PMC Pune Employees Promotion | अधिक्षक, उपअधिक्षक, प्रशासन अधिकारी पदोन्नती | दुरुस्तीचा प्रस्ताव पुणे महापालिकेने पाठवला सरकारकडे!

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune Employees Promotion |  अधिक्षक, उपअधिक्षक, प्रशासन अधिकारी पदोन्नती |  दुरुस्तीचा प्रस्ताव पुणे महापालिकेने पाठवला सरकारकडे!

| पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा

PMC Pune Employees Promotion | (Author: Ganesh Mule) | पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) प्रशासकीय सेवा या संवर्गातील “अधिक्षक” (Superintendent) (वर्ग-३) व “प्रशासन अधिकारी” (Administration Officer) (वर्ग-२), उपअधीक्षक (Deputy Superintendent) , वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) या पदावर तात्पुरती पदोन्नतीदेण्याबाबतचा दुरुस्तीच्या प्रस्तावाला नुकतीच मुख्य सभेने (PMC General Body) मान्यता दिली आहे. त्यानंतर मागील शुक्रवारी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागातून देण्यात आली. यामुळे मात्र अधिक्षक, उप अधिक्षक, प्रशासन अधिकारी, वरिष्ठ लिपिक यांच्या पदोन्नतीचा (promotion)  मार्ग मोकळा होणार आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना हा चांगला दिलासा आहे. (PMC Pune Employees Promotion) 

| महापालिकेने सरकार कडून मागवले होते मार्गदर्शन 

 पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील प्रशासकीय सेवा या संवर्गातील ज्या अधिकारी / कर्मचारी यांना निम्न संवर्गातील पदावर मानीव दिनांक मंजुर केल्याने ते सध्या त्यांच्या उच्च पदाच्या पदोन्नतीच्या विचाराधीन कक्षेत आले आहेत. त्यांना निम्न संवर्गातील ३ वर्षाचा कामाचा प्रत्यक्ष अनुभव नसताना पदोन्नती द्यावी अगर कसे याबाबत महापालिका प्रशासनाकडून राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागितले होते. (PMC Pune Marathi News) 
या अनुषंगाने सरकारने कळवले होते की, पुणे महानगरपालिकेच्या सेवा प्रवेश नियमात पदोन्नतीदेताना “निम्न पदावरील ३ वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक” अशी तरतुद आहे. निम्न संवर्गातील पदावर मानीव दिनांक मंजुर केल्याने उच्च पदाच्या पदोन्नतीकक्षेत आलेल्या अधिकारी / कर्मचारी यांना कामाचा प्रत्यक्ष अनुभव नसताना पदोन्नती देण्यासाठी सेवाप्रवेश नियमात सदर अर्हतेमध्ये “निम्न पदावरील ३ वर्षांची नियमित सेवा” असा बदल करणे आवश्यक आहे. (Pune Municipal Corporation Employees promotion) 
सरकारच्या या मार्गदर्शनानंतर महापालिकेने दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून तो विधी समितीच्या माध्यमातून मान्यतेसाठी मुख्य सभेसमोर ठेवला होता. या प्रस्तावाला मुख्य सभेची मान्यता मिळाली आहे. आता हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. यामुळे आता प्रशासन अधिकारी, अधीक्षक, उपअधीक्षक, वरिष्ठ लिपिक  यांची पदोन्नती लवकरच होणार हे सिद्ध झाले आहे. (Pune Municipal Corporation News) 
—-
News title | PMC Pune Employees Promotion |  Superintendent, Deputy Superintendent, Administration Officer Promotion |  Pune Municipal Corporation has sent the repair proposal to the government!

PMC Pune General Body | पुणे महापालिकेच्या मुख्य सभेचे कामकाज जबाबदारीने सांभाळणारे सोमनाथ कारभळ सेवानिवृत्त!

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune General Body | पुणे महापालिकेच्या मुख्य सभेचे कामकाज जबाबदारीने सांभाळणारे सोमनाथ कारभळ सेवानिवृत्त!

PMC Pune General Body | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) मुख्य सभेचे (General Body) गेल्या 10 वर्षांपासून जबाबदारीने काम सांभाळणारे ज्येष्ठ समिती लेखनिक सोमनाथ कारभळ (Somnath Karbhal) आज (31 मे) सेवानिवृत्त (Retire) झाले. सुमारे 31 वर्ष त्यांनी महापालिकेच्या नगरसचिव विभागात (PMC Municipal secretary Department) काम केले. विभागातल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना मुख्य सभेच्या कामकाजाची जबाबदारी कारभळ यांनी अतिशय निष्ठेने पार पाडली. (PMC Pune General Body)
सोमनाथ कारभळ हे 1992 साली महापालिकेच्या नगरसचिव विभागात रूजू झाले.  सुरुवातीला त्यांनी ज्युनियर ग्रेड लेखनिक या पदावर काम केले. त्यानंतर आपल्या कामाने पदोन्नती घेत ते समिती लेखनिक झाले.  आज ते ज्येष्ठ समिती लेखनिक म्हणून निवृत्त झाले. नगरसचिव विभागात त्यांनी 31 वर्ष काम केले. सुरुवातीला त्यांनी टायपिंगचे काम केले. कारभळ हे मुख्य सभेचे काम गेल्या 10 वर्षांपासून पाहत होते. (Pune Municipal Corporation Employees)
मुख्य सभेचे काम हे क्लिष्ट असते. सभेत सगळे धोरणात्मक निर्णय घेतले जातात. महापालिका प्रशासन आणि नगरसेवक या दोघांना एकत्र घेत हे कामकाज करणे आवश्यक असते. यामध्ये मुख्य सभा बोलावणे, सभेची कार्यपत्रिका तयार करणे, सभासदांना घरी पाठवणे, महापालिकेच्या वेगवगेळ्या खात्याना अवगत करणे, कार्यपत्रिका सभागृहात फाईलला लावणे, प्रश्न उत्तरे आयुक्त कार्यालयात पाठवणे आणि त्याचे उत्तरे आले कि सभासदाच्या फाईलला लावणे. वृत्तांत छापणे अशी कामे असतात. general body विभागाला ला कमी कर्मचारी असताना देखील कारभळ यांनी आपले काम चोख केले. तसेच सभासदांची/नगरसेवकांची हजेरी घेण्याचे काम देखील याच कार्यालयाला करावे लागते. तसेच सभासद आणि पत्रकारांना docket उपलब्ध करून दिले जातात. अशी जिकिरीची आणि तांत्रिक कामे कारभळ यांनी आपल्या सेवेत केली. (PMC Pune News)
मुख्य सभेचे कामकाज ही प्रक्रिया क्लिष्ट आहे. यामध्ये एखादी चूक देखील महागात पडते. जबाबदारीने काम करावे लागते. मी हे काम वेळेच्या वेळी आणि जबाबदारीने केले. नागरिकांना व्यवस्थित वागणूक दिली. याचा निवृत्त होताना आनंद वाटतो आहे. आता निवृत्त झाल्यानंतर  समाजकार्य करणार. गावी राहणार. तसेच मुख्य सभेच्या कामकाजाबाबत कार्यालयातील नवीन कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याची तयारी आहे.
सोमनाथ सखाराम कारभळ, सेवानिवृत्त सेवक, पुणे महापालिका.

—-
News Title | Somnath Karbhal, responsible for the General body meeting of Pune Municipal Corporation, retired!