PMC Employees Transfer | गेली 20 वर्ष प्रॉपर्टी टॅक्स विभागात काम करणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्याची अखेर बदली

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Employees Transfer | गेली 20 वर्ष प्रॉपर्टी टॅक्स विभागात काम करणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्याची अखेर बदली

| महापालिका प्रशासनाकडून नुकत्याच अधीक्षकांच्या करण्यात आल्या बदल्या

PMC Employees Transfer | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation Administration) प्रशासनाकडून नुकत्याच 8 अधीक्षकांच्या बदल्या (Superintendent Transfer) करण्यात आल्या आहेत. यामध्ये गेली 20 वर्ष प्रॉपर्टी टॅक्स विभागात अधिक्षक तथा प्रभारी प्रशासन अधिकारी म्हणून काम करणाऱ्या राजेश कामठे (Rajesh Kamthe) यांची देखील बदली करण्यात आली आहे. कामठे यांची बदली अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे (Fire and Disaster Management Department) करण्यात आली आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (PMC Additional Commissioner Ravindra Binwade) यांच्याकडून नुकतेच हे आदेश जारी करण्यात आले आहेत. प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. (PMC Employees Transfer)
महापालिका प्रशासनाकडून 2 महिन्यापूर्वी काही सेवकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अधीक्षक, उप अधिक्षक तसेच वरिष्ठ लिपिक यांचा समावेश आहे. मागील बदल्यात प्रॉपर्टी टॅक्स विभागातील बऱ्याच जुन्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. मात्र 20 वर्षांपासून काम करणाऱ्या अधिक्षक राजेश कामठे यांची बदली केली नव्हती. याबाबत राजकीय नेत्यांनी देखील तक्रारी केल्या होत्या. पुणे काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे (Congress City President Arvind Shinde) यांनी तर सर्व पुराव्यानिशी प्रशासनाकडे मागणी केली होती. (Pune Municipal Corporation,

– अरविंद शिंदे यांची काय होती तक्रार?

मनपा कार्यक्षेत्रात सन १९९७-९८ मध्ये २३ गावे समाविष्ट करण्यात आली. या गावातील ग्रामपंचायतीमधील सेवकवर्ग पुणे मनपा प्रशासनात सामावून घेण्यात आला होता. त्या सेवकांमधील ज्यु.ग्रेड.लेखनिक राजेश कामठे यांची कर आकारणी कर संकलन कार्यालयाकडे नेमणूक करण्यात आली. ते आजतागयात कर आकारणी कर संकलन कार्यालयाकडे पदोन्नती घेऊन अधिक्षक या पदावर व खात्यात अंदाजे २० वर्ष काम करीत आहेत.
कर आकारणी कर संकलन कार्यालयात दोन महापालिका सहाय्यक आयुक्त(वर्ग-१) व तीन प्रशासन अधिकारी (वर्ग२) कार्यरत होते, असे असतानाही तत्कालीन उप आयुक्त तथा कर आकारणी कर संकलन प्रमुख यांनी  कामठे (अधिक्षक) यांना प्र.प्रशासन अधिकारी या पदाचा पदभार दिला. वर्ग १ मधील दोन व वर्ग २ मधील तीन अधिकारी असताना प्र.प्रशासन अधिकारी म्हणून कामठे यांचे पद अधिक्षक असताना त्यांना पदभार देण्याचे प्रयोजन काय ? हि बाब अत्यंत गंभीर आहे. असे असतानाही त्यांची बदली २०% नियतकालिक बदल्या यामध्ये का घेण्यात आली नाही. हि बाब अतिरिक्त आयुक्त (ज) यांच्या मान्यतेने अथवा उप आयुक्त, सामान्य प्रशासन यांच्या मान्यतेने करण्यात आली आहे का ? कर आकारणी कर संकलन कार्यालयाकडे सन २०२१-२२ या काळात कुलकर्णी, सातपुते, वाघमारे  हे अधिक्षक म्हणून कार्यरत होते, परंतु त्यांची ६ महिन्याच्या आत अन्य खात्यात बदली करण्यात आली व  कामठे सन १९९७ पासून कर आकारणी कर संकलन कार्यालयाकडे कामास आहे. त्यांची बदली न करता वरील सेवकांची बदली करणे अन्यायकारक वाटत नाही का ? या सर्व बाबी आमच्या पर्यंत येतात परंतु, आपणापर्यंत येत नाही हि खेदाची बाब आहे. (PMC Pune Employees News)
त्यानंतर आता प्रशासनाने कामठे यांची बदली केली आहे. कामठे यांना अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागात पाठवण्यात आले आहे.
—-
News Title | PMC Employees Transfer | The ‘that’ officer who has been working in the property tax department for the last 20 years has finally been transferred