्हते. त्यामुळे कर्मचारी संभ्रमात होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून गुरुवारच्या सुट्टीचे परिपत्रक (PMC Circular) जारी केले आहे.  (Public Holiday)

—-
News Title | Eid-ul-Zuha | Eid-ul-Zuha |  Municipal employees holiday on Thursday!  |  Circular issued by Municipal Corporation

Additional holidays | PMC Pune | महापालिका कार्यालयांना अतिरिक्त सुट्ट्या

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिका कार्यालयांना अतिरिक्त सुट्ट्या

महापालिका प्रशासनाकडून (Pune municipal corporation) दर वर्षी सुट्ट्या (holiday) जाहीर करण्यात येतात. त्यानुसार महापालिका कमर्चारी आणि अधिकाऱ्यासाठी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. एकूण २३ सुट्ट्या असणार आहेत. तर ५ सुट्ट्या या शनिवार आणि रविवारी येत आहेत. दरम्यान यामध्ये अजून तीन सुट्ट्यांची भर पडली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या निर्देशानुसार या अतिरिक्त तीन सुट्ट्या असतील. (PMC Pune)

महापालिका अतिरिक्त आयुक्त (PMC Additional commissioner) कार्यालयाकडून या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. विविध उत्सव, सण (festival) यासाठी सुट्ट्या देण्यात येत असतात. प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्य दिन, दिवाळी असे सगळे सणवार धरून वर्षभरात एकूण २३ सुट्ट्या महापालिका कर्मचार्यांना मिळतील. तर ५ सुट्ट्या या शनिवार आणि रविवारी येत आहेत. यामध्ये महाशिवरात्री -शनिवार, छत्रपती शिवाजी महाराज जयंती रविवार, रमझान ईद शनिवार, मोहरम शनिवार, आणि दिवाळी (लक्ष्मिपुजन) रविवार यांचा समावेश आहे. तर १२ जून या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पुण्यात आगमन होणार आहे. त्यादिवशी अर्धा दिवस सुट्टी राहिल. दरम्यान यामध्ये अजून तीन सुट्ट्यांची भर पडली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या निर्देशानुसार या अतिरिक्त तीन सुट्ट्या असतील. यामध्ये २२ सप्टेंबर ला गौरी पूजन, १० नोव्हेंबर धन त्रयोदशी आणि ८ डिसेंबर आळंदी यात्रेचा समावेश आहे. महापालिका प्रशासनाकडून याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.