Wadgaon sheri Constituency | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वडगावशेरी मतदारसंघातील विकास कामांची पाहणी

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Wadgaon sheri Constituency | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वडगावशेरी मतदारसंघातील विकास कामांची पाहणी

पुणे शहराच्या वैभवात भर घालणारे काम करा | अजित पवार

 

Wadgaon sheri Constituency |पुणे शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम साधत शहराच्या वैभवात भर घालणारे काम करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शहरातील विविध विकासकामांच्या पाहणी दौऱ्याचेवेळी दिले.

विकास कामांची पाहणी करतांना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबत माहिती घेतली. सार्वजनिक विकासकामे करतांना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल, याकडे लक्ष द्यावे. विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. कामांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना आवश्यक ते सहकार्य केले जाईल. विकासकामांसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.


मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत (Mula Mutha River Rijuvenation Project) बंड गार्डन परिसरात नदीचे कामे करताना भविष्यातील पूरपरिस्थितीचा विचार करावा. अशी परिस्थिती उद्भवल्यास पाण्याचा प्रवाह अधिकाधिक वेगाने झाला पाहिजे. पायऱ्यावरील दगडात अंतर राहणार नाही, याकडे लक्ष द्यावे. या परिसरात विविध जातीची झाडे लावावी. नागरिकांच्या माहितीसाठी त्यांची नावे इंग्रजीसह मराठीत लिहावीत. ज्येष्ठ नागरिकांना सुलभ सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात यावा. लहान मुलांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने विचार करण्यात करण्यात यावा, अशा सूचना श्री. पवार यांनी दिल्या.

खराडी येथील ऑक्सिजन पार्कची पाहणी केल्यानंतर श्री. पवार म्हणाले, अधिकाधिक ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करा. विविधरंगी गवताची लागवड करावी. प्रेक्षक गॅलरीत सुटसुटीत बैठक व्यवस्था करावी. येथील नागरिकांच्या मागणीचा विचार करता परिसरात योगासनांसाठी जागा निश्चित करुन त्याठिकाणी लवकरात लवकर छत्र आणि सुलभ शौचालयाची व्यवस्था करा. आरोग्याच्यादृष्टीने पदपथावर पेव्हर ब्लॉक ऐवजी मातीचा वापर करण्याबाबत विचार करावा, अशा सूचना श्री. पवार यांनी दिल्या.

 

राष्ट्रीय नदी संवर्धन प्रकल्प अंतर्गत खराडी येथील मल:निसारण प्रक्रिया प्रकल्प, स्वारगेट येथील महामेट्रो प्रकल्प विकास कामांची पाहणी करुन कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

यावेळी आमदार सुनील टिंगरे (MLA Sunil Tingre), पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar), महामेट्रो रेल कॉर्पोशनचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर (Mahametro MD Shravan Hardikar), जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख (IAS Dr Rajesh Deshmukh), अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार (IAS Kunal Khemnar), रवींद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade), विकास ढाकणे (PMC Additional Commissioner Vikas Dhakane), सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, पुणे महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार (PMC Health Officer Dr Bhagwan Pawar) उपस्थित होते.

PMC RFD Project | पुण्यातील पर्यावरण प्रेमींनी पुणे महापालिकेचा निषेध करत घातले सजीव घटकांचे श्राद्ध

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC RFD Project | पुण्यातील पर्यावरण प्रेमींनी पुणे महापालिकेचा निषेध करत घातले सजीव घटकांचे श्राद्ध

PMC RFD Project | झाडे, झाडांवरील पक्षी, नदी , नदीमधील मासे व इतर जीव यांचे प्राण पुणे मनपा प्रशासनाने (Pune Municipal Corporation) घेतले आहेत. असा आरोप करत सर्व सजीव घटकांचे (Ecosystem) श्राद्ध आजच्या सर्व पित्री अमावास्येला पुण्यातील काही पर्यावरण प्रेमी नागरिकांनी ओंकारेश्वर घाटावर घातले. अशी माहिती पर्यावरण प्रेमी रुपेश केसेकर (Rupesh Kesekar) यांनी दिली. (PMC Pune)
केसेकर यांनी सांगितले कि पुणे  शहरात वेळोवेळी विविध कामांसाठी पहिला बळी दिला जातो झाडांचा, कुठलाही रस्ता करायचा झाला तर पहिले झाडावर कुऱ्हाड चालवली जाते. पुण्याच्या नदीपात्रात धरणातून फक्त पावसाळ्यात पाणी सोडले जाते, बाकी वर्षभर त्यामध्ये फक्त पुणेकरांच्या घरातील गटरचे पाणी वाहते, अपुऱ्या मैला प्रक्रिया केंद्रामुळे पुण्याच्या नदीचा स्थानिक प्रशासनाने जीव घेतला आहे. यामुळे झाडे, झाडांवरील पक्षी, नदी , नदीमधील मासे व इतर जीव यांचे प्राण पुणे मनपा प्रशासनाने घेतले आहेत. अश्या सर्व सजीव घटकांचे श्राद्ध आजच्या सर्व पित्री अमावास्येला पुण्यातील काही पर्यावरण प्रेमी नागरिकांनी ओंकारेश्वर घाटावर घातले. (PMC River Front Devlopment Project)
यामध्ये श्री रुपेश केसेकर, सौ उमा खरे, श्री चैतन्य केत, कु. गंगोत्री चंद, श्री रवींद्र गांधी, श्री अमित सिंग  व इतर पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.
यावेळी भविष्यात पुण्याच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास करणाऱ्या RFD म्हणजे नदी काठ सुशोभीकरण प्रकल्प व निद्रिस्त प्रशासकीय यंत्रणा यांचा निषेध करण्यात आला.
———