Katraj-Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी 200 कोटी देण्याच्या मागणीसाठी महापालिकेचा नगरविकास विभागाला एका महिन्यात दोनदा पत्रव्यवहार!

Categories
Breaking News PMC social पुणे महाराष्ट्र

Katraj-Kondhwa Road | कात्रजकोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी 200 कोटी देण्याच्या मागणीसाठी महापालिकेचा नगरविकास विभागाला एका महिन्यात दोनदा पत्रव्यवहार!

 

| तुकड्या तुकड्यात फक्त 30% काम पूर्ण 

 
Katraj-Kondhwa Road | पुणे शहराच्या दृष्टीने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण (Katraj- Kondhwa Road Widening) होणे महत्वाचे आहे. मात्र भूसंपादन (Land Acquisition) अभावी हे काम रखडले आहे. तुकड्या तुकड्या मध्ये फक्त 30% काम पूर्ण झाले आहे. भूसंपादन करण्यासाठी 200 कोटींचा निधी देण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) आश्वस्त केले होते. मात्र प्रत्यक्षात निधी मिळालेला नाही. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Additional Commissioner Vikas Dhakane) यांनी नगर विकास विभागाला एका महिन्यात दोनदा पत्रव्यवहार करत 200 कोटी देण्याची मागणी केली आहे. पहिले पत्र 6 जुलै ला पाठवण्यात आले होते. तर नुकतेच 19 जुलै ला अजून एक पत्र पाठवण्यात आले आहे. (Katraj-Kondhwa Road) 

– उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते आश्वासन

कात्रज कोंढवा रोड हा खूपच रहदारीचा रस्ता आहे. रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिकेकडून रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. पूर्वी हा रस्ता 84 मीटर करण्याचे नियोजन होते. मात्र फक्त भूसंपादन साठी 556 कोटी रुपये लागणार होते. मात्र एवढी मोठी रक्कम असल्याने पुन्हा हा रस्ता 50 मीटर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी 280 कोटी रुपये भूसंपादन साठी लागणार आहेत. (PMC Pune News)

महापालिकेने काय म्हटले आहे पत्रात

 
 उप मुख्यमंत्री यांचे समवेत दिनांक १७/१०/२०२२ रोजी पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील महत्वपूर्ण प्रकल्पांबाबत बैठक झाली. बैठकीमध्ये उप मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आदेशानुसार राज्य शासनाकडून निधी मिळणेबाबत निवेदन सादर करण्यात आले होते. पुणे शहराच्या मंजूर विकास योजना आराखड्यामध्ये ८४ मी. रूंदीचा विकास योजना रस्ता ( कात्रज कोंढवा) दर्शविलेला आहे. सदर ८४ मी. रूंदी पैकी सरासरी २० मी. रूंदीचा रस्ता अस्तित्वात आहे. उर्वरीत रूंदीसाठी भूसंपादन करणे आवश्यक आहे. सदर रस्त्यावरून मुंबई सातारा या भागातून सोलापूरकडे व मार्केटयार्डकडे जाणाऱ्या अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतुक आहे. सदरचा रस्ता विकसीत केल्यानंतर शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होईल. (Pune Municipal Corporation)
 रस्त्याच्या विकसनासाठी सन २०१८ मध्ये निविदा मागविण्यात आलेल्या असून ३१.१०.२०१८ रोजी सदर कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहे. या कामासाठी रक्कम रूपये १९२ कोटी (जीएसटी वगळून) खर्च येणार आहे. टी.डी. आर. पोटी ताब्यात आलेल्या जागेवर रस्ता विकसनाचे काम झालेले आहे. तुकड्या तुकड्यामध्ये सुमारे ३० % रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या भूसंपादना अभावी रस्त्याचे काम खोळंबलेले आहे. टी. डी. आर. चे दर कमी झाल्यामुळे रस्तारूंदीतील जागेसाठी रस्तारूंदीतील जागा मालकांकडून जागेच्या बदली रोख रकमेची मागणी करण्यात येत आहे. (PMC Pune News)
८४ मी. रूंदीच्या रस्त्याच्या भूसंपादनासाठी अंदाजे रक्कम रूपये ५५६ कोटी खर्च अपेक्षित आहे. भूसंपादन व रस्ता विकसनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करणे महापालिकेस अडचणीचे झालेले आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत ५० मी. रूंदीचा रस्ता करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. ५० मी. रूंदीच्या रस्त्याच्या भूसंपादनासाठी रक्कम रूपये २८० कोटी खर्च अपेक्षित आहे. याबाबत पुणे महानगरपालिकेकडून 6 जुलै ला  विनंतीपत्र देण्यात आलेले आहे. (Pune News)
पुणे महानगरपालिका हद्दीतील चांदणी चौक उड्डाणपूल भू संपादन प्रकल्प याकरिता महाराष्ट्र शासनाकडून १८५.४३ कोटी चा निधी मंजूर झालेला आहे व त्यानुसार काम सुरू आहे. प्रस्तुत कात्रज कोंढवा रस्ता मुंबई – सातारा या भागातून सोलापूरकडे व मार्केटयार्ड कडे अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतुक आहे. यामुळे या भागातील वाहतुकीवर प्रचंड ताण येत आहे. चांदणी चौक उड्डाणपूल भू संपादन प्रकल्प याकरिता अनुदान प्राप्त झाले त्याच धर्तीवर कात्रज कोंढवा रस्त्याचे भूसंपादन करणे व रस्त्याचे काम प्राधान्याने करणेकरिता निधी मिळणेस विनंती आहे. या रस्त्याचे भूसंपादनाबाबत उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे सोबत दिनांक १७/१०/२०२२ रोजी बैठकही झालेली आहे. तरी रस्त्याच्या भूसंपादनासाठी रक्कम रूपये २०० कोटी निधी / अनुदान शासनाकडून सत्वर देण्यात यावे. असे पत्रात म्हटले आहे.
——–
News Title |

Pune Potholes | पुणे महापालिकेने महिनाभरात दुरुस्त केले 2288 खड्डे  | महापालिका पथ विभागाची माहिती 

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Potholes | पुणे महापालिकेने महिनाभरात दुरुस्त केले 2288 खड्डे

| महापालिका पथ विभागाची माहिती

Pune Potholes | पुणे महापालिकेच्या पथ विभागाकडून (PMC Pune Road Department) पाऊस (Monsoon) सुरु होण्या अगोदर पासून शहरातील विविध रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त (Pothole’s Repairs) करण्यात येत आहेत. 1 जून ते 4 जुलै दरम्यान पथ विभागाकडून 2288 खड्डे दुरुस्त करण्यात आले आहेत. अशी माहिती पथ विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune Potholes)
पुणे महापालिकेच्या पथ विभागाकडून (Pune Municipal Corporation Road Department) मान्सूनपूर्व कामे करण्यात येतात. यामध्ये रस्त्यांची दुरुस्ती आणि डागडुजी केली जाते. महापालिकेची विविध क्षेत्रीय कार्यालये (PMC Ward Offices) तसेच पूनावाला फाउंडेशन च्या वतीने खड्डे दुरुस्ती केली जात आहे. शहरात विविध रस्त्यावर एकूण 2358 खड्डे होते. यातील 2288 खड्डे पथ विभागाने 1 जून ते 4 जुलै या कालावधीत दुरुस्त केले आहेत. पूनावाला कडून 1791 खड्डे दुरुस्त करण्यात आले आहेत. शहरात अजून 70 खड्डे शिल्लक आहेत. आता हे काम पाऊस कमी झाल्यावर करण्यात येणार आहे. विभागाने 6569 चौ मी रस्त्यावर डांबरीकरण केले आहे. यासाठी 2454 मे टन माल वापरण्यात आला आहे. यामध्ये प्लांट वरील माल 1909 मे टन इतका तर कोल्ड मिक्स बॅग वरील 545 मे टन मालाचा समावेश आहे. दरम्यान पथ विभागाकडून याच कालावधीत 108 चेंबर्स दुरुस्त करण्यात आली आहेत. तर पाणी साचलेली 6 ठिकाणे आहेत. त्याचीही दुरुस्ती केली जाणार आहे. (PMC Pune News)
—–
News Title | Pune Potholes | Pune Municipal Corporation repaired 2288 potholes within a month| Municipal Road Department Information

MNS Pune | PMC Road Work | रस्त्यांच्या चुकीच्या कामामुळे पावसाळ्यात घरात आणि दुकानात पाणी जाण्याची शक्यता! 

Categories
Breaking News PMC Political पुणे

MNS Pune | PMC Road Work | रस्त्यांच्या चुकीच्या कामामुळे पावसाळ्यात घरात आणि दुकानात पाणी जाण्याची शक्यता!

| महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुणे महापालिकेवर आरोप

MNS Pune | PMC Road Work | पुणे शहरातील रस्ते पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) चुकीच्या पद्धतीने डांबरीकरण करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (Maharashtra Navnirman Sen) करण्यात आला आहे. कामामुळे रोडच्या दोन्ही बाजुंना असणाऱ्या घरांची तसेच दुकानाची रोडपासुन असणारी उंची कमी होत आहे. त्यामुळे पावसाळ्यात दुकानात /घरात पाणी जावून नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत योग्य कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसे (MNS Pune) कडून देण्यात आला आहे. (MNS Pune | PMC Road Work)

मनसेने दिलेल्या निवेदनानुसार पुणे  महापालिकेमार्फत (PMC Pune) पुणे शहरामध्ये रस्ते डांबरीकरण करण्याचे काम वेगाने सुरु आहे. परंतु काम करत असताना ठेकेदारांकडुन पुर्वीचे रस्ते खोदकाम करुन वरचा थर काढुन नंतर डांबरीकरण करणे गरजेचे असताना, पुर्वीच्याच रस्त्यावर नव्याने डांबरयुक्त खडी टाकुन काम करण्यात येत आहे. अशा कामामुळे रोडच्या दोन्ही बाजुंना असणाऱ्या घरांची तसेच दुकानाची रोडपासुन असणारी उंची कमी होत आहे. त्यामुळे पावसाळ्यात सदर दुकानात /घरात पाणी जावून नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. (PMC Road Department)

मनसेने पुढे म्हटले आहे कि, आमच्या पहाणीनुसार पुणे महानगरपालिकेने मेहेंदळे गॅरेज रोड, वारजे, तसेच कोथरुड मधील अंतर्गत रस्त्यांवरती अश्या पध्दतीचे काम झालेले आहे. तरी महापालिकेमार्फत सदर कामाची त्वरीत पहाणी करुन सदर ठेकेदारांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच आपल्या चुकीच्या कामामुळे जर वरील भागामध्ये असणाऱ्या दुकानामध्ये व घरांमध्ये पावसाचे पाणी गेल्यास, नागरिकांचे होणारे सर्व नुकसान संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्या कडून वसूल करण्यात यावे. तरी या विषयांवर त्वरित कार्यवाही करावी. अन्यथा पालिके विरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा मनसे कडून देण्यात आला आहे. (Maharashtra Navnirman Sena pune)
News Title | MNS Pune | PMC Road Work | Due to the wrong work of the roads, there is a possibility of water entering the house and shop during the rainy season!| Maharashtra Navnirman Sena accuses Pune Municipal Corporation