Dispute on PMC Budget : कायदेशीर अडचण; तरीही अंदाजपत्रक सादर करण्याचा स्थायी समिती अध्यक्षांचा अट्टहास! 

Categories
Breaking News PMC Political पुणे

कायदेशीर अडचण; तरीही अंदाजपत्रक सादर करण्याचा स्थायी समिती अध्यक्षांचा अट्टहास! 

पुणे – महापालिका आयुक्तांनी (Municipal Commissioner) स्थायी समितीसमोर अंदाजपत्रक (Budget) मांडल्यानंतर आज स्थायी समितीच्या बैठकीत (Standing Committee Meeting) त्यांचे अंदाजपत्रक मांडण्यासाठी अधिकार (Rights) देण्याच्या प्रस्तावावर (Proposal) चर्चा होणार आहे. मात्र, वर्षानुवर्षे हे अधिकार एकमताने अध्यक्षांना (Chairman) दिले जात आहेत, पण यंदा विरोधकांनी अधिकार देण्यास विरोध केल्याने बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यता आहे. महापालिका कायद्यानुसार मुख्य सभेची तयारी करण्यासाठी 8 दिवस अगोदर नोटीस द्यावी लागते. पण इथे अजून तशी कुठली प्रक्रिया पार पडलेली नाही. शिवाय कालावधी 14 मार्च ला संपणार आहे. असे असतानाही स्थायी समिती अध्यक्ष बजेट सादर करण्याचा अट्टाहास का करत आहेत, याबाबत विरोधकांकडून आरोप होत आहेत.

महापालिकेची मुदत १४ मार्च रोजी संपणार आहे, पण तरीही कायदेशीरदृष्ट्या स्थायी समिती अध्यक्षांना अंदाजपत्रक मांडता येते अशी भूमिका भाजपने घेतली आहे. तर नगरसेवक पदाची मुदतच संपणार असेल तर स्थायी समितीची अस्तित्व राहत नाही, त्यामुळे अंदाजपत्रक मांडण्याचे अधिकार राहत नाहीत, अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी  ८५९२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. त्यात स्थायी अध्यक्ष त्यांचे अंदाजपत्रक तयार करतात. हे अधिकार विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांना देण्यात येणार आहेत. भाजप हा प्रस्ताव बहुमताने देखील मंजूर करू शकतो. पण या बैठकीत विरोधकांकडून जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे. दरम्यान यावर नगरसचिव विभाग कुठली भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Budget of PMC : महापालिका आयुक्तांनी सादर केले 8 हजार 592 कोटींचे अंदाजपत्रक  : समाविष्ट 23 गावांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देणार : विक्रम कुमार 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिका आयुक्तांनी सादर केले  8 हजार 592 कोटींचे अंदाजपत्रक 

: समाविष्ट 23 गावांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देणार : विक्रम कुमार 

पुणे : महापालिका आयुक्त विक्रम कुमार  (pune municipal commissioner vikram kumar)यांनी आज पुणे महापालिकेच्या २०२२-२३ चे अंदाजपत्रक (Budget) स्थायी समितीला सादर केले. तब्बल ८५९२ कोटींचे अंदाजपत्रक तयार केले असून, त्यामध्ये ४८८१ कोटीची महसुली कामे तर ३७१० कोटी भांडवली प्रस्तावित केले आहेत. गेल्या वर्षी आयुक्तांनी ७६५० कोटीचे अंदाजपत्रक तयार केले होते. यात यंदा सुमारे हजार कोटीची वाढ केली आहे. तर स्थायी समितीच्या बजेटमध्ये 222 कोटींची वाढ आयुक्तांनी केली आहे. दरम्यान आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले कि बजेटच्या माध्यमातून समाविष्ट 23 गावांच्या मूलभूत सुविधांवर भर देण्यात येणार आहे. तसेच ppp माध्यमातून जास्तीत जास्त विकासकामे करण्यात येतील.

: कात्रज -कोंढवा रोड मार्गी लावणार

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले कि यावर्षी काहीही करून कात्रज कोंढवा रोड मार्गी लावण्यात येईल. किमान त्याचे काही स्ट्रेचेस तरी पूर्ण करण्यात येतील. त्यासाठी आम्ही चांगल्या पद्धतीने प्रयत्न करणार आहोत. आयुक्त म्हणाले, प्रॉपर्टी टॅक्स मधून 2100 कोटी वसूल केले जातील. तसेच संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून जास्तीत जास्त कामे केली जातील 

: अशा आहेत प्रमुख तरतुदी

शहरातील वाहतुकीचा प्रश्न विचारात घेऊन आयुक्तांनी विश्रांतवाडी येथे राष्ट्रीय मार्ग योजनेअंतर्गत उड्डाणपूल करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्याचप्रमाणे सिंहगड रस्ता सन सिटी येथून ते कर्वेनगर मधील पूल बांधणे, पाषण पंचवटी येथून कोथरूड पर्यंत बोगदा तयार करणे, खराडी बायपास येथे उड्डाण पूल बांधणे, यासह कल्याणी कल्याणीनगर ते कोरेगाव होणाऱ्या पुलाचे काम करणे यासह नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविणे यासाठी 669 कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात केली आहे. पथ विभागासाठी 514 कोटींची भांडवली तरतूद केली आहे. शहरांमध्ये दहा किलोमीटर लांबीचे सायकल ट्रॅक तयार करणे, मध्यवर्ती पेठांमधील लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, शिवाजी रस्ता डांबरीकरण करणे. अर्बन स्ट्रिट प्रोग्राम अंतर्गत पाच रस्त्यांचे नव्याने डिझाईन करण्यात येणार आहे. लॉ कॉलेज रस्त्याला समांतर असा बालभारती ते पौड रस्ता या दोन किलोमीटर रस्त्याला नियोजन करण्यात आले आहे. तसेच कात्रज कोंढवा रोड चे उर्वरित काम करून घेण्यात येणार आहे.घनकचरा व्यवस्थापनासाठी शहरात चार नव्याने प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. घनकचरा विभागासाठी  अंदाजपत्रकात 128 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांमधील कचरा व्यवस्थापन करणे सात राॅम्पचे आधुनिकीकरण करणे, ओला कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणे पुणे कॅन्टोन्मेंट येथील प्रकल्पाची क्षमता वाढविणे यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे.महापालिका आयुक्तांच्या अंदाजपत्रकात प्रकल्पांची संख्या मर्यादित असली तरी उत्पन्न वाढीमध्ये स्थानिक संस्था करातून 330 कोटी, वस्तू व सेवा करातून २१४४ कोटी, मिळकतकरातून 2 हजार 160 कोटी पाणी पट्टीतून 294 कोटी शासकीय अनुदान 512 कोटी कर्जरोख्यांच्या माध्यमातून 500 कोटी बांधकाम परवानगी शुल्कातून 1157 कोटी, पंतप्रधान आवास योजनेतून 200 कोटी असे उत्पन्न अपेक्षित असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

PMC Budget : Commissioner Vikram Kumar : महापालिका आयुक्त आज सादर करणार अंदाजपत्रक  : पुणेकरांना काय नवीन योजना मिळणार? 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिका आयुक्त आज सादर करणार अंदाजपत्रक 

: पुणेकरांना काय नवीन योजना मिळणार? 

पुणे – महापालिका (Pune Municipal) आयुक्त विक्रम कुमार (Commissioner Vikram Kumar) हे आज (ता. ७) महापालिकेचा २०२२-२३ या वर्षाचे अंदाजपत्रक (Budget) स्थायी समितीला सकाळी साडेअकरा वाजता सादर करणार आहेत.

गेल्या वर्षभरात अनेक मोठ्या प्रकल्पांना मान्यता दिल्याने त्या कामांसाठी मोठी तरतूद करावी लागणार आहे. त्यामुळे आगामी वर्षाच्या अंदाजपत्रकात नवे प्रकल्प असणार की, अर्धवट प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला जाणार हे यातून स्पष्ट होणार आहे. पुणे  महापालिकेची निवडणूक लांबल्याने महापालिका आयुक्तांना २०२२-२३ या पूर्ण वर्षाचे अंदाजपत्रक मांडण्याची संधी मिळाली आहे. महापालिकेची मुदत १४ मार्च रोजी संपणार असून, पुढील सात दिवसांत स्थायी समिती अध्यक्षांना त्यांचा अर्थसंकल्प मांडता येणार नाही, त्यात तांत्रिक अडचणी येतील, त्यामुळे आगामी वर्षात आयुक्तांच्याच अंदाजपत्रकाची अंमलबजावणी होईल, असा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सूर आहे.

पुणेकरांना काय मिळणार? याकडे लक्ष 

विक्रम कुमार यांनी गेल्यावर्षी २०२१-२२ या वर्षाचे ७६५० कोटी रुपयांचे अंदाजत्रपकात स्थायी समितीला मांडले होते. स्थायी समिती अध्यक्षांनी त्यात भर घालून ८३७० कोटींचा अर्थसंकल्प मांडला, मात्र गेल्या एप्रिल ते जानेवारी अखेरपर्यंत महापालिकेला ५४४० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यंदा ३१ मार्चपर्यंत अखेर सुमारे ६ हजार कोटींचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. तरीही आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकापेक्षा किमान दीड हजार कोटींची तूट राहणार आहे.

आगामी  वर्षभरात महापालिकेला ११ गावांचा मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प, संगमवाडी ते बंडगार्डन नदीकाठ सुधार प्रकल्प, नदीसुधार प्रकल्प (जायका), वैद्यकीय महाविद्यालय, समान पाणी पुरवठा प्रकल्प, सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल, महापालिका, पीएमटी, शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाचा फरक यांसह इतर मोठ्या कामांसाठी सुमारे १५०० कोटींची भांडवली तरतूद अनिवार्यच आहे. त्यामुळे आयुक्तांच्या या अंदाजपत्रकात पुणेकरांना काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

PMC Budget : Commissioner Vikram Kumar : अपरिहार्य कारणास्तव आयुक्त पालिकेचे बजेट 22 फेब्रुवारीला सादर करणार नाहीत 

Categories
Breaking News PMC पुणे

अपरिहार्य कारणास्तव आयुक्त पालिकेचे बजेट 22 फेब्रुवारीला सादर करणार नाहीत

: महापालिका आयुक्त आता 7 मार्च ला सादर करणार अंदाजपत्रक!

:  वाढवून मागितला अवधी

पुणे : महापालिकेचे वर्ष 2022-23 चे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त विक्रम कुमार 22 फेब्रुवारीला सकाळी 11:30 वाजता सादर करणार होते. नियमानुसार आयुक्तांनी 15 जानेवारी पर्यंत अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करणे आवश्यक असते. मात्र महापालिका निवडणुकीच्या कामकाजामुळे आयुक्तांनी हा अवधी वाढवून मागितला होता. मात्र आयुक्तांनी पुन्हा एकदा कालावधी वाढवून मागितला आहे. 22 फेब्रुवारी च्या ऐवजी 7 मार्च ला बजेट सादर करण्याबाबत प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समिती समोर ठेवला होता. त्याला बुधवारच्या समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
: 15 जानेवारी पर्यंत अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करणे आवश्यक
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ९५ नुसार महानगरपालिकेचे महसूली, भांडवली इ. उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक आराखडा (“अ” व “क’) अंदाजपत्रक १५ जानेवारी अगर तत्पूर्वी स्थायी समितीस सादर करणे आवश्यक आहे. त्यांनतर स्थायी समिती अध्यक्ष त्यात बदल करून बजेट मुख्य सभेला सादर करतात. मुख्य सभेत चर्चा होऊन हे बजेट 31 मार्च पूर्वी मंजूर होणे आवश्यक असते. त्यांनतर त्यावर अंमल करता येतो. दरम्यान महापालिका आयुक्तांनी बजेट सादर करण्याची तयारी सुरु केली होती. सर्व विभागाकडून आयुक्तांनी याबाबतची माहिती मागवली होती. मात्र महापालिका निवडणूक तोंडावर आहे. या निवडणुकीच्या कामकाजासाठी आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर करण्याचा अवधी वाढवून मागितला होता. त्यानुसार वर्ष 2022-23 चे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त विक्रम कुमार 22 फेब्रुवारीला सकाळी 11:30 वाजता सादर करणार होते. तसा प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समिती समोर ठेवला होता. त्यास मंजुरी देखील देण्यात आली होती. मात्र महापालिका आयुक्तांनी पुन्हा कालावधी वाढवून मागितला आहे. 22 फेब्रुवारी च्या ऐवजी 7 मार्च ला बजेट सादर करण्याबाबत प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समिती समोर ठेवला होता. त्याला बुधवारच्या समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.