Pune News | लोकसहभागातून आळंदीत शंभर खोल्याची इमारत उभारण्यात येणार

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

Pune News | लोकसहभागातून आळंदीत शंभर खोल्याची इमारत उभारण्यात येणार |  चंद्रकांतदादा पाटील

| वारीसाठी उपयोगी साहित्याचे चंद्रकांतदादांच्या उपस्थितीत वाटप

 Pune News | अनेक वारकरी (Warkari) बांधवांची इच्छा असते की, आपला अंतिम काळात श्रीक्षेत्र पंढरपूर(Pandharpur) किंवा आळंदी (Alandi) येथे व्यतित करावा. त्यामुळे अशा वारकरी बांधवांसाठी सुखात राहता यावं; यासाठी लवकरच लोकसहभागातून (Public Participation) आळंदीत शंभर खोल्याची इमारत उभारण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांतदादा पाटील (Chandrkant Patil) यांनी दिली आहे.  आषाढी वारीनंतर चंद्रकांत वांजळे गुरुजींच्या उपस्थित भूमिपूजन करुन, सदर इमारतीच्या कामाची सुरुवात करण्यात येईल अशी घोषणा देखील आज त्यांनी केली. (Pune News)
वारकरी संप्रदायाची एक महत्वाची परंपरा म्हणजे वारीची परंपरा. येत्या काही दिवसातच आषाढी वारीला (Aashadhi Wari) सुरुवात होणार असून कोथरूड परिसरातून देखील मोठ्या प्रमाणावर दिंड्या पंढरपूरसाठी रवाना होणार आहेत.तत्पूर्वी कोथरूड परिसरातील दिंड्यांना आणि भजनी मंडळांना पालकमंत्री  चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वारीसाठी उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संत पूजनाचा सोहळा देखील पार पडले.याप्रसंगी 15 दिंडयाचे प्रमुख, भजनी मंडळ आणि  प्रचंड मोठ्या प्रमाणात वारकरी बांधव उपस्थित होते.   (Pandharpur Aashadhi wari)
  ह. भ. प. भाऊ महाराज परांडे, ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे, अनंत (बाप्पू )सुतार अध्यक्ष ,सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट, साई एज्युकेशन ट्रस्टचे सागर शेडग सर,शैलेश जाधव,अध्यक्ष, विठ्ठल मित्र मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, आषाढी वारीचे महत्त्व सर्वांना समजावून सांगण्यासाठी यंदाच्या आषाढी वारीदरम्यान तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित उत्तम नाट्यप्रयोग पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी होणार आहेत. याचे २४ प्रयोग होणार असून, नाट्यप्रयोगादरम्यान पालखीच्या ठिकाणी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाणार आहेत. त्याचा पहिला प्रयोग श्री क्षेत्र देहू येथे होणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. (Palkhi Sohala)
 संयोजक गिरीश खत्री म्हणाले,आज चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांची सेवा हे कर्तव्य मानून “संतपुजन व वारकरी मंडळांना विशेष वारीसाठी उपयोगी साहित्य वाटप” टाळ, मृदंग, वीणा, तंबू, रेनकोट, बॅग या साहित्याचे वाटप आज होत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रास वारकरी संप्रदायाचा थोर वारसा आहे. आमचे वडील आम्हाला कायम सांगायचे की साधु संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा. आज खोरोखरचं दिवाळी दसरा असल्याची प्रचिती येत आहे.ही सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबाबत दादांचे आभार. (Pune Marathi news)
या सोहळ्याच्या सुरुवातीला ह. भ. प. चंद्रकांत महाराज वांजळे यांचे अतिशय श्रवणीय असे कीर्तन पार पडले.यावेळी ते म्हणाले,  मालक, चालक हे ज्या प्रमाणे महत्वाचे असतात त्याप्रमाणे पालक देखील महत्वाचे असतात. आज हा लॉन्स म्हणजे पंढरीचे वाळवंट असल्याची अनुभूती दादा आणि गिरीश खत्री  यांच्यामुळे येत आहे. चंद्रकांतदादांनी वाटप केलेल्या या साहित्याचा निश्चितच वारकऱ्यांना उपयोग होईल असे ते म्हणाले.
—-
News Title | A hundred-room building will be built in Alandi through public participation  Chandrakantada Patil

Aashadhi Yatra Palkhi Sohala | पालखी सोहळ्यासाठीच्या आरोग्यसेवांचा आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी घेतला आढावा

Categories
Breaking News cultural social आरोग्य पुणे महाराष्ट्र

Aashadhi Yatra Palkhi Sohala | पालखी सोहळ्यासाठीच्या आरोग्यसेवांचा आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी घेतला आढावा

Aadhadhi Yatra Palkhi Sohala | आषाढी एकादशी (Aashadhi Ekadashi) निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखीसोबत (Sant Tukaram Maharaj Palkhi) इतर पालखी सोहळ्यासाठीच्या (Palkhi Sohala) आरोग्यसेवांचा आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत (Health minister Dr Tanaji sawant) यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या बैठकीत आढावा घेतला. (Aashadhi Yatra Palkhi Sohala)
यावेळी अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार व राज्यातील आरोग्य विभागातील सर्व प्रमुख अधिकारी, विभागनिहाय व जिल्हानिहाय आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (Aashadhi Ekadashi)
यावर्षी पालखी प्रस्थान लवकर होणार असल्याने उन्हाळ्याचा त्रास होऊ शकतो. यासाठी पुरेसा ओआरएसचा साठा, औषधे, पिण्याच्या पाण्याचे अधिकाधिक टँकर, पाण्याच्या स्रोतांची, पाण्याची वेळोवेळी तपासणी करावी, रुग्णवाहिकांची संख्या वाढविणे, याचबरोबर आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व आरोग्य पथके, यंत्रणा सज्ज ठेवाव्यात याबाबतीत सूचना डॉ. सावंत यांनी दिल्या. (Palkhi Sohala Health facilities)
पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात औषधांची सुविधा करण्यात आली असल्याची  खात्री करावी. आपत्कालीन १०८ सेवेच्या आणि १०२ सेवेच्या अधिक रुग्णवाहिका नियुक्त करण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले. (Aashadhi wari Palkhi Sohala)
 दुचाकीवरुन सेवा देण्यासाठी आरोग्यदूत सुसज्ज ठेवण्यात येणार आहेत. बाह्यरुग्ण रुग्णवाहिका पथके, ग्रामीण रुग्णालयाची आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची पालखी मुक्काम औषधोपचार केंद्रे, फिरते वैद्यकीय वैद्यकीय पथके अशी सर्व पथके आरोग्य सुविधांसाठी सज्ज करण्यात आली आहेत. अशी माहिती यावेळी उपस्थित  अधिकाऱ्यांनी दिली. (Pandharpur Aashadhi wari)
मंत्री  डॉ. सावंत यांनी दिलेल्या सुचना :
• आषाढी वारीनिमीत्त कृती आराखडा तयार करताना महाराष्ट्रातील सर्व दिंडीमार्ग विचारात घेण्यात यावेत.
• प्रत्येक दिंडीतील वारकऱ्यांची अंदाजे संख्या नियोजन करताना विचारात घ्यावी.
• दिंडी मार्गावर ठराविक अंतरावर पाच-दहा खाटांचे तात्पुरते दवाखाने कार्यान्वित करावे.
• दिंडी मार्गातील सर्व आरोग्य संस्था मनुष्यबळ व औषधीसह सुसज्ज ठेवण्यात यावी.
• दिंडीमध्ये वाढत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या  संख्येनुसार आरोग्य सुविधा वाढविल्या जाव्यात.
• आरोग्य व्यवस्थेतील सर्व जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांची नावे ठळकपणे प्रर्दशित केली जावी.
• सर्व रुग्णवाहिकांची तपासणी करुन औषधी व इतर उपकरणे असल्याची खात्री करावी.
• उष्माघात व इतर आजारांच्या बाबतीत आवश्यक दक्षता घेण्यात यावी.
• नियोजन करतांना दिंडीमार्गाचे लहान गटांमध्ये विभाजन करुन जबाबदार अधिकाऱ्यांची नेमणुक करावी. प्रत्येक गटात संपर्क यंत्रणा प्रभावीपणे राबविण्यात यावी.
• आवश्यक मनुष्यबळ राज्यातील इतर जिल्ह्यातून मागविण्यात यावे.
• आरोग्य विषयक सर्व कार्यक्रमांची माहिती दिंडी मार्गावरील प्रमुख गावामध्ये द्यावी.
• आषाढी पूर्वी दर आठवड्याला पूर्व तयारीचा आढावा घेण्यात यावा.
• दिंडी मार्गातील सर्व रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्र पातळीवर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे कामाचे वेळापत्रक तयार करावे.
• सर्व दिंडी मार्गावर कलापथक/समुपदेशक यांचा माध्यमातून आरोग्य विषयक प्रबोधन करण्यात यावे.
• दिंडी मार्गावरील सर्व जिल्ह्यात व आरोग्य संस्थात औषध व आवश्यक साहित्य सामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध करावी.
0000
News Title | Aashadhi Yatra Palkhi Sohala | Health Minister Dr. Tanaji Sawant reviewed the health services for Palkhi celebration

Pandharpur Ashadhi Wari 2023 | पंढरपूर आषाढी यात्रेसाठी ५००० विशेष बसेस सोडणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Categories
Breaking News cultural Political social महाराष्ट्र

Pandharpur Ashadhi Wari 2023 | पंढरपूर आषाढी यात्रेसाठी ५००० विशेष बसेस सोडणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

| जादा बस वाहतुकीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

 

Pandharpur Ashadhi Wari 2023 | आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Ekadashi) श्रीक्षेत्र पंढरपूरयात्रेकरिता (Pandharpur) वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने (MSRTC) राज्यभरातून ५ हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी  येथे दिले.  २५ जुन ते ०५ जुलै या दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी (२७ जुन रोजी) २०० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. (Pandharpur Ashadhi Wari 2023)

पंढरपूर आषाढी यात्रेसाठी एसटी ने बससेवेसाठी केलेल्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने (MSRTC MD Shekhar Channe) यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

पंढरपूर आषाढी यात्रा (Pandharpur Ashadhi Yatra) हा महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे. यामध्ये एसटीच्या प्रवाशी वाहतुकीला अनन्य साधारण महत्व आहे. याकाळात एसटीकडून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा प्रवाशांना वारकऱ्यांना दिल्या जाव्यात. भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूर पर्यंत घेऊन जाणे तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

आषाढी यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा प्रदेशातून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.यात्रेसाठी सुमारे ५००० गाड्या सोडण्याचे नियोजन एसटी तर्फे करण्यात आले आहे. औरंगाबाद प्रदेशातून १२००, मुंबई ५००, नागपूर १००, पुणे १२००, नाशिक १००० तर अमरावती येथून ७०० अशाप्रकारे यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

चार तात्पूरर्ती बस स्थानके उभारणार

पंढरपूर यात्रेसाठी (Pandharpur wari 2023) राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून बसेस सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान,यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय,संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.


News Title | Pandharpur Ashadhi Wari 2023 | 5000 special buses will leave for Pandharpur Ashadhi Yatra Chief Minister Eknath Shinde| The Chief Minister reviewed the excess bus traffic