Palkhi Sohala 2023 | Pune Traffic Updates | श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

Palkhi Sohala 2023 | Pune Traffic Updates | श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल

Palkhi Sohala 2023 | Pune Traffic Updates  श्री संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi sohala) व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala)  जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे. (Palkhi Sohala 2023 | Pune Traffic Updates)

पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुणे-सासवड-लोणंद मार्गे पंढरपूर अशी जाते. तर संत तुकाराम महाराज पालखी पुणे ते सोलापूर मार्गाने रोटी घाटमार्गे बारामती इंदापूर अकलूज मार्गे पंढरपूरला जाते. या दोन्ही पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी या मार्गावरील वाहतुकीत बदल आवश्यक असल्याने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी १४ ते १८ जून या कालावधीत तर श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी १५ जून ते २४ जुन या कालावधीत पालखी मार्गावरील पालखी मुक्कामाच्या गावांमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले आहेत. तसेच या कालावधीसाठी वाहतूक नियमनाचे आदेश त्यांनी जारी केले आहेत. (Aashadhi wari 2023)

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गातील वाहतुकीत बदल:

पुणे ते सासवड (सासवड मुक्काम) – १४ जूनच्या रात्री २ वाजल्यापासून ते १६ जूनच्या रात्री १२ वाजेपर्यंत पुण्याकडून सासवडकडे दिवे घाट व बोपदेव घाट मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. ही वाहतूक खडीमशीन चौक- कात्रज- कापूरहोळमार्गे सुरू राहील. सासवड बाजूकडून येणारी सर्व वाहतूक गराडे-खेड शिवापूर मार्गे पुण्याकडे येईल. (Pandharpur Aashadhi wari)

सासवड ते जेजुरी (जेजुरी मुक्कम) व जेजुरी ते वाल्हे (वाल्हे मुक्काम) – १६ जून रात्री २ वाजेपासून ते १७ जून रात्री १२ या कालावधीत पुणे येथून सासवड- जेजुरी- वाल्हे- निराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी झेंडेवाडी- पारगाव मेमाणे- सुपे- मोरगांव- नीरा या मार्गाचा वापर करावा.

वाल्हे ते लोणंद (लोणंद मुक्कम)- १८ जून रोजी पहाटे २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुणे येथून सासवड- जेजुरी- वाल्हे- निराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी सासवड- जेजुरी- मोरगांव या पर्यायी मार्गाचा वापर करावा. (Pune Traffic updates)

लोणंद येथून पुढे फलटण मार्गे- १६ ते १८ जून या कालावधीत फलटण- लोणंद येथून पुणे येथे येणारी तसेच पुणे येथून फलटण-लोणंदकडे जाणारी वाहतुक शिरवळ मार्गे जाईल.

श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील पर्यायी वाहतुकीचा मार्ग:

लोणीकाळभोर ते यवत (यवत मुक्काम)- १५ जून रोजी पहाटे २ ते रात्री १२ वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने वाघोली- केसनंद- राहू- पारगांव- चौफुला या मार्गाचा वापर करतील. तसेच सोलापूर बाजूकडून पुण्याकडे येणारी वाहतूक चौफुला- पारगांव- राहू- केसनंद- वाघोली या मार्गाचा वापर करतील. (Aashadhi Ekadashi)

यवत ते वरवंड ( वरवंड मुक्कम)- १६ जून रोजी पहाटे २ ते रात्री १२ वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने थेऊर फाटा- केसनंद- राहू- पारगांव- न्हावरे- काष्टी- दौंड- कुरकुंभ या मार्गे जातील. सोलापूर बाजूकडून येणारी वाहने कुरकुंभ- दौंड- काष्टी- न्हावरे- पारगांव- राहू- केसनंद- वाघोली या मार्गाचा वापर करतील.

वरवंड ते उंडवडी, ता. बारामती (मुक्काम उंडवडी)- १७ जून रोजी पहाटे २ ते रात्री १२ वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने चौफुला- पारगांव- न्हावरे- काष्टी- दौंड- कुरकुंभ या मार्गाचा वापर करतील. तसेच सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे येणारी वाहतूक कुरकुंभ- दौंड- काष्टी- न्हावरे- पारगांव- चौफुला- वाघोली- पुणे या मार्गाचा वापर करतील. (Pandharpur wari 2023)

उंडवडी ते बारामती (बारामती मुक्काम)- १८ जून रोजी पहाटे २ ते रात्री १२ वाजेपर्यंत बारामती ते पाटस व बारामती ते दौंड हे रस्ते बंद राहतील. ही वाहतूक भिगवन मार्गे बारामतीला जाईल. व बारामतीकडून येताना भिगवन मार्गे सोलापूर-पुणे महामार्गावर येईल.

बारामती ते सणसर (सणसर मुक्काम) – १९ जून रोजी पहाटे २ ते रात्री १२ वाजेपर्यंत जंक्शन ते बारामती हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील. वालचंदनगर व इंदापुरकडून येणारी वाहतूक जंक्शन येथून कळस मार्गे बारामती- आष्टी वळविण्यात येईल. बारामतीकडून येताना भिगवन कळस जंक्शन कडे जाईल.

सणसर ते अंथुर्णे (अंथुर्णे मुक्काम) तसेच अंथुर्णे ते निमगांव केतकी (निमगांव केतकी मुक्काम)- २० जून रोजी पहाटे २ ते २१ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत व २१ जून रोजी पहाटे २ ते २२ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बारामतीकडून इंदापूरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने बारामती- कळंब- बावडा- इंदापूर या मार्गे किंवा बारामती- भिगवण- इंदापूर या मार्गे जातील. इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने इंदापूर- बावडा-कळंब- बारामती या मार्गे किंवा इंदापूर- भिगवण- बारामती या मार्गे जातील.

निमगाव केतकी ते इंदापूर (इंदापूर मुक्काम) २२ जून रोजी पहाटे २ ते रात्री १२ वाजेपर्यंत निमगाव केतकीकडून इंदापूरकडे जाणारी वाहतूक बंद राहील. इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक लोणी देवकर- कळस – जंक्शन मार्गे किंवा लोणी- देवकर- भिगवण मार्गे बारामतीकडे जातील.

इंदापूर- २३ जून रोजी पहाटे ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत अकलूजकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक ही अकलूज- बावडा- नातेपुते मार्गे जातील. अकलुजकडून बारामती व पुण्याकडे जाण्याकरीता इंदापूर मुख्य हायवेचा वापर करावा. इंदापूर शहरातील जुना पुणे सोलापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल. त्यावरील वाहतूक मालोजीराजे चौक ते महात्मा फुले चौक अशी बायपासने वळविण्यात येईल.

इंदापूर ते सराटी (सराटी मुक्काम)- २४ जून रोजी पहाटे २ ते रात्री १२ वाजेपर्यंत व २५ जून रोजी पहाटे २ ते दुपारी १२ वाजेपर्यंत इंदापूर ते अकलूज रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील. या मार्गावरील वाहतूक इंदापूर- हिंगणगांव- टेंभुर्णी- गणेशगाव- माळीनगर- अकलूज या मार्गे जातील. तसेच अकलूज ते इंदापूर या मार्गावरील वाहने अकलूज- नातेपुते- वालचंदनगर- जंक्शन- भिगवण या मार्गे जातील.
0000

News Title | Palkhi Sohala 2023 | Pune Traffic Updates | Change in transport for Shri Sant Dnyaneshwar Maharaj and Sant Tukaram Maharaj Palkhi ceremony

Pune News | लोकसहभागातून आळंदीत शंभर खोल्याची इमारत उभारण्यात येणार

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

Pune News | लोकसहभागातून आळंदीत शंभर खोल्याची इमारत उभारण्यात येणार |  चंद्रकांतदादा पाटील

| वारीसाठी उपयोगी साहित्याचे चंद्रकांतदादांच्या उपस्थितीत वाटप

 Pune News | अनेक वारकरी (Warkari) बांधवांची इच्छा असते की, आपला अंतिम काळात श्रीक्षेत्र पंढरपूर(Pandharpur) किंवा आळंदी (Alandi) येथे व्यतित करावा. त्यामुळे अशा वारकरी बांधवांसाठी सुखात राहता यावं; यासाठी लवकरच लोकसहभागातून (Public Participation) आळंदीत शंभर खोल्याची इमारत उभारण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांतदादा पाटील (Chandrkant Patil) यांनी दिली आहे.  आषाढी वारीनंतर चंद्रकांत वांजळे गुरुजींच्या उपस्थित भूमिपूजन करुन, सदर इमारतीच्या कामाची सुरुवात करण्यात येईल अशी घोषणा देखील आज त्यांनी केली. (Pune News)
वारकरी संप्रदायाची एक महत्वाची परंपरा म्हणजे वारीची परंपरा. येत्या काही दिवसातच आषाढी वारीला (Aashadhi Wari) सुरुवात होणार असून कोथरूड परिसरातून देखील मोठ्या प्रमाणावर दिंड्या पंढरपूरसाठी रवाना होणार आहेत.तत्पूर्वी कोथरूड परिसरातील दिंड्यांना आणि भजनी मंडळांना पालकमंत्री  चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वारीसाठी उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संत पूजनाचा सोहळा देखील पार पडले.याप्रसंगी 15 दिंडयाचे प्रमुख, भजनी मंडळ आणि  प्रचंड मोठ्या प्रमाणात वारकरी बांधव उपस्थित होते.   (Pandharpur Aashadhi wari)
  ह. भ. प. भाऊ महाराज परांडे, ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे, अनंत (बाप्पू )सुतार अध्यक्ष ,सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट, साई एज्युकेशन ट्रस्टचे सागर शेडग सर,शैलेश जाधव,अध्यक्ष, विठ्ठल मित्र मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, आषाढी वारीचे महत्त्व सर्वांना समजावून सांगण्यासाठी यंदाच्या आषाढी वारीदरम्यान तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित उत्तम नाट्यप्रयोग पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी होणार आहेत. याचे २४ प्रयोग होणार असून, नाट्यप्रयोगादरम्यान पालखीच्या ठिकाणी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाणार आहेत. त्याचा पहिला प्रयोग श्री क्षेत्र देहू येथे होणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. (Palkhi Sohala)
 संयोजक गिरीश खत्री म्हणाले,आज चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांची सेवा हे कर्तव्य मानून “संतपुजन व वारकरी मंडळांना विशेष वारीसाठी उपयोगी साहित्य वाटप” टाळ, मृदंग, वीणा, तंबू, रेनकोट, बॅग या साहित्याचे वाटप आज होत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रास वारकरी संप्रदायाचा थोर वारसा आहे. आमचे वडील आम्हाला कायम सांगायचे की साधु संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा. आज खोरोखरचं दिवाळी दसरा असल्याची प्रचिती येत आहे.ही सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबाबत दादांचे आभार. (Pune Marathi news)
या सोहळ्याच्या सुरुवातीला ह. भ. प. चंद्रकांत महाराज वांजळे यांचे अतिशय श्रवणीय असे कीर्तन पार पडले.यावेळी ते म्हणाले,  मालक, चालक हे ज्या प्रमाणे महत्वाचे असतात त्याप्रमाणे पालक देखील महत्वाचे असतात. आज हा लॉन्स म्हणजे पंढरीचे वाळवंट असल्याची अनुभूती दादा आणि गिरीश खत्री  यांच्यामुळे येत आहे. चंद्रकांतदादांनी वाटप केलेल्या या साहित्याचा निश्चितच वारकऱ्यांना उपयोग होईल असे ते म्हणाले.
—-
News Title | A hundred-room building will be built in Alandi through public participation  Chandrakantada Patil

Aashadhi Yatra Palkhi Sohala | पालखी सोहळ्यासाठीच्या आरोग्यसेवांचा आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी घेतला आढावा

Categories
Breaking News cultural social आरोग्य पुणे महाराष्ट्र

Aashadhi Yatra Palkhi Sohala | पालखी सोहळ्यासाठीच्या आरोग्यसेवांचा आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी घेतला आढावा

Aadhadhi Yatra Palkhi Sohala | आषाढी एकादशी (Aashadhi Ekadashi) निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखीसोबत (Sant Tukaram Maharaj Palkhi) इतर पालखी सोहळ्यासाठीच्या (Palkhi Sohala) आरोग्यसेवांचा आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत (Health minister Dr Tanaji sawant) यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या बैठकीत आढावा घेतला. (Aashadhi Yatra Palkhi Sohala)
यावेळी अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार व राज्यातील आरोग्य विभागातील सर्व प्रमुख अधिकारी, विभागनिहाय व जिल्हानिहाय आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (Aashadhi Ekadashi)
यावर्षी पालखी प्रस्थान लवकर होणार असल्याने उन्हाळ्याचा त्रास होऊ शकतो. यासाठी पुरेसा ओआरएसचा साठा, औषधे, पिण्याच्या पाण्याचे अधिकाधिक टँकर, पाण्याच्या स्रोतांची, पाण्याची वेळोवेळी तपासणी करावी, रुग्णवाहिकांची संख्या वाढविणे, याचबरोबर आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व आरोग्य पथके, यंत्रणा सज्ज ठेवाव्यात याबाबतीत सूचना डॉ. सावंत यांनी दिल्या. (Palkhi Sohala Health facilities)
पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात औषधांची सुविधा करण्यात आली असल्याची  खात्री करावी. आपत्कालीन १०८ सेवेच्या आणि १०२ सेवेच्या अधिक रुग्णवाहिका नियुक्त करण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले. (Aashadhi wari Palkhi Sohala)
 दुचाकीवरुन सेवा देण्यासाठी आरोग्यदूत सुसज्ज ठेवण्यात येणार आहेत. बाह्यरुग्ण रुग्णवाहिका पथके, ग्रामीण रुग्णालयाची आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची पालखी मुक्काम औषधोपचार केंद्रे, फिरते वैद्यकीय वैद्यकीय पथके अशी सर्व पथके आरोग्य सुविधांसाठी सज्ज करण्यात आली आहेत. अशी माहिती यावेळी उपस्थित  अधिकाऱ्यांनी दिली. (Pandharpur Aashadhi wari)
मंत्री  डॉ. सावंत यांनी दिलेल्या सुचना :
• आषाढी वारीनिमीत्त कृती आराखडा तयार करताना महाराष्ट्रातील सर्व दिंडीमार्ग विचारात घेण्यात यावेत.
• प्रत्येक दिंडीतील वारकऱ्यांची अंदाजे संख्या नियोजन करताना विचारात घ्यावी.
• दिंडी मार्गावर ठराविक अंतरावर पाच-दहा खाटांचे तात्पुरते दवाखाने कार्यान्वित करावे.
• दिंडी मार्गातील सर्व आरोग्य संस्था मनुष्यबळ व औषधीसह सुसज्ज ठेवण्यात यावी.
• दिंडीमध्ये वाढत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या  संख्येनुसार आरोग्य सुविधा वाढविल्या जाव्यात.
• आरोग्य व्यवस्थेतील सर्व जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांची नावे ठळकपणे प्रर्दशित केली जावी.
• सर्व रुग्णवाहिकांची तपासणी करुन औषधी व इतर उपकरणे असल्याची खात्री करावी.
• उष्माघात व इतर आजारांच्या बाबतीत आवश्यक दक्षता घेण्यात यावी.
• नियोजन करतांना दिंडीमार्गाचे लहान गटांमध्ये विभाजन करुन जबाबदार अधिकाऱ्यांची नेमणुक करावी. प्रत्येक गटात संपर्क यंत्रणा प्रभावीपणे राबविण्यात यावी.
• आवश्यक मनुष्यबळ राज्यातील इतर जिल्ह्यातून मागविण्यात यावे.
• आरोग्य विषयक सर्व कार्यक्रमांची माहिती दिंडी मार्गावरील प्रमुख गावामध्ये द्यावी.
• आषाढी पूर्वी दर आठवड्याला पूर्व तयारीचा आढावा घेण्यात यावा.
• दिंडी मार्गातील सर्व रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्र पातळीवर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे कामाचे वेळापत्रक तयार करावे.
• सर्व दिंडी मार्गावर कलापथक/समुपदेशक यांचा माध्यमातून आरोग्य विषयक प्रबोधन करण्यात यावे.
• दिंडी मार्गावरील सर्व जिल्ह्यात व आरोग्य संस्थात औषध व आवश्यक साहित्य सामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध करावी.
0000
News Title | Aashadhi Yatra Palkhi Sohala | Health Minister Dr. Tanaji Sawant reviewed the health services for Palkhi celebration

Pandharpur Aashadhi wari palkhi sohala | सोलापूर, पुणे व सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना निर्मल वारीसाठी ४ कोटी २१ लाख रुपये

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

Pandharpur Aashadhi wari palkhi sohala| सोलापूर, पुणे व सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना निर्मल वारीसाठी ४ कोटी २१ लाख रुपये

Pandharpur Aashadhi wari palkhi sohala| सोलापूर, पुणे व सातारा जिल्ह्यातील (Solapur, pune, Satara District) पालखी मार्गातील ग्रामपंचायतींना निर्मल वारीसाठी (Nirmal Wari) ४ कोटी २१ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यामध्ये वारी ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमधून जाणार आहे, त्या ग्रामपंचायतीतील स्वच्छता राखणे व भाविकांना सुविधा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचातींवर असणार आहे. (Pandharpur Aashadhi Wari palkhi sohala)

 

आषाढी एकादशी (Aashadhi Ekadashi) निमित्त पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांसोबत असणाऱ्या भाविकांना स्वच्छता – सुविधा पुरविण्यासाठी मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था करण्याच्या कामांसाठी २१ कोटी रूपये निधीस मंजुरी देण्यात आली असल्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन (Rural devlopment minister Girish Mahajan)  यांनी सांगितले.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी दरवर्षी पायी चालत पंढरपूरला जात असतात, यामध्ये विविध दिंड्यांचाही सहभाग असतो.पालखी सोहळ्यात अनेक ठिकाणी मुक्काम केला जातो. या ठिकाणी वारकऱ्यांना शासनाच्या वतीने सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून ही तरतूद करण्यात आली आहे. (Aashadhi ekadashi)

पालखी सोहळ्यातील संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सोपान काका महाराज या प्रमुख पालख्यांचा प्रवास जवळपास २२ दिवसांपेक्षा जास्त दिवसांचा असतो. वारकऱ्यांना मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले. (Aashadhi wari palkhi sohala)

 

पुणे जिल्हा परिषदेला १७ कोटी ६४ लाख रुपये निधीस मान्यता

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, या निधी मधून संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकोबाराय व संत सोपान देव या पालख्यांसोबत असणाऱ्या भाविकांसाठी तात्पुरते शौचालय, निवारा व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद, पुणे यांनी चालू वर्षात आषाढी वारीनिमित्त शासनास सादर केलेल्या १७ कोटी ६४ लाख रुपये इतक्या निधीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.


News Title | Pandharpur Aashadhi wari palkhi sohala| 4 crore 21 lakhs for Nirmal Vari to Gram Panchayats of Solapur, Pune and Satara districts

palkhi sohala 2023 | पालखी सोहळ्याची पुणे जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी | पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाणून घ्या

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

palkhi sohala 2023 | पालखी सोहळ्याची पुणे जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी

पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या सुविधा पुरविण्यावर विशेष भर

palkhi sohala 2023 | आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त (Aashadhi wari palkhi sohala) पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Pune Guardian minister Chandrakant patil) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा प्रशासनाने (Pune District Administration) स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच आरोग्याच्यादृष्टीने जय्यत तयारी केली आहे. १०६ टँकरने पालखीमध्ये पाणीपुरवठा करण्यात येणार असून पालखी मुक्कामाच्या ठिकाणी दरदिवशी तब्बल २ हजार ७०० शौचालयांच्या व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. (Aashadhi Wari Palkhi Sohala)

यावर्षी अधिक महिना आल्यामुळे सुमारे एक महिना अगोदर पालखीचे प्रस्थान होत आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान (Sant Dnyaneshwar Maharaj palkhi sohala) सोहळा ११ जून रोजी तर श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा (Sant Tukaram Maharaj palkhi sohala) १० जून रोजी होणार आहे.

| पालखी सोहळ्याचे वेळापत्रक (Palkhi sohla Timetable)

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा ११ जून रोजीचा मुक्काम दर्शन मंडप इमारत आळंदी संस्थान येथे, १२ व १३ जून रोजी पालखी विठोबा मंदीर भवानीपेठ पुणे येथे, १४ व १५ जून रोजी सासवड, १६ जून रोजी जेजुरी, १७ जून रोजी वाल्हे येथे मुक्काम असणार असून १८ रोजी नीरा येथून सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. तर श्री संत तुकाराम महाराज यांची पालखीचा मुक्काम १० जून रोजी ईनामदार साहेब वाडा देहू येथे, ११ जून रोजी आकुर्डी, १२ व १३ जून रोजी नानापेठ, पुणे, १४ जून लोणी काळभोर, १५ जून यवत, १६ जून रोजी वरवंड, १७ जून रोजी उंडवडी गवळ्याची, १८ जून बारामती, १९ जून सणसर, २० जून आंथुर्णे, २१ जून निमगाव केतकी, २२ जून इंदापूर, २३ जून रोजी सराटी येथे मुक्काम असणार असून २४ जून रोजी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. (Palkhi sohla Timetable)

काय सुविधा असतील?

उन्हाच्या कालावधीत पालखी सोहळा असल्यामुळे पुरेशा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याला प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी ५४ टँकर देण्यात येणार असून २९ टँकर भरणा ठिकाणे निश्चित केली आहेत. श्री संत तुकाराम महाराज पालखीसाठी ४५ टँकर आणि १६ टँकर भरणा ठिकाणे, श्री संत सोपानकाका महाराज पालखीसाठी ३ टँकर, श्री संत चैतन्य महाराज पालखी आणि श्री संत चांगावटेश्वर महाराज पालखीसाठी प्रत्येकी २ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासोबतच पालखीमार्गावरील गावातील पाण्याचे स्रोत शुद्धीकरण करण्यात येत आहे. ठिकठिकाणी पाण्याचे नमुने घेऊन पाणी शुद्धतेची खात्री करण्यात येणार आहे. (Aashadhi Wari palkhi soahala 2023)

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ४ दिवस अगोदरच शौचालयांची उभारणी करण्यात येणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी १ हजार ५०० शौचालये उभारण्यात येणार आहेत. संत तुकाराम महाराज पालखीसाठी १ हजार तर संत सोपानकाका महाराज पालखीसाठी २०० शौचालये उभारण्यात येणार आहेत. शौचालयांच्या ठिकाणी नियमित पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येणार असून वापरानंतर स्वच्छतेसाठी जास्तीत जास्त स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. (Aashadi wari palkhi sohala news)

आरोग्य विभागाच्या माध्यमातून वारकऱ्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे, फिरत्या आरोग्य पथकाच्या माध्यमातून आपत्कालीन वैद्यकीय सेवा देणे, दोन्ही पालखीच्या १ किलोमीटर अंतराच्या आत १०८ रुग्णवाहिका सेवेच्या प्रत्येकी १५ रुग्णवाहिका व १०२ सेवेच्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी ३५ व संत तुकाराम महाराज पालखीसाठी ७५ रुग्णवाहिका कायम सज्ज ठेवण्यात येणार आहेत. (Palkhi soahala marathi news)

आरोग्याविषयक सुविधा कशी असेल?

उन्हाचा त्रास लक्षात घेता सर्व आरोग्य पथकांच्या ठिकाणी पुरेसा ओआरएसचा साठा, औषध साठा ठेवण्यात येत आहे. दिवे घाट चढणीनंतर भाविकांना त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन झेंडेवाडी विसावा परिसरात स्त्री व पुरुषांसाठी प्रत्येकी ५ अशा एकूण १० खाटांच्या विशेष आंतररुग्ण कक्षाची उभारणी करण्यात येणार आहे.

दर २ किलोमीटरवर ८७ बाह्यरुग्ण रुग्णवाहिका पथकांमार्फत रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. यापैकी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी २९ तर संत तुकाराम महाराज पालखीसाठी ५८ बाह्यरुग्ण रुग्णवाहिका पथके नेमण्यात येणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी ३ त संत तुकाराम महाराज पालखीसाठी ५ अशी एकूण ८ ग्रामीण रुग्णालयांची पालखी मुक्काम औषधोपचार केंद्रे असणार आहेत. त्याचप्रमाणे अनुक्रमे ५ आणि ११ अशी एकूण १६ प्राथमिक आरोग्य केंद्रांची पालखी मुक्काम औषधोपचार केंद्रे असणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी १० त संत तुकाराम महाराज पालखीसाठी २३ अशा एकूण ३३ औषधोपचार उपकेंद्रातून वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. याशिवाय दोन्ही पालख्यांसाठी प्रत्येकी १ फिरते वैद्यकीय पथक कायम बरोबर असणार आहे. या कालावधीत पालखी सोहळा मार्गावरील खासगी रुग्णालयातील १० टक्के खाटा राखीव ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


News Title |palkhi sohala 2023 | Successful preparation of Palkhi ceremony by Pune district administration Know the schedule of Palkhi ceremony