PMC Solid Waste Management | पालखी मुक्कामी असताना आणि पालखी मार्गस्थ झाल्यानंतरही वारकऱ्यांनी आणि पुणेकरांनी अनुभवली स्वच्छता | घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या व्यवस्थापनामुळे शहर राहिले चकाचक  

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

PMC Solid Waste Management | पालखी मुक्कामी असताना आणि पालखी मार्गस्थ झाल्यानंतरही वारकऱ्यांनी आणि पुणेकरांनी अनुभवली स्वच्छता | घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या व्यवस्थापनामुळे शहर राहिले चकाचक

Palakhi Sohala 2024 – (The Karbhari News Service) – श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी पालखी सोहळा निमित्त दोन्ही पालख्यांचा 30 जून ते 2 जुलै  या कालावधीमध्ये पुणे शहरात मुक्काम होता.  30 जून रोजी पालखीचे पुणे शहरात आगमन झाले व महापालिका आयुक्त यांचेमार्फत पालखीचे स्वागत करण्यात आले. 2 जुलै रोजी पालख्यांचे पंढरपूरकरीता प्रस्थान झाले असून पालख्यांचे आगमन व प्रस्थान दरम्यान पुणे मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. पालखी मार्गस्थ झाल्यानंतर मुक्काम असलेल्या सर्व शाळा, धर्मशाळा, मंदिरे व पालखी मार्ग या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम घेण्यात आली. पालखी कालावधीमध्ये क्षेत्रिय कार्यालयांमार्फत दैनंदिन स्वरूपात शहरात सर्वत्र स्वच्छता विषयक कामे करण्यात आली असून 15 क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण 256  टन कचरा संकलित करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम यांनी दिली. (Sandip Kadam PMC)

घनकचरा विभागाने ही केली कामे

पुणे महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत सर्व सार्वजनिक रस्त्याचे झाडणकाम, क्रॉनिक स्पॉटची स्वच्छता व जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन सर्व क्षेत्रिय कार्यालयाकडून करण्यात आले. संपूर्ण शहरात दिवसातून तीन वेळा सार्वजनिक स्वच्छतेचे कामकाज करण्यात आले.
पुणे शहरात येणा-या वारक-यांच्या सोयीसाठी क्षेत्रिय कार्यालयांच्या मागणीनुसार दि. ३०/०६/२०२४ ते ०२/०७/२०२४ अखेर १५ क्षेत्रिय कार्यालयाच्या मागणीनुसार अंदाजे १८४२ पोर्टेबल व फिरते शौचालय पुरविण्यात आले. तसेच सदरच्या शौचालयांची मनपा
सेवकांमार्फत व सबंधित यंत्रानेद्वारे दिवसातून तीन वेळा स्वच्छता करण्यात आली.
• सार्वजनिक रस्त्यावर, वारकरी मुक्कामी असलेल्या ठिकाणी स्वच्छता राहण्याच्या दृष्टीने सर्व क्षेत्रिय कार्यालयांना आवश्यकतेनुसार सार्वजनिक स्वच्छता विषयक कामकाजा घनकचरा व्यवस्थापन मुख्य विभागाकडून २६२५ लिटर जर्मीक्लीन, ३७५०० किलो
कार्बोलिक पावडर व ११२५० किलो हर्बल वेस्टस्ट्रीट पावडर पुरविण्यात आली.
• पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी व अन्य ठिकाणी जेटिंग मशीनद्वारे सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेची व्यवस्था करण्यात आली.

भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत दोनही पालखी मुक्कामास असल्यामुळे व तेथे वारक-यांची संख्या जास्त असल्यामुळे भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात साफ सफाईचे व स्वच्छतेची कामे होणे करीता अन्य क्षेत्रिय कार्यालयाकडून दि. ३०/०६/२०२४
०२/०७/२०२४ पर्यंत ६० अतिरिक्त सेवकांची नेमणूक करण्यात आली.

• वारकरी मुक्कामास असलेल्या शाळांमध्ये तीन पाळ्यांमध्ये महिला वारक-यांसाठी शौचालय व न्हाणी घराची सोय करण्यात आली.

२०२४ च्या पालखी दरम्यान सर्व क्षेत्रिय कार्यालयांतर्गत महिला वारक-यांकरीता पी एंड जी मार्फत मोफत एकूण ५०००० सॅनिटरी नॅपकीन्स ची वाटप करण्यात आले.

भवानी पेठ कार्यक्षेत्रामध्ये पुणे महानगरपालिका व WRI यांचेमार्फत फूड वेस्ट मनेजमेंटबाबत माहितीपत्रके वाटप करून जनजागृती करण्यात आली.

आरोग्यवारीचे योग्य नियोजन

महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायामुळे समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. संतांनी आपल्या जनजागृती कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात आध्यात्मिक लोकशाही स्थापन केली आहे. वारी ही महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक परंपरा आहे. धर्म, जाती, पंथ, लिंग या पलीकडे जाऊन सर्व समावेशक समाजमन तयार करण्याचे कार्य संतांनी केले आहे. आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून देहू / आळंदी / पंढरपूर येथे दाखल होत असतात. या वारकऱ्यांमध्ये सहभागी होणा-या महिलांची संख्या देखील लक्षणीय असते. या अनुषंगाने मागील दोन वर्षांपासून ‘आरोग्यवारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असून आरोग्यवारीच्या माध्यमातून वारीमध्ये सहभागी होणा-या महिलांना काही मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली आणि त्यानुसार स्थानिक प्रशासन व पोलीस यांच्या मदतीने सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.

या आरोग्य वारीमध्ये पुढीलप्रमाणे नियोजन करण्यात आले

१) वारी काळात दर दहा ते वीस कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय व न्हाणी घराची व्यवस्था करण्यात आली.
२) मोफत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
३) स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली.
४) महिला सुरक्षिततेकरीता महिला हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी/मंदिर परीसरात दर्शनी भागात लावण्यात आले.
श्री. संत तुकाराम महाराज व श्री. संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पालखी निमित्त ३० जून २०२४ रोजी निवडुंग्या विठोबा मंदिर या ठिकाणी आरोग्य वारीच्या उद्घाटनाचा विशेष कार्यक्रम स.११.०० वाजता आयोजित करण्यात आला. यावेळी मा.केंद्रीय राज्यमंत्री श्री. मुरलीधर
मोहोळ, मा. मंत्री महिला व बालविकास श्रीमती अदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
त्याचबरोबर वारकऱ्यांच्या मुक्कामाची सोय करण्यात आलेल्या शहरातील विविध शाळांमध्ये देखील महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यात आले. याठिकाणी महिला हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले व महिला स्त्री रोगतज्ञ व औषध सामुग्री उपलब्ध
करून देण्यात आली. त्याचप्रमाणे महिला सुरक्षा व आरोग्य विषयक जनजागृती करण्यात आली. सर्व क्षेत्रिय कार्यालयांना सार्वजनिक स्वच्छतेचे कामकाज करण्यासाठी आवश्यक असणारे हार्डवेअर साहित्य क्षेत्रिय कार्यालयाच्या मागणीनुसार मुख्य खात्यामार्फत पुरविण्यात आले.

Palakhi Sohala 2024 | पालखी कालावधीत शहरात 1690 पोर्टेबल व फिरते शौचालय पुरविण्यात येणार | महिला वारकऱ्यांसाठी 50000 सॅनेटरी नॅपकिन्स चे वाटप करण्यात येणार | उपायुक्त संदीप कदम यांची माहिती

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

Palakhi Sohala 2024 | पालखी कालावधीत शहरात 1690 पोर्टेबल व फिरते शौचालय पुरविण्यात येणार | महिला वारकऱ्यांसाठी  50000 सॅनेटरी नॅपकिन्स चे वाटप करण्यात येणार  | उपायुक्त संदीप कदम यांची माहिती

| पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागा कडून आषाढी पालखी चे नियोजन तयार

Palakhi Sohala 2024 – (The Karbhari News Service) – श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी पालखी सोहळा, पुणे शहर मार्गे पंढरपूर येथे जाणार आहेत. 30 जून रोजी पुणे शहरात पालखीचे आगमन होणार असून दोन दिवसांच्या मुक्कामानंतर  2 जुलै रोजी सकाळी पालखीचे पुण्यातून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. त्या अनुषंगाने पालखी च्या कालावधीत पालख्यांचे आगमन व प्रस्थान दरम्यान पुणे मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत निजोजन करण्यात आले आहे. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम यांनी दिली. (Pandharpur Aashadhi Wari 2024)
पुणे महानगरपालिकेच्या 15 क्षेत्रिय कार्यालयांतर्गत सर्व सार्वजनिक रस्त्याचे झाडणकाम, क्रॉनिक स्पॉटची स्वच्छता व जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन सर्व क्षेत्रिय कार्यालयाकडून करण्यात आले. संपूर्ण शहरात दिवसातून तीन वेळा सार्वजनिक स्वच्छतेचे कामकाज करण्यात येणार आहे.
भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत स्वच्छता विषयक कामकाज करण्यासाठी अंदाजे एकूण 350 पुरुष सफाई सेवक व 250 महिला सफाई सेविका असे एकूण 600 सफाई सेवक आहेत.
भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात साफ सफाईचे व स्वच्छतेची कामे होणे करीता अन्य क्षेत्रिय कार्यालयाकडून 30 जून  ते 2 जुलै पर्यंत अंदाजे 60
अतिरिक्त सेवकांची नेमणूक करण्यात आली आहे.
भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात 7 जेटींग मशीनद्वारे साफ सफाईचे कामकाज करण्यात आले. तसेच इतर क्षेत्रिय कार्यालयांतर्गत देखील सफाई सेवकांमार्फत व आवश्यकतेनुसार जेटींग मशीनद्वारे सार्वजनिक शौचालये, मुतारी व सर्व सिंगल पोर्टेबल टॉयलेटची (तात्पुरत्या स्वरुपात बसविण्यात आलेले टॉयलेट) स्वच्छता करण्यात येणार आहे.
30 जून ते 2 जुलै अखेर 15 क्षेत्रिय कार्यालयाच्या मागणीनुसार अंदाजे 1690 पोर्टेबल व फिरते शौचालय पुरविण्यात येणार आहे व सदरच्या शौचालयांची मनपा
सेवकांमार्फत व सबंधित यंत्रानेद्वारे दिवसातून तीन वेळा स्वच्छता करण्यात येणार आहे.
भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात महिला वारकन्यांसाठी आवश्यकतेनुसार मनपा शाळेत व खाजगी शाळेत मुक्कामाच्या ठिकाणी शौचालय व महिलांसाठी न्हाणी घराची व्यवस्था करण्यात आली. तसेच अन्य क्षेत्रिय कार्यालयांतर्गत देखील महिला वारक-यांसाठी शौचालय व न्हाणी घराची व्यवस्था करण्यात येणार आहे.

सार्वजनिक रस्त्यावर वारकरी मुक्कामी असलेल्या ठिकाणी स्वच्छता राहण्याच्या दृष्टीने सर्व क्षेत्रिय कार्यालयांना आवश्यकतेनुसार सार्वजनिक स्वच्छता विषयक कामकाजाकरीता घनकचरा व्यवस्थापन मुख्य विभागाकडून 2625 लिटर जर्मीक्लीन, 37500 किलो
कार्बोलिक पावडर व 19250 किलो हर्बल वेस्टस्ट्रीट पावडर पुरविण्यात आले आहे.
महिला वारकऱ्यांसाठी  50000 सॅनेटरी नॅपकिन्स चे वाटप करण्यात येणार आहे (मोफत)
सर्व क्षेत्रिय कार्यालयांना सार्वजनिक स्वच्छतेचे कामकाज करण्यासाठी आवश्यक असणारे हार्डवेअर साहित्य क्षेत्रिय कार्यालयाच्या मागणीनुसार मुख्य खात्यामार्फत पुरविण्यात आले आहे.

Ashadhi Wari Palkhi Sohala 2024 | सुरक्षित आणि हरित पालखी सोहळ्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांचे आदेश 

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

Ashadhi Wari Palkhi Sohala 2024 | सुरक्षित आणि हरित पालखी सोहळ्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांचे आदेश

 

Ashadhi Wari Palkhi Sohala – (The Karbhari News Service) –  आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पाणी, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, रस्ते, रस्ता सुरक्षा, आरोग्य सुविधा आदी सर्व सोयी सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासह सुरक्षित आणि हरित पालखी सोहळ्यासाठी सर्व यंत्रणांनी आतापासून सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले. (Palkhi Sohala 2024)

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्याबाबत पूर्वतयारी आढावा बैठक डॉ. दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते.

यंदा वेळेवर पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असल्याचे सांगून डॉ. दिवसे म्हणाले, पावसाची स्थिती लक्षात घेऊन आवश्यक सुविधा करण्यात याव्यात. पावसाळा लक्षात घेता स्वच्छता आणि आरोग्याचा परस्पर संबंध असल्याने तात्पुरत्या शौचालयाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे. स्वच्छतेच्या नियोजनासाठी स्वतंत्र नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.

पालखी सोहळा जगातील सर्वात शिस्तबद्ध असणारा सोहळा आहे. आपण अशा सोहळ्याचे भागीदार आहोत या भावनेने सोहळ्यासाठी आपले योगदान द्यावे. पालखीला टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या सर्व स्रोतांची तपासणी करावी. आवश्यक ती निर्जंतुकीकरणाची औषधे, दवाखान्यांमध्ये औषधे उपलब्ध ठेवावीत. पाणीपुरवठ्याचे टँकर आणि शौचालयांच्या संख्येत वाढ कण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. पालखीच्या रस्त्यावर कोठे अतिक्रमणे असल्यास ती तात्काळ काढून टाकण्यात यावीत. आपत्कालीन व्यवस्थेसाठी नगरपालिकेकडील लायटिंग टॉवरचा उपयोग पालखी दरम्यान करण्यात यावा, असे निर्देश त्यांनी दिले.

आरोग्य आणि स्वच्छतेशी संबंधित कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेऊन याबाबत आदर्श कार्यपद्धती तयार करावी. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी. शहरातील स्वच्छता आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात यावी. त्यासाठी शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या नियोजनाची यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. स्वच्छता, पिण्याचे शुद्ध पाणी, तात्पुरते शौचालय, आरोग्य तपासणी, पालखी तळाचे सपाटीकरण, इंधन आणि वीज पुरवठा, शोषखड्डे, तात्पुरता निवारा केंद्र, आरोग्य किट आदींची माहिती यावेळी देण्यात आली.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी १ हजार ५००, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी १ हजार आणि संत सोपान महाराज पालखी सोहळ्यासाठी २०० शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार आहे. १४० रुग्णवाहिका आणि ५७ रुग्णवाहिका पथक, ११२ वैद्यकीय अधिकारी, ३३६ आरोग्य अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी २०० टँकरची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी महानगरपालिका, संबंधित उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, अन्न व औषध प्रशासन, महावितरण आदी विभागांकडून पूर्वतयारीचा आढावा घेतला.

बैठकीस श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान, श्री संत तुकाराम महाराज देवस्थान, श्री संत सोपानदेव महाराज देवस्थान, श्री संत चांगावटेश्वर महाराज देवस्थान, श्री निळोबाराय देवस्थान पदाधिकारी, संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, आरोग्य विभाग, पोलीस, अग्निशमन विभाग, पशुसंवर्धन विभाग, परिवहन विभाग, राज्य मार्ग परिवहन महामंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.