G 20 Conference | 15 खातेप्रमुख करणार 15 रस्त्यांच्या सुशोभीकरणाची  कामे! 

Categories
Breaking News PMC पुणे

15 खातेप्रमुख करणार 15 रस्त्यांच्या सुशोभीकरणाची  कामे!

| G 20 साठी महापालिका प्रशासनाची जोरदार तयारी

पुणे | आगामी काही दिवसात पुणे शहरात G-20 परिषद (G 20 Conference) होणार आहे. यासाठी महापालिका प्रशासनाकडून (PMC Pune Administration) जोरदार तयारी करण्यात येत आहे. शहर स्वच्छ दिसावे यासाठी 15 प्रमुख रस्त्यांच्या सुशोभीकरणाची (15 Main Road beutification) कामे करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या प्रत्येक खातेप्रमुखाकडे (HOD) 1 असे 15 खाते प्रमुखाकडे 15 रस्त्यांची कामे देण्यात येणार आहेत. अतिरिक्त आयुक्तांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. अशी माहिती पथ विभागाचे मुख्य अभियंता व्ही जी कुलकर्णी (Chief Engineer V G Kulkarni) यांनी दिली.
शहरात काही महिन्यापूर्वी G20 परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी काही रस्त्यांच्या सुशोभीकरणाची कामे केली होती. त्यानंतर आता अजून काही रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये मुख्य 15 रस्त्यांचा समावेश आहे. त्यांमध्ये सोलापूर रस्ता, नगर रस्ता, सातारा रस्ता, विमानतळ रस्ता, विद्यापीठ रस्ता, कर्वे रस्ता, पाषाण रस्ता, बाणेर रस्ता, औंध रस्ता अशा रस्त्यांचा यात समावेश आहे. (Road Beutification in pune)
सुशोभीकरणाच्या कामामध्ये रस्त्यांची दुरुस्ती, रंगरंगोटी, भिंती रंगवणे, विद्युत पोल ची दुरुस्ती अशी सर्व कामे करण्यात येतील. प्रत्येक रस्त्यासाठी 1 खातेप्रमुख नियुक्त करण्यात येणार आहे. यासाठी निधी राज्य सरकारचा असणार आहे. (Pune Municipal Corporation)