Dr Siddharth Dhende | Nagar Road BRTS | अन्यथा बीआरटीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलन छेडू | डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा इशारा

Categories
Breaking News Political social पुणे

Dr Siddharth Dhende | Nagar Road BRTS | अन्यथा बीआरटीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलन छेडू

| पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा इशारा

– मेट्रोचे काम नसलेल्या ठिकाणी बीआरटी पूर्ण क्षमतेने सुरू करा ; डॉ. धेंडे यांची मागणी

 

Dr Siddharth Dhende | Nagar Road BRTS |वाहतूकीला अडथळा होत असल्याचा चुकीचा संदेश देऊन काही जण बीआरटी मार्ग (BRTS Route) बंद करण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाऱ्यांचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रकार आहे. गोरगरिब नागरिकांची जीवनदायी असणारा बीआरटी मार्ग बंद करू नये. अन्यथा संविधानिक मार्गाने आंदोलन छेडू, असा इशारा पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Dr Siddharth Dhende) यांनी दिला आहे. पुणे महापालिकेचे आयुक्‍त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांना दिलेल्या निवेदनात हा इशारा देण्यात आला आहे. (Dr Siddharth Dhende | Nagar Road BRTS)

डॉ. धेंडे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पुणे शहरामध्ये 2007 नंतर मोठ्या प्रमाणात आयटी क्षेत्राचा विस्तार झाला आहे. या बरोबरच पुणे शहरात रोजगार उपलब्ध व्हावा याकरीता इतरही क्षेत्र विकसित झाले. त्याचा ताण पुणे शहरातील पायाभूत सुविधांना झालेला आहे. भविष्याचा वेध बघून पुणे शहरामध्ये मेट्रो होण्याअगोदर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होण्यासाठी बीआरटी संकल्पना कार्यान्वित झाली. सोलापूर रोड, सातारा रोड, नगररोड, जुना मुंबई पुना रोड, आळंदी रोड या ठिकाणी राबविण्यात आली. या करीता केंद्र शासन राज्य शासन व पुणे महानगरपालिका यांनी संयुक्तपणे हजारो कोटी रूपये बीआरटी सक्षमीकरणासाठी खर्च केले. (Pune Municipal Corporation)

खासगी वाहनांचा वापर कमी व्हावा, पर्यावरणाचा व्हास कमी करणे या उद्देशाने बीआरटी प्रकल्प राबविला. त्याचा शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग व्यक्ति, कामगार आदींना त्याचा मोठा फायदा होत आहे. नगररोड दरम्यानची बीआरटी ही कार्यान्वित झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच या बीआरटीचे उद्घाटन केले आहे. गेल्या काही वर्षांपासून नगररोड बीआरटी वर मेट्रोची सेवा चालू होणार आहे. त्याकरीता येरवडा ते विमाननगर पर्यंतची बीआरटी पूर्णपणे बंद केली आहे. गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत मेट्रोचे काम व बंद बीआरटी मुळे वाहतूक कोंडी मोठया प्रमाणावर होत आहे. असे असताना बीआरटीमुळे वाहतूक कोंडी होते, असा चुकीचा संदेश दिला जात आहे. त्यामुळे तीन वर्षापासून बंद असलेला बीआरटीचा मार्ग मेट्रोचे काम सुरू नसलेल्या ठिकाणी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे. पीएमपीएलच्या ताफ्यात नव्याने एक हजार बसेस दाखल होणार आहेत. त्या बीआरटी मार्गावर कार्यान्वित झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल.

तसेच नगररोड बीआरटी ही येरवडयापासून कल्याणीनगर मार्गे वळविण्यात आली त्यामुळे येरवड्यापासून ते रामवाडी पर्यंत बीआरटीला अडथळा होत नाही, असे डॉ. धेंडे म्हणाले.

 इतरांनाही परवानगी द्या –

बीआरटीच्या मार्गांवर बसेस, एसटी, रुग्णवाहिका, अग्निशामक वाहने, स्कूल बसेस यांनाही परवानगी द्यावी, अशी मागणी डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केली आहे. त्यामुळे नगर रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी कमी होईल. पुणे महापालिकेने वेळेत मेट्रो कॉर्पोरेशन ला सांगून बीआरटीची तोडफोड केलेली आहे तेथे दुरूस्तीचे काम तात्काळ करून घ्यावे. तत्काळ वॉर्डनची नियुक्‍ती करावी, अशीही मागणी करण्यात आली.
——————-

News Title | Dr. Siddharth Dhende Nagar Road BRTS | Otherwise we will start agitation for BRT through constitutional means | Former Deputy Mayor of Pune Municipal Corporation Dr. Siddharth Dhende’s warning

Nagar Road Traffic | नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडी सोडवण्याची मागणी

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Nagar Road Traffic | नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडी सोडवण्याची मागणी

| भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांची महापालिका अधिकाऱ्यांसोबत पाहणी

Nagar Road Traffic | पुणे नगर रस्त्यावरील (Pune-Nagar Road Traffic) वाहतुकीची कोंडी तातडीने सोडवण्यासाठी उपाययोजना करा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (BJP City President Jagdish Mulik) यांनी केली. (Nagar Road Traffic)
नगर रस्त्यावरील फिनिक्स चौक (Phoniex Chowk) परिसरात मुळीक यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी शहराध्यक्ष जगदिश मुळीक, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक, अतिरीक्त आयुक्त विकास ढाकणे  (Additional Commissioner Vikas Dhakane) यांच्यासह अधिकारी व स्थानिक  उपस्थित होते. (Pune Municipal Corporation)
मुळीक म्हणाले, केंद्र सरकारच्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत चार वर्षांपू्वी शहरातील २०० किलोमीटर रस्त्यांचे ‘रोड सेफ्टी ऑडिट’ करण्यात आले होते. त्यात पुणे नगर रस्ता हा वाहतुकीसाठी सर्वांत धोकादायक असल्याची बाब समोर आली होती. याचा विचार करून पुणे-नगर रस्ता हे एक एकक मानून स्थायी समितीचे तत्कालिन अध्यक्ष योगेश मुळीक यांनी ‘नगर रस्ता एकात्मिक वाहतूक आराखडा’ तयार केला होता. या आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली होती. (PMC Pune)
त्यामध्ये मेट्रो मार्गांचे नियोजन, बीआरटी मार्गांचे सक्षमीकरण व पुरेशी बससंख्या, ठिकठिकाणी उड्डाण पूल / ग्रेडसेपरेटर / भुयारी मार्ग आणि रोड सेफ्टी ऑडिटमध्ये सुचविलेल्या उपाययोजनांचा समावेश होता.  (Pune Traffic Update)
त्यापैकी गोल्फ चौक उड्डाण पूल नुकताच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या आराखड्यातील कल्याणी नगर ते कोरेगाव पार्क पुलाचे काम तातडीने सुरू करावे आणि शिवणे ते खराडी रस्त्याला गती द्या, कल्याणी नगर परिसरातील रस्ते आणि पदपथांची दुरुस्ती करा अशा मागण्या मुळीक यांनी केल्या आहेत. (Pune News)
——
News Title | Nagar Road Traffic |  Demand to solve traffic jams on city roads
 |  BJP city president Jagdish Mulik inspected with municipal officials