Old pension strike | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

| कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत समितीच्या अहवालावर उचीत निर्णय घेणार

| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत निवेदनाद्वारे जाहीर केले.

यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना व सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी संघटनांच्या वतीने दिनांक १४ मार्च, २०२३ पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. तसेच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ यांच्या वतीने देखील दिनांक २८ मार्च, २०२३ पासून संपावर जाण्याबाबत राज्य शासनाला नोटीस दिलेली आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्य सचिव व माझ्या स्तरावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला कर्मचारी व राजपत्रित अधिकारी संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. बैठकीत संबंधित संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.

राज्यासमोर असलेल्या आव्हानांचा विचार करता राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने घेतलेल्या या निर्णयाचे मी स्वागत करतो, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
००००

Strike | Old Pension राज्यव्यापी बेमुदत संपास पाठिंबा देण्याकरिता मनपा कर्मचाऱ्यांची निदर्शने !

Categories
Breaking News PMC social पुणे महाराष्ट्र

राज्यव्यापी बेमुदत संपास पाठिंबा देण्याकरिता मनपा कर्मचाऱ्यांची  निदर्शने !

शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या संपाला पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) आणि इतर संघटनांनी  जाहीर पाठिंबा दर्शविला व त्याचसोबत आज संपाला जाहीर पाठिंबा देण्याकरिता पुणे महानगरपालिका भवनाबाहेर निदर्शने करण्यात आली.

‘एकच मिशन- जुनी पेन्शन’ या आपल्या लढ्याला कामगारांनी काम करून निदर्शनात सहभाग नोंदविला. निदर्शनामध्ये पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) ने आपली आज भूमिका स्पष्ट केली. जुन्या पेन्शनचा लढा हा एकजुटीच्या ताकदीवर लढवावा लागणार असल्याने कामगारांची एकजूट हीच ताकद असल्याचं युनियनकडून मांडण्यात आले. यावेळी युनियनचे सर्व पदाधिकारी व कामगार तसेच सहयोगी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

PMC Unions | राज्यव्यापी बेमुदत संपास पाठिंबा देण्यासाठी मनपा कामगार संघटना उद्या करणार निदर्शने !

Categories
Breaking News PMC social पुणे महाराष्ट्र

राज्यव्यापी बेमुदत संपास पाठिंबा देण्यासाठी मनपा कामगार संघटना उद्या करणार निदर्शने !

शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचा मागणीसाठी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या संपाला महानगरपालिका कामगार संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहेच. त्याच पार्श्वभूमीवर उद्या म्हणजेच १६ मार्चला संपाला जाहीर पाठिंबा देण्याकरिता संघटनानिदर्शने करणार आहे. असे सर्व संघटनांकडून सांगण्यात आले.
 उद्या दुपारी २ वाजता पुणे महानगरपालिका मुख्य भवनासमोर पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) व इतर सहयोगी संघटनांच्या वतीने निदर्शने केली जाणार आहेत. तरी सर्व कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘एकच मिशन जुनी पेन्शन’ या आपल्या लढ्याला पाठिंबा दयावा. असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे.
पेन्शनसाठी पुकारण्यात आलेल्या संपाला पाठिंबा देणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून सेवकांच्या मागण्यासाठी लक्ष वेधण्यासाठी आम्ही निदर्शने करणार आहोत. त्यानुसार उद्या दुपारी 2 ते 2:30 या वेळेत कार्यालयीन कर्मचारी निदर्शने करतील. तर 2:30 ते 5 या वेळेत सफाई कामगार निदर्शने करणार आहेत.
-आशिष चव्हाण, सरचिटणीस, पीएमसी एम्प्लॉईज युनियन