Dr. Vasant Gawde | NSS | एन.एस.एस. हे आदर्श संस्कारांचे व्यासपीठ | प्रा.डॉ. वसंत गावडे

Categories
Breaking News Education social पुणे

एन.एस.एस. हे आदर्श संस्कारांचे व्यासपीठ | प्रा.डॉ. वसंत गावडे

एन.एस.एस.हे आदर्श संस्कारांचे व्यासपीठ व व्यक्तिमत्व विकासाचे विद्यापीठ आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या अनेक सुप्त कलागुणांना वाव मिळत असतो. विद्यार्थ्यांमध्ये समाज सेवेची भावना दृढ होते.  स्वावलंबनाचे धडे मिळतात. असे प्रतिपादन प्रा. डॉ. वसंत गावडे यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे ,राष्ट्रीय सेवा योजना आणि भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे, प्रितम प्रकाश महाविद्यालय (कला व वाणिज्य) इंद्रायणीनगर ,भोसरी, पुणे३९. यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत, “युवकांचा ध्यास ग्राम- शहर विकास” या उपक्रमांतर्गत ‘विशेष श्रमसंस्कार शिबिर’ शुक्रवार दि.१६ डिसेंबर २०२२ ते गुरुवार दि.२२डिसेंबर २०२२ या कालावधीत मु.पो.कोहिनकरवाडी ता.खेड, जि.पुणे, येथे मोठ्या आनंदी वातावरणात संपन्न होत आहे. सदर शिबीरात दररोज प्रबोधन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.१७ डिसें.२०२२रोजी प्रबोधनपर बौद्धिक व्याख्यानात “राष्ट्रीय सेवा योजना व व्यक्तिमत्व विकास”या विषयावर बोलताना प्रा.डॉ.वसंत गावडे म्हणाले,” “एन.एस.एस.हे आदर्श संस्कारांचे व्यासपीठ व व्यक्तिमत्व विकासाचे विद्यापीठ आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या अनेक सुप्त कलागुणांना वाव मिळत असतो. विद्यार्थ्यांमध्ये समाज सेवेची भावना दृढ होते.  स्वावलंबनाचे धडे मिळतात. स्वच्छता अभियान,आपत्ती व्यवस्थापन, राष्ट्रीय एकात्मता सामाजिक एकता वाढीसाठी विद्यार्थी तयार होतात. तसेच संभाषण कौशल्य, नेतृत्व गुण, स्वावलंबन, श्रमाचे मूल्य, तडजोडीचे तत्त्व, संभाषण कौशल्य, ग्राम जीवनाचा अनुभव, इत्यादी पैलू राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना शिकायला मिळतात. व्यक्तिमत्त्व विकासासाठी ते आत्मसात होऊन विकसित होतात . लोकशाही मूल्य जोपासली जाऊन प्रेमाची भावना, बंधुत्व व सांघिक भावना ,जोखीम घेण्याची क्षमता,मानसिक क्षमता व शारीरिक क्षमता वाढते. आदर्श व्यक्तिमत्व जवळून अनुभवण्याची संधी मिळते. अनुभव व कृतिशीलता वाढते.विविध प्रकारच्या शिबिरांमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो. या सर्वांमधून सामाजिक उत्तरदायित्वाची भावना निर्माण होते. सहकार्य,स्वावलंबन काय असतो हे शिकायला मिळते. या सर्वांचा परिपाक म्हणजे सामाजिक उत्तरदायित्वाची भावना एन.एस.एस.च्या स्वयंसेवकांमध्ये तयार होऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. म्हणून राष्ट्रीय सेवा योजना ही संस्कार देणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे असे मला वाटते”

सदर व्याख्यानासाठी शिबिरार्थी व ग्रामस्थ हे उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी

Dr. Vasant Gawde | राष्ट्रीय सेवा योजना ही भारतातील युवकांची सर्वात मोठी चळवळ |  डॉ वसंत गावडे

Categories
Breaking News Education पुणे

राष्ट्रीय सेवा योजना ही भारतातील युवकांची सर्वात मोठी चळवळ |  डॉ वसंत गावडे

राष्ट्रीय सेवा योजना युवकांची सर्वात मोठी चळवळ असून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुण विकासाबरोबरच समायोजन कौशल्य, लोकशाही मूल्य, स्वावलंबन, श्रमाचे मूल्य, तडजोडीचे तत्व, संभाषण कौशल्य व ग्रामीण जनजीवनाचा अनुभव याबरोबरच आपत्कालीन परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्याची क्षमता विकसित होते असे मत डॉ वसंत गावडे व्यक्त केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर मधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे औचित्य साधून महाविद्यालय परिसरामध्ये स्वच्छता अभियान तसेच “ओळख राष्ट्रीय सेवा योजनेची” या विषयावरील डॉ वसंत गावडे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे व कार्यक्रमाधिकारी डॉ. अमोल बिबे यांनी दिली.

सदर कार्यक्रमामध्ये डॉ. वसंत गावडे यांनी आपल्या व्याख्यानामध्ये राष्ट्रीय सेवा योजना युवकांची सर्वात मोठी चळवळ असून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुण विकासाबरोबरच समायोजन कौशल्य, लोकशाही मूल्य, स्वावलंबन, श्रमाचे मूल्य, तडजोडीचे तत्व, संभाषण कौशल्य व ग्रामीण जनजीवनाचा अनुभव याबरोबरच आपत्कालीन परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्याची क्षमता विकसित होते असे मत व्यक्त केले.

तसेच आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास तसेच महाविद्यालय आणि समाजाच्या विकासासाठी आवश्यक असणारी मूल्य युवकांमध्ये रुजवली जातात असे मत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे, उपप्राचार्य डॉ. एस एफ ढाकणे, डॉ. व्ही एम शिंदे, डॉ. के डी सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अमोल बिबे यांनी केले व सूत्रसंचालन डॉ. निलेश काळे यांनी तर आभार प्रदर्शन भूषण वायकर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. अजय कवाडे, डॉ. रमाकांत कसपटे, डॉ. अनिल लोंढे, डॉ. नंदकिशोर उगले यांनी विशेष परिश्रम घेतले.

Annasaheb Waghire College | ओतूर येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विद्यापीठाच्या राज्यस्तरीय वारीमध्ये सहभाग

Categories
Breaking News Education पुणे

ओतूर येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विद्यापीठाच्या राज्यस्तरीय वारीमध्ये सहभाग

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ जुन ते १० जुलै २०२२ या कालावधीमध्ये पुणे ते पंढरपूर या दरम्यान विद्यापीठाच्या वतीने राज्यस्तरीय वारीचे आयोजन करण्यात आले.

स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी, लोकशाही वारी व कोरोना मुक्त वारी तसेच वृक्षदिंडी चे आयोजन वारी मार्गावर करण्यात आले होते. सदर वारीच्या निमित्ताने वारी मार्गावर मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो या थीमवर अधारीत पथनाट्याचे पालखी मार्गावर १८ ठिकाणी सादरीकरण करण्यात आले. सदर पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम केले. सदर वारीमध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर मधील हरीश चौधरी, हर्षल जाधव, सचिन दिवेकर व मनोज गायकर या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन जनजागृती चे काम केले.

वारीमध्ये सहभागी झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ अभय खंडागळे यांनी सर्व स्वयंसेवकांचे प्रमाणपत्र देऊन अभिनंदन व कौतुक केले. सदर प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ एस एफ ढाकणे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ व्ही एम शिंदे, मराठी विभाग प्रमुख डॉ व्ही वाय गावडे, हिंदी विभाग प्रमुख डॉ डी एम टिळेकर व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ अमोल बिबे उपस्थित होते.