palkhi sohala 2023 | पालखी सोहळ्याची पुणे जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी | पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाणून घ्या

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

palkhi sohala 2023 | पालखी सोहळ्याची पुणे जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी

पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या सुविधा पुरविण्यावर विशेष भर

palkhi sohala 2023 | आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त (Aashadhi wari palkhi sohala) पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Pune Guardian minister Chandrakant patil) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा प्रशासनाने (Pune District Administration) स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच आरोग्याच्यादृष्टीने जय्यत तयारी केली आहे. १०६ टँकरने पालखीमध्ये पाणीपुरवठा करण्यात येणार असून पालखी मुक्कामाच्या ठिकाणी दरदिवशी तब्बल २ हजार ७०० शौचालयांच्या व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. (Aashadhi Wari Palkhi Sohala)

यावर्षी अधिक महिना आल्यामुळे सुमारे एक महिना अगोदर पालखीचे प्रस्थान होत आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान (Sant Dnyaneshwar Maharaj palkhi sohala) सोहळा ११ जून रोजी तर श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा (Sant Tukaram Maharaj palkhi sohala) १० जून रोजी होणार आहे.

| पालखी सोहळ्याचे वेळापत्रक (Palkhi sohla Timetable)

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा ११ जून रोजीचा मुक्काम दर्शन मंडप इमारत आळंदी संस्थान येथे, १२ व १३ जून रोजी पालखी विठोबा मंदीर भवानीपेठ पुणे येथे, १४ व १५ जून रोजी सासवड, १६ जून रोजी जेजुरी, १७ जून रोजी वाल्हे येथे मुक्काम असणार असून १८ रोजी नीरा येथून सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. तर श्री संत तुकाराम महाराज यांची पालखीचा मुक्काम १० जून रोजी ईनामदार साहेब वाडा देहू येथे, ११ जून रोजी आकुर्डी, १२ व १३ जून रोजी नानापेठ, पुणे, १४ जून लोणी काळभोर, १५ जून यवत, १६ जून रोजी वरवंड, १७ जून रोजी उंडवडी गवळ्याची, १८ जून बारामती, १९ जून सणसर, २० जून आंथुर्णे, २१ जून निमगाव केतकी, २२ जून इंदापूर, २३ जून रोजी सराटी येथे मुक्काम असणार असून २४ जून रोजी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. (Palkhi sohla Timetable)

काय सुविधा असतील?

उन्हाच्या कालावधीत पालखी सोहळा असल्यामुळे पुरेशा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याला प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी ५४ टँकर देण्यात येणार असून २९ टँकर भरणा ठिकाणे निश्चित केली आहेत. श्री संत तुकाराम महाराज पालखीसाठी ४५ टँकर आणि १६ टँकर भरणा ठिकाणे, श्री संत सोपानकाका महाराज पालखीसाठी ३ टँकर, श्री संत चैतन्य महाराज पालखी आणि श्री संत चांगावटेश्वर महाराज पालखीसाठी प्रत्येकी २ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासोबतच पालखीमार्गावरील गावातील पाण्याचे स्रोत शुद्धीकरण करण्यात येत आहे. ठिकठिकाणी पाण्याचे नमुने घेऊन पाणी शुद्धतेची खात्री करण्यात येणार आहे. (Aashadhi Wari palkhi soahala 2023)

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ४ दिवस अगोदरच शौचालयांची उभारणी करण्यात येणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी १ हजार ५०० शौचालये उभारण्यात येणार आहेत. संत तुकाराम महाराज पालखीसाठी १ हजार तर संत सोपानकाका महाराज पालखीसाठी २०० शौचालये उभारण्यात येणार आहेत. शौचालयांच्या ठिकाणी नियमित पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येणार असून वापरानंतर स्वच्छतेसाठी जास्तीत जास्त स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. (Aashadi wari palkhi sohala news)

आरोग्य विभागाच्या माध्यमातून वारकऱ्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे, फिरत्या आरोग्य पथकाच्या माध्यमातून आपत्कालीन वैद्यकीय सेवा देणे, दोन्ही पालखीच्या १ किलोमीटर अंतराच्या आत १०८ रुग्णवाहिका सेवेच्या प्रत्येकी १५ रुग्णवाहिका व १०२ सेवेच्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी ३५ व संत तुकाराम महाराज पालखीसाठी ७५ रुग्णवाहिका कायम सज्ज ठेवण्यात येणार आहेत. (Palkhi soahala marathi news)

आरोग्याविषयक सुविधा कशी असेल?

उन्हाचा त्रास लक्षात घेता सर्व आरोग्य पथकांच्या ठिकाणी पुरेसा ओआरएसचा साठा, औषध साठा ठेवण्यात येत आहे. दिवे घाट चढणीनंतर भाविकांना त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन झेंडेवाडी विसावा परिसरात स्त्री व पुरुषांसाठी प्रत्येकी ५ अशा एकूण १० खाटांच्या विशेष आंतररुग्ण कक्षाची उभारणी करण्यात येणार आहे.

दर २ किलोमीटरवर ८७ बाह्यरुग्ण रुग्णवाहिका पथकांमार्फत रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. यापैकी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी २९ तर संत तुकाराम महाराज पालखीसाठी ५८ बाह्यरुग्ण रुग्णवाहिका पथके नेमण्यात येणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी ३ त संत तुकाराम महाराज पालखीसाठी ५ अशी एकूण ८ ग्रामीण रुग्णालयांची पालखी मुक्काम औषधोपचार केंद्रे असणार आहेत. त्याचप्रमाणे अनुक्रमे ५ आणि ११ अशी एकूण १६ प्राथमिक आरोग्य केंद्रांची पालखी मुक्काम औषधोपचार केंद्रे असणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी १० त संत तुकाराम महाराज पालखीसाठी २३ अशा एकूण ३३ औषधोपचार उपकेंद्रातून वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. याशिवाय दोन्ही पालख्यांसाठी प्रत्येकी १ फिरते वैद्यकीय पथक कायम बरोबर असणार आहे. या कालावधीत पालखी सोहळा मार्गावरील खासगी रुग्णालयातील १० टक्के खाटा राखीव ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


News Title |palkhi sohala 2023 | Successful preparation of Palkhi ceremony by Pune district administration Know the schedule of Palkhi ceremony

Palkhi Sohala 2023 | अशुद्ध पाण्याने वारकऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ देऊ नका | वारकऱ्यांची पुणे महापालिकेकडे मागणी

Categories
Breaking News cultural पुणे महाराष्ट्र

Palkhi Sohala 2023 | अशुद्ध पाण्याने वारकऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ देऊ नका | वारकऱ्यांची पुणे महापालिकेकडे मागणी

| श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाजाची महापालिकेकडे मागणी

 

Palkhi Sohala 2023 | संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजाचा (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi sohala) आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा (Sant Tukaram Maharaj palakhi sohala) दि.१२ जून व १३ जून रोजी पुणे (Pune) मुक्कानी येणार आहे. या सोहळ्यात पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) विविध मूलभूत सुविधा देण्यात येतात. मात्र मागील वर्षी वारकऱ्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाजाने महापालिकेकडे विविध मागण्या केल्या आहेत. (Palkhi Sohala 2023)


पुणे महापालिकेकडे (PMC Pune) या केल्या आहेत मागण्या 

१. शुध्द पाणी पुरवठा २ दिवसाच्या मुक्कामाच्या वेळेत शुध्द व अखंडीत पाणी पुरवठा व्हावा. मागील वर्षी कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत होता. वारकऱ्यांना  खाजगी टँकरने पाणी विकत घ्यावे लागले.
२. विजपुरवठा खंडीत होऊ नये.

३. वारकऱ्यांना १० रुपयामध्ये पाण्याच्या बाटल्या वितरकाकडून विकल्या जात होत्या. त्यामध्ये अशुध्द पाणी पुरवठा केला गेला. त्यातील अशुध्द पाण्यामुळे वारकन्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला. अन्न
व प्रशासन विभागाने आरोग्य खात्याने दक्षता घ्यावी.
४. पुणे महानगरपालीकेच्यावतीने दिंडी प्रमुखांना वस्तु भेट दिल्या जातात. त्याऐवजी दिंडी प्रमुखांना एक श्रीफळ द्यावे. भेट वस्तुवर खर्च करण्याऐवजी पुणे ते वेळापुर १० पाण्याचे टँकर द्यावे. यावर्षी एक महिना लवकर धारीचा काळ आहे. हवामान खात्याने पाऊस उशीर होणार असे भाकित केलेले आहे.
५. सार्वजनिक शौचालयात कायम स्वच्छता राखावी. निर्जंतुक  पावडरचा जास्त वापर करावा. पुरेशा प्रमाणात स्वच्छक सेवक नेमावेत. सार्वजनिक शौचालयामध्ये स्वच्छता केली जात नाही.
६. रस्ते दुरुस्ती पुणे शहर, हडपसर ते दिवे घाटापर्यंत विशेषत: हडपसर परीसरामध्ये जास्त प्रमाणात रस्ता नादुरुस्त अवस्थेमध्ये आहे.
७. अतिक्रमणे पालखी सोहळा मार्गावरील अतिक्रमणे काढुन टाकावीत. काही ठिकाणे सार्वजनिक मंडळे मंडप किंवा स्टेज उभारुन वारकऱ्यांचे स्वागत करतात.
स्पिकर मोठया आवाजात लावतात. त्यामुळे भजनामध्ये व्यत्यय येतो. तसेच मंडप परीसरामध्ये कार्यकर्त्यांची गर्दी होत असते.
८. पालखी रथ येण्या आधी रस्त्यावर व प्रत्येक चोकामध्ये भाविक पुढे येऊन रस्त्यावर गर्दी करतात त्यामुळे पालखी सोहळा मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर होतो. उदा. – श्र संत ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक, डेक्कन जिमखाना,
लक्ष्मी रोड, या ठिकाणी भाविक मोठया संख्येने रस्तयावर गर्दी करतात. त्यावर प्रशासनाने नियंत्रण ठेवावे.
महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांच्या वतीने  कळकळीची विनंती कि सासवड ते वेळापुर १० टँकर पुणे महानगर पालीकेने द्यावेत कारण हवामान खात्याने पाऊस उशीर यणार असे भाकीत केलेले आहे. पाण्याचे १० टँकर देण्यास विनंती आहे. वारकऱ्यांना सहकार्य करावे, असे निवेदनात म्हटले आहे.
Palkhi Sohala 2023 |  Don’t let impure water affect your health  : Demand of warkaris  to Pune Municipal Corporation

Palkhi sohala 2023 Marathi news | पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे |  जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

Categories
Breaking News cultural PMC social पुणे महाराष्ट्र

Palkhi sohala 2023 Marathi news | पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे |  जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

Palkhi sohala 2023 Marathi news |  आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी (Ashadhi Wari palkhi sohala)  पाणी, शौचालय, वाहतूक व्यवस्था, रस्ते, आरोग्य सुविधा आदी सर्व सोयी सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासह पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. (Palkkhi sohala 2023)

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान (Sant Tukaram Maharaj palkhi sohala) आणि संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्याबाबत (Sant Dnyaneshwar Maharaj palkhi sohala) पूर्वतयारी आढावा बैठक डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे शहर विशेष शाखेचे पोलीस उपयुक्त ए. राजा, पिंपरी चिंचवड परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त विवेक पाटील, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कदम, श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त ॲड. विकास ढगे-पाटील, श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. माणिक मोरे आदी उपस्थित होते.

यंदा दरवर्षीपेक्षा एक महिना अगोदर पालखी सोहळा होत आहे त्यामुळे सर्व विभागांनी संपूर्ण तयारी गतीने करावी, असे सांगून डॉ. देशमुख म्हणाले, यंदा भारतीय हवामानशास्त्र विभागाने अल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड मनपा, नगरपरिषदा तसेच सर्व स्थानिक यंत्रणांनी पाणीपुरवठ्याबाबत दक्ष रहावे. पालखी जूनमध्ये निघणार असल्याने उष्णतेचा घटकही लक्षात घेणे गरजेचे आहे. (Sant Tukaram maharaj palkhi sohala)

जिल्ह्यातील पालखी सोहळा हा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक सोहळा असून सर्वांच्या सहभागातून शांततेत, आनंदात व सौहार्दात हा सोहळा यशस्वी करू. भाविकांची कोणतीही अडचण होणार नाही यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी पालखी मार्ग, पालखी तळ, विसाव्यांची संयुक्त्त पाहणी केली आहे. पालखी सोहळा प्रमुखांसमवेत समन्वयाने काम सुरू आहे. पाहणी आणि बैठकीत निदर्शनास आलेल्या बाबींच्या अनुषंगाने सर्व संबंधित विभागांनी आपापल्या विभागांकडील कामे तातडीने पूर्ण करून घ्यावीत. (Sant Dnyaneshwar Maharaj palkhi sohala)

पाणीपुरवठ्याचे टँकर आणि शौचालयांच्या संख्येत गतवर्षीपेक्षा वाढ करण्यात येईल. पालखीला टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या सर्व स्रोतांची तपासणी करावी. आवश्यक ती निर्जंतुकीकरणाची औषधे, दवाखान्यांमध्ये औषधे उपलब्ध ठेवावीत. पालखीच्या रस्त्यावर कोठे अतिक्रमणे असल्यास ती तात्काळ काढून टाकण्यात यावीत असे निर्देश त्यांनी दिले. (Palkhi sohala marathi news)

पोलीस अधीक्षक श्री. गोयल म्हणाले, पालखीसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येईल. पालखी सोहळ्याच्या मार्गावरील वाहतूक वळविण्याबाबत अगोदर पूर्वप्रसिद्धी करण्यात येईल. पालखी सोहळा व्यवस्थापकांनीही पुरेसे स्वयंसेवक नेमावेत, अशीही सूचना श्री. गोयल यांनी केली.

बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनीक बांधकाम विभागाचे अभियंता, अन्न व औषध प्रशासन, महावितरण आदी विभागांकडून पूर्वतयारीचा आढावा घेतला.

बैठकीस श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान, श्री संत तुकाराम महाराज देवस्थान, श्री संत सोपानदेव महाराज देवस्थान, श्री संत चांगावटेश्वर महाराज देवस्थान पदाधिकारी, उपविभागांचे प्रांताधिकारी, संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, महानगरपालिका, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, आरोग्य विभाग, पोलीस, अग्निशमन विभाग, पशुसंवर्धन विभाग, परिवहन विभाग, राज्य मार्ग परिवहन महामंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.