Pune Airport New Terminal | पुणे विमानतळ टर्मिनल खुले होणार | काँग्रेसच्या लढ्याला यश

Categories
Breaking News Political social पुणे

Pune Airport New Terminal | पुणे विमानतळ टर्मिनल खुले होणार | काँग्रेसच्या लढ्याला यश

| माजी आमदार मोहन जोशी

 

Pune Airport New Terminal | पुणे : प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे विमानतळाचे टर्मिनल (Pune Airport Terminal) लवकर सुरु व्हावे यासाठी काँग्रेस पक्षाने दिलेल्या लढ्याला यश आले असून केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना पुण्यात येऊन उदघाटनाची घोषणा करणे भाग पडले आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan joshi pune congress)  यांनी व्यक्त केली आहे. (Pune Airport new Terminal news)

विमानतळ टर्मिनलचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सोयीची तारीख मिळत नसल्याने थांबले होते. या संतापजनक प्रकाराचा निषेध दि. २० डिसेंबर २०२३ रोजी नोंदविला.केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री आणि विमानतळ संचालक यांना निवेदने दिली. दि. १ जानेवारीपूर्वी विमानतळ टर्मिनल सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता, तसेच प्रवासी प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यानंतर दि. ३ जानेवारी २०२४ रोजी लोहगांव विमानतळ येथे जाऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी गांधीगिरी आंदोलन केले आणि दि .१६ जानेवारी २०२४ पूर्वी टर्मिनल उदघाटन न झाल्यास मोठे आंदोलन उभे करण्याचा अंतिम इशारा दिला होता,अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली.

काँग्रेस पक्षाने पुणेकरांच्या आर्थिक, औद्योगिक घटकांशी संबंधित टर्मिनल कार्यान्वित होण्याची गरज मांडली. पुणेकरांचा दबाव निर्माण केला, त्यामुळे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतीरादित्यजी शिंदे यांना पुण्यात यावे लागले आणि विमानतळ टर्मिनलचे उदघाटन लवकरच होईल अशी घोषणा करावी लागली. कॉंग्रेस पक्षाच्या लढ्याला यश आले मात्र यापुढेही पाठपुरावा करून पुणेकरांना हवाई वाहतूक सुविधा मिळवून देवू, असे मोहन जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Pune Airport New Terminal | पुणे विमानतळ येथील नूतन टर्मिनल २ पंधरा तारखेपर्यंत सुरू न केल्यास 16 जानेवारीला उद्घाटन करू  | मोहन जोशी

Categories
Breaking News Political पुणे

Pune Airport New Terminal | पुणे विमानतळ येथील नूतन टर्मिनल २ पंधरा तारखेपर्यंत सुरू न केल्यास 16 जानेवारीला उद्घाटन करू  | मोहन जोशी

Pune Airport New Terminal  | माजी आमदार उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मोहनदादा जोशी (Mohan Joshi), आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar), दत्ता बहिरट, सुनील मलके यांनी पुणे विमानतळ प्राधिकरणाचे संचालकाना भेटून गुलाब पुष्प आणि निवेदन देऊन गांधीगिरी ने आंदोलन केले. नवीन टर्मिनल लवकरच सुरू करण्यासंदर्भात विनंती केली असून ते टर्मिनल पंधरा तारखेला जानेवारीपर्यंत सुरू न केल्यास पुणेकरांसाठी 16 जानेवारी रोजी टर्मिनल चे उद्घाटन करून सर्वसामान्य पुणेकरांसाठी खुल्या करण्याच्या इशारा देण्यात आला आहे. (Pune Airport New Terminal )

यावेळी चेतन अग्रवाल nsui सरचिटणीस संकेत गलांडे युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे, रोहन सुरवसे उपस्थितीत होते.

या संदर्भात एक मेल करून एक जानेवारी रोजी हे टर्मिनल सर्वसामान्य पुणेकरांसाठी खुले करावे अशी विनंती केली होती.

मात्र, आजतागायत याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

प्रवाशांचे हाल लक्षात घेऊन, पुढील 10 दिवसांत नवीन टर्मिनलचे उद्घाटन करा, असे न झाल्यास प्रवाशांच्या हितासाठी आम्हाला आमची पुढील कृती ठरवावी लागेल. पुणे नूतन टर्मिनल चे सर्व काम पूर्ण झाले असून या संदर्भात योग्य ती कारवाई पूर्ण झालेली आहे. या संदर्भात फक्त आणि फक्त उद्घाटन करण्याची तारीख बदलत असल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

15 जानेवारीपर्यंत उद्घाटन न झाल्यास 16 जानेवारी रोजी उद्घाटन करून पुणेकरांसाठी एअरपोर्टचे नवीन टर्मिनल खुले करण्यात या इशारा देण्यात आलेला आहे.