Additional holidays | PMC Pune | महापालिका कार्यालयांना अतिरिक्त सुट्ट्या

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

महापालिका कार्यालयांना अतिरिक्त सुट्ट्या

महापालिका प्रशासनाकडून (Pune municipal corporation) दर वर्षी सुट्ट्या (holiday) जाहीर करण्यात येतात. त्यानुसार महापालिका कमर्चारी आणि अधिकाऱ्यासाठी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. एकूण २३ सुट्ट्या असणार आहेत. तर ५ सुट्ट्या या शनिवार आणि रविवारी येत आहेत. दरम्यान यामध्ये अजून तीन सुट्ट्यांची भर पडली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या निर्देशानुसार या अतिरिक्त तीन सुट्ट्या असतील. (PMC Pune)

महापालिका अतिरिक्त आयुक्त (PMC Additional commissioner) कार्यालयाकडून या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. विविध उत्सव, सण (festival) यासाठी सुट्ट्या देण्यात येत असतात. प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्य दिन, दिवाळी असे सगळे सणवार धरून वर्षभरात एकूण २३ सुट्ट्या महापालिका कर्मचार्यांना मिळतील. तर ५ सुट्ट्या या शनिवार आणि रविवारी येत आहेत. यामध्ये महाशिवरात्री -शनिवार, छत्रपती शिवाजी महाराज जयंती रविवार, रमझान ईद शनिवार, मोहरम शनिवार, आणि दिवाळी (लक्ष्मिपुजन) रविवार यांचा समावेश आहे. तर १२ जून या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पुण्यात आगमन होणार आहे. त्यादिवशी अर्धा दिवस सुट्टी राहिल. दरम्यान यामध्ये अजून तीन सुट्ट्यांची भर पडली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या निर्देशानुसार या अतिरिक्त तीन सुट्ट्या असतील. यामध्ये २२ सप्टेंबर ला गौरी पूजन, १० नोव्हेंबर धन त्रयोदशी आणि ८ डिसेंबर आळंदी यात्रेचा समावेश आहे. महापालिका प्रशासनाकडून याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.