The Karbhari Impact | JICA प्रकल्पासाठी बोटॅनिकल गार्डन ची जागा देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक | जैवविविधता मंडळ मार्फत प्रस्ताव सादर करण्याचे महापालिकेला आदेश

Categories
Breaking News PMC social पुणे महाराष्ट्र

The Karbhari Impact | JICA प्रकल्पासाठी बोटॅनिकल गार्डन ची जागा देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक

| जैवविविधता मंडळ मार्फत प्रस्ताव सादर करण्याचे महापालिकेला आदेश

The Karbhari Impact | JICA Project Pune PMC | पुणे शहरात (Pune City) केंद्र सरकारच्या निधीच्या (Central Government Fund) माध्यमातून जायका प्रकल्पाचे (PMC JICA Project) काम हाती घेण्यात आले आहेत. या प्रकल्पात 11 मैलापाणी शुद्धीकरण केंद्र (STP Plant PMC) निर्माण करण्यात येणार आहेत. मात्र बोटॅनिकल गार्डन (Botanical Garden Pune) ची जागा महापालिकेच्या (PMC Pune) ताब्यात अजूनही आलेली नाही. यात कुणी खाजगी मालक अडसर ठरत नाही तर चक्क राज्य सरकारच (State Government) अडचण उभा करत आहे. याबाबत The Karbhari वृत्तसंस्थेने वृत्त प्रसारित केले होते. त्यानुसार आता जागा देण्याबाबत राज्य सरकारच्या महसूल आणि वन विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. कृषी विद्यापीठ व वन विभाग यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत संबंधित जागेची पाहणी करून नागपूरच्या राज्य जैवविविधता मंडळ मार्फत सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महसूल व वन विभागाकडून पुणे महापालिकेला देण्यात आले आहेत.
पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) केंद्र सरकारच्या निधीच्या माध्यमातून 1100 कोटींचा जायका प्रकल्प शहरात राबवत आहे. यात जपान सरकारची Japan International Cooperation Agency (JICA) कंपनी सहकार्य करत आहे. यासाठी केंद्र सरकार 85% म्हणजे 850 कोटी महापालिकेला देणार आहे. त्यातील 170 कोटी महापालिकेला मिळाले आहेत. शहरात एकूण 11 नवीन मैलापाणी शुद्धीकरण केंद्र निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे 396 MLD मैला पाणी शुद्ध होणार आहे. 11 पैकी 10 जागांचे भूसंपादन करून प्रत्यक्ष काम देखील सुरु झालेले आहे. मात्र कृषी कॉलेज आवारातील बोटॅनिकल गार्डन ची जागा महापालिकेच्या अजूनही ताब्यात आलेली नाही. (PMC STP Plants)
२०१७ च्या शासनमान्य विकास आराखड्यानुसार औध सर्वे नंबर २५ येथील मैलापाणी शुद्धीकरण केंद्र व १२ मी. रुंदीचा डी.पी. रस्ता आरक्षणात दर्शविण्यात आलेला आहे. एकूण 1.6 हेक्टर एवढी ही जागा आहे. कुलसचिव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्याकडील  १५/११/२०१९ चे पत्रान्वये मैलापाणी शुद्धीकरण केंद्राचे काम सुरु करणेसाठीचे ना-हरकत प्राप्त झाली होती. त्यानुसार प्रत्यक्ष जागेवर Site Establishment, Environmental Monitoring Tests, Topographic Survey, Geotechnical Investigation चं काम करणेत आले. मैलापाणी शुद्धीकरण केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देणेकामी त्यांनी मागणी केलेली विकासकामे व त्या कामासाठी होणारा खर्च शासन जमिनीचा जो मोबदला निश्चित करेल त्यातून वजावट करण्यात येईल या अटीवर करून देणेत येतील असे पुणे महानगरपालिकेमार्फत मान्य करणेत आले होते.  तदनंतर २३/०२/२०२३ चे पत्रान्वये महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी सदरचे क्षेत्र जैवविविधता वारसा क्षेत्र घोषित झाले असल्याने प्रस्तावित ठिकाणी प्रकल्पाची कामे करणेस मज्जाव केलेला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी जैवविविधता वारसा क्षेत्र घोषित झाल्याने सदरचे क्षेत्र पुणे महानगरपालिकेस देणेस अमान्य केले होते.
दरम्यान याबाबत The Karbhari वृत्तसंस्थेने वृत्त प्रसारित केले होते. त्यानुसार आता जागा देण्याबाबत राज्य सरकारच्या महसूल आणि वन विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. कृषी विद्यापीठ व वन विभाग यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत संबंधित जागेची पाहणी करून नागपूरच्या राज्य जैवविविधता मंडळ मार्फत सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महसूल व वन विभागाकडून पुणे महापालिकेला देण्यात आले आहेत. वारसा क्षेत्राच्या अधिसूचनेत आवश्यक बदल करून परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे ही राज्य सरकारने म्हटले आहे.