Marathi Board | MNS Pune | दुकाने व आस्थापनेवरील पाटया मराठीत करा | मनसेचा इशारा 

Categories
Breaking News PMC Political social पुणे महाराष्ट्र

Marathi Board | MNS Pune | दुकाने व आस्थापनेवरील पाटया मराठीत करा | मनसेचा इशारा

 

Marathi Board | MNS Pune | सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या निर्णयानुसार पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीतील सर्व दुकाने व आस्थापनेवरील पाटया मराठीत न केलेल्यावर आस्थापनांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) यांच्याकडून देण्यात आला आहे.

मनसे ने दिलेल्या निवेदनानुसार पुणे शहरातील व उपनगरातील भागात आपल्या अधिकार क्षेत्रातील दुकाने व आस्थापना वरील पाट्या मराठी भाषेत नसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निदर्शनास आले असून आपल्या शॉप अँड एस्ट्याब्लिशमेन्ट कायद्यातील तरतुदी नुसार दुकाने व आस्थापने वरील पाट्या मराठी भाषेतच असणे बंधनकारक आहे. परंतु अनेक दुकानदार व आस्थापना प्रचलीत कायदेशीर तरतुदींचा सरस भंग करीत आहेत. सदरील बाब अतिशय गंभीर असून आपल्या कार्यालयाकडूनही याकडे डोळेझाक करण्यात येत आहे. आपल्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना आपल्या मराठी भाषेचा अभिमान व आपल्या कर्तव्याचे भान नसल्याचे दिसत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने दोन महिन्यांत सर्व पाट्या दुकानदारांनी मराठी स्थानीक भाषेत करावेत या आदेशाची मुदत दिनांक २५ नोव्हेंबर २३ रोजी संपत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार प्रत्येक प्रांतातील त्या भाषेमध्येच म्हणजे महाराष्ट्रात मराठीतच दुकानावरील पाटया मराठीतच असाव्यात असा निर्णय देण्यात आला तरी सर्वोच्च न्यायालयाचा आदर ठेवून आपण आपल्या पुणे शहरातील व उपनगरातील भागात सर्व दुकानदाराना व आस्थापना यांना कायदेशीर तरतुदी नुसार कार्यवाही करण्यात यावी.तसेच सर्व पाट्या मराठी भाषा मोठ्या अक्षरातच आहेत का नाही याची तपासणी करण्यात यावी.

स्थानिक प्रशासनाने तातडीने दुकानदाराना व आस्थापना यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या निष्क्रीय प्रशासनाच्या व सर्व दुकानदाराच्या विरोधात मनसे तिव्र आंदोलन छेडेल याची आपण गांभीर्याने दखल घ्यावी. असे निवेदनात म्हटले आहे.

Pune Water Cut | MNS Pune | पाणी कपात रद्द न झाल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune Water Cut | MNS Pune | पाणी कपात रद्द न झाल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा

Pune Water Cut | MNS Pune |  पुणे शहरात मे महिन्यापासून पाणी कपात लागू करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या पावसाने धरणात पाणी साठत आहे. त्यामुळे आता पाणीकपात रद्द करावी. अशी मागणी मनसेच्या वतीने महापालिका आयुक्तांना केली आहे. पाणीकपात रद्द न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. (Pune Water Cut | MNS Pune)
याबाबत मनसेकडून महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनानुसार पुणे शहरातील पाणी कपात मागे घेण्याचा निर्णयाचा  आढावा ऑगस्ट महिन्यात घेणार असा निर्णय पुणे महानगर पालिकेचे आयुक्त  विक्रम  कुमार यांनी जाहीर केला. पुणे शहरात पुणे महानगरपालिकेने लादलेली पाणी कपात पाणी कमी दाबाने येणे अशा समस्येमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिकेवर हांडा मोर्चा काढण्यात आलेला होता. (Pune Rain)
आजही पाणी कपाती मुळे पुणेकरांना हाल सोसावे लागत आहे. खडकवासला धरण साखळीत काल रात्री पर्यंत ६०% पाणी साठा जमा झाला आहे. तर एकटे खडकवासला धरण ८२% भरले आहे.  पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्याने खडकवासला धरण साखळी  पूर्ण क्षमतेने भरणार आहे पाटबंधारे खाते नदीपात्रातून विसर्ग करण्याच्या दृष्टीने काम करीत असून येत्या २४ ते ४८ तासात नदीपात्रातून पाणी सोडण्याची शक्यता आहे. तश्या पद्धतीचे इशारे पाटबंधारे खात्याने दिले आहेत. असे असताना पुणे शहरात पाणी कपात का आणि त्या संधर्भात तातडीने निर्णय घेण्याची गरज असताना ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बैठकीचा घाट का घातला जात आहे ?पुणे शहरातील पाणी कपात तातडीने रद्द करून यावर त्वरित निर्णय घेऊन पुणेकरांना दररोज सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. असे निवेदनात म्हटले आहे. (Pune Municipal Corporation)
——
News Title | Pune Water Cut | MNS Pune | MNS warns of agitation if water cut is not cancelled

MNS Pune | Pune Metro | पुणे मेट्रो स्थानकाची नावे छत्रपती शिवाजी महाराज  व महात्मा जोतिबा फुले मंडई स्थानक करा  | पुणे शहर मनसेची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी 

Categories
Breaking News PMC Political पुणे

MNS Pune | Pune Metro | पुणे मेट्रो स्थानकाची नावे छत्रपती शिवाजी महाराज  व महात्मा जोतिबा फुले मंडई स्थानक करा

| पुणे शहर मनसेची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी

MNS Pune | Pune Metro |महाराष्ट्र राज्यात पुणे शहराची ओळख शैक्षणीक,सांस्कृतीक अशी आहे.  या मध्यवर्ती भागातील मेट्रो स्थानकच्या नावात आपला ऐतिहासीक वारसा जपण्याची परंपरा कायम रहावी. याकरिता या स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्थानक (Chhatrapati Shivaji Maharaj Metro Station) व मंडई भागातील स्थानकाचे नाव महात्मा जोतिबा फुले मंडई स्थानक (Mahatma Jyotiba Phule Mandai Station) असेच ठेवण्यात यावे. ऐतिहासिक वारसा परंपरा जपणे हाच मुख्य उद्देश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (Maharashtra Navnirman Sena) आहे. त्यामुळे मेट्रो स्थानकाच्या नावाची अधिकृत घोषणा करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS Pune) वतीने महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांच्याकडे करण्यात आली आहे. (MNS Pune | Pune Metro)

मनसे च्या निवेदनानुसार पुण्यात गेल्या दशकात उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा आणि नोकरीच्या संधींमुळे भारताच्या विविध भागांतून स्थलांतरित झालेल्या लोकसंख्येमध्ये वाढ झाली आहे. शहराचे संशोधन आणि विकास संस्था, आयटी पार्क आणि ऑटोमोबाईल उद्योगांतील नोकरदार, विध्यार्थी घटकांना सुलभ वाहतुकीसाठी शासनाच्या पुणे मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे सुरक्षित, विश्वासार्ह आणि परवडणारी वाहतूक व्यवस्थेची काळाची गरज ओळखून पुणे मेट्रो प्रकल्प सुरू झाला. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या फेज-1 ,2,3 मध्ये पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात कामगार पुतळा,दिवाणी न्यायालया जवळ स्थानकाची उभारणी करण्यात आली आहे प्रशासनाने या स्थानकांची नावे शिवाजी नगर व मंडई अश्या चुकीच्या ऐकेरी नावे केल्यामुळे चुकीचा संदेश जात आहे. त्यामुळे मेट्रो स्थानकाच्या नावाची अधिकृत घोषणा करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.


News Title |MNS Pune | Pune Metro | Name the Pune Metro Station Chhatrapati Shivaji Maharaj and Mahatma Jotiba Phule Mandai Station | Demand of Pune City MNS to Municipal Commissioner

MNS Pune | PMC Road Work | रस्त्यांच्या चुकीच्या कामामुळे पावसाळ्यात घरात आणि दुकानात पाणी जाण्याची शक्यता! 

Categories
Breaking News PMC Political पुणे

MNS Pune | PMC Road Work | रस्त्यांच्या चुकीच्या कामामुळे पावसाळ्यात घरात आणि दुकानात पाणी जाण्याची शक्यता!

| महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुणे महापालिकेवर आरोप

MNS Pune | PMC Road Work | पुणे शहरातील रस्ते पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) चुकीच्या पद्धतीने डांबरीकरण करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (Maharashtra Navnirman Sen) करण्यात आला आहे. कामामुळे रोडच्या दोन्ही बाजुंना असणाऱ्या घरांची तसेच दुकानाची रोडपासुन असणारी उंची कमी होत आहे. त्यामुळे पावसाळ्यात दुकानात /घरात पाणी जावून नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत योग्य कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मनसे (MNS Pune) कडून देण्यात आला आहे. (MNS Pune | PMC Road Work)

मनसेने दिलेल्या निवेदनानुसार पुणे  महापालिकेमार्फत (PMC Pune) पुणे शहरामध्ये रस्ते डांबरीकरण करण्याचे काम वेगाने सुरु आहे. परंतु काम करत असताना ठेकेदारांकडुन पुर्वीचे रस्ते खोदकाम करुन वरचा थर काढुन नंतर डांबरीकरण करणे गरजेचे असताना, पुर्वीच्याच रस्त्यावर नव्याने डांबरयुक्त खडी टाकुन काम करण्यात येत आहे. अशा कामामुळे रोडच्या दोन्ही बाजुंना असणाऱ्या घरांची तसेच दुकानाची रोडपासुन असणारी उंची कमी होत आहे. त्यामुळे पावसाळ्यात सदर दुकानात /घरात पाणी जावून नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. (PMC Road Department)

मनसेने पुढे म्हटले आहे कि, आमच्या पहाणीनुसार पुणे महानगरपालिकेने मेहेंदळे गॅरेज रोड, वारजे, तसेच कोथरुड मधील अंतर्गत रस्त्यांवरती अश्या पध्दतीचे काम झालेले आहे. तरी महापालिकेमार्फत सदर कामाची त्वरीत पहाणी करुन सदर ठेकेदारांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच आपल्या चुकीच्या कामामुळे जर वरील भागामध्ये असणाऱ्या दुकानामध्ये व घरांमध्ये पावसाचे पाणी गेल्यास, नागरिकांचे होणारे सर्व नुकसान संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्या कडून वसूल करण्यात यावे. तरी या विषयांवर त्वरित कार्यवाही करावी. अन्यथा पालिके विरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा मनसे कडून देण्यात आला आहे. (Maharashtra Navnirman Sena pune)
News Title | MNS Pune | PMC Road Work | Due to the wrong work of the roads, there is a possibility of water entering the house and shop during the rainy season!| Maharashtra Navnirman Sena accuses Pune Municipal Corporation

MNS Agitation | PMC Pune | पिण्याच्या पाण्याच्या लाईन मधून सांडपाणी मिश्रित पाणी | मनसेने केला आरोप आणि पुणे महापालिकेवर काढला मोर्चा 

Categories
Breaking News PMC Political पुणे

MNS Agitation | PMC Pune | पिण्याच्या पाण्याच्या लाईन मधून सांडपाणी मिश्रित पाणी | मनसेने केला आरोप आणि पुणे महापालिकेवर काढला मोर्चा

MNS Agitation | PMC Pune | पुणे शहरातील पाणी प्रश्नावर (Pune Water issue) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) वतीने पुणे महानगरपालिके (Pune Municipal Corporation) समोर जोरदार निदर्शने करण्यात आले. या आंदोलनात मोठया संख्येने महिला पाण्याचे हांडे घेऊन सहभागी झाल्या होत्या.  पुणे महानगर पालिका प्रशासनाच्या (Pune Civic Body) विरोधात घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी पुणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे (Additional Commissioner Ravindra Binwade) यांना निवेदन देण्यात आले. (MNS Agitation | PMC Pune)
याप्रसंगीं  पक्षाचे नेते राजेंद्र वागसकर, शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, सरचिटणीस किशोर शिंदे,  बाळ शेडगे,  रणजीत शिरोळे, हेमंत संभूस, महिला शहर अध्यक्षा वनिता वागसकर, आरती बाबर,  पुष्पां कनोजिया,  अस्मिता शिंदे,  विभाग अध्यक्ष अमोल शिरस,  विनायक कोतकर,  गणेश भोकरे,  सुनील कदम, सुधीर धावडे,  विक्रांत अमराळे, अजय कदम, विजय मते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनसेच्या निवेदनात म्हटले आहे कि पुणे महापालिकेने दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्यानंतर दोन-दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळित होत असल्याने पुणे शहरातील सर्व भागातील नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. हडपसर, कोंढवा, मुंढवा, वारजे, कोथरूड, शिवाजीनगर, वडगावशेरी, वाघोली, ओंध, बाणेर, पाषाण, कर्वेरोड, डेक्कन सर्व पेठा, पुणे कॅम्प या भागात पाणी पुरवठा होत नसल्याने पुणेकरांचे पाण्यावाचून प्रचंड हाल होत असल्याचे चित्र दैनंदिन झाले आहे. पुणे शहरातील सर्व भागातील पेठा उपनगरातील सर्व भागात अशीच परिस्थिती आहे. पुण्याचे  पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळित झाले असल्याने दोन तीन दिवसाने पाणी येणे तेही कमी दाबाने पाणी येणे. रात्री अपरात्री पाणी आल्याने महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. या पेठेतून दुसऱ्या पेठेत डोक्यावर हांडे घेऊन महिला पाण्यासाठी वणवण फिरत आहेत, पाणी प्रश्नावर पुणे मनपा पाणीपुरवठा अधिकारी मात्र उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.
मनसेने पुढे म्हटले आहे कि, पुणे शहरातील टँकर ने सुरु असलेल्या पाणी पुरवठ्यामध्ये  कोणतीही पाणी टंचाईची तक्रार नसल्याने पुणे मनपा अधिकारी व टँकर माफिया यांच्या संगनमताने पुणेकरांवर पाणीकपात लादली असल्याचा संशय पुणेकरांना येत आहे. पुणे शहरात ४३ पाण्याच्या टाक्या बांधून तयार आहेत त्यासाठी पुणे शहरातील रस्ते खोदाई करून पाइप लाइन टाकण्यात आलेल्या आहेत. पुणे शहरात २४/ ७ पाणीपुरवठा करण्याच्या नावाखाली करोडो रुपयांचे बजेट वापरण्यात आले आहे. मेट्रो, स्मार्ट सिटी कामामुळे  रस्ते खडल्याने पिण्याच्या पाण्याच्या लाईन मधून सांडपाणी मिश्रित पाणी अनेक भागात येत आहे.
आगामी काळात पुणे शहराचा पाणी पुरवठा नियमित व योग्य दाबाने करण्यात यावा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असा इशारा प्रशासनाला देण्यात आला.
News Title | MNS Agitation | PMC Pune | Mixed water from drinking water line | MNS accused and marched against Pune Municipal Corporation