Underground Pune Metro | भुयारी मार्गातून पुणे मेट्रो धावली | पुणे मेट्रोच्या भूमिगत मार्गामध्ये ट्रेनची चाचणी

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

भुयारी मार्गातून पुणे मेट्रो धावली | पुणे मेट्रोच्या भूमिगत मार्गामध्ये ट्रेनची चाचणी

पुणे मेट्रोच्या (Pune Metro) पिंपरी चिंचवड महानगरपालिका मेट्रो स्थानक ते स्वारगेट या 17.4 किमीच्या मार्गामध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा ६ किमीचा मार्ग भुयारी आहे. या भूमिगत मार्गाच्या भुयाराचे काम दिनांक 4 th June 2022 रोजी टनेल बोअरिंग मशीनच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर मेट्रोच्या भुयारामध्ये ट्रक, ओव्हर हेड विद्यूत तारा, आणि सिग्नलिंगची कामे वेगाने करण्यात आली. आज दिनांक ६ डिसेंबर २०२२ रोजी रेंजहील डेपो ते रेंजहील उन्नत मेट्रो स्थानक आणि त्यानंतर रेंजहील उन्नत मेट्रो स्थानक ते शिवाजीनगर मेट्रो स्थानक त्यानंतर सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक अशी ३ किमीची मेट्रो चाचणी घेण्यात आली. पुणे मेट्रोच्या महत्वाच्या टप्यांपैकी हा तांत्रिक दृष्टया अत्यंत्य महत्वाचा असा टप्पा आहे.(Underground Metro)

पुणे मेट्रोचे ८५ % काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे अत्यंत्य वेगाने सुरु आहेत. त्यामुळे दररोज एक-एक माईलस्टोन पार पडत आहेत. भूमिगत मार्गाचे काम तांत्रिक दृष्टया अत्यंत्य आव्हानात्मक असते. बोगदा बनविताना मोठ्याप्रमाणावर निघणारे दगड-गोटे यांना जमीच्या खालून साधारणतः ७० ते ८० फुटांवरून वर आणून त्यांची योग्यरीत्या व योग्य त्या ठिकाणी विल्हेवाट लावावी लागते . तसेच भुयारी स्थानकांसाठी कट अँड कव्हर तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे खोदून खालून बांधकाम करत वर यावे लागते. शिवाजी
नगर, सिव्हिल कोर्ट, बुधवार पेठ, मंडई, स्वारगेट हि अत्यंत्य गजबजलेली ठिकाणे असून या भागांतून सामानाची ने- आण करणे अत्यंत्य जिकरीचे आहे. या ठिकाणी येणाऱ्या व जाणाऱ्या सामानासाठी वाहतुकीची वाहने रात्री १२ ते सकाळी ५ या वेळातच ने आण करत होती. अश्या आव्हानात्मक परिस्थितीत काम करत मेट्रोने रेंजहील ते सिव्हिल कोर्ट यातील भूमिगत मार्गाचे काम पूर्णत्वाकडे आणले आहे आणि यामुळेच आमची भूमिगत मेट्रो चाचणी करणे शक्य झाले आहे. आजची चाचणी ठीक ३:20 वाजता रेंजहील डेपो येथून सुरु झाली. रेंजहील डेपो ते रेंजहील उन्नत मेट्रो स्थानक अश्या रॅम्प वर
वाटचाल करत ट्रेन स्थानकापर्यंत पोहचली. तेथे ड्रायव्हर ने आपला कक्ष बदलला व मेट्रो ट्रेन रेंजहील उन्नत मेट्रो स्थानक ते शिवाजीनगर भूमिगत मेट्रो स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानकातील भूमिगत स्थानकापर्यंत पोहचली.

या चाचणीसाठी गेल्या आठवड्यापासून मेट्रोचे ट्रक, विद्युत, सिग्नलिंग, देखरेख व संचालन असे सर्व विभाग सतत कार्यरत होते. या चाचणीला -30 मिनिटे वेळ लागला व चाचणी नियोजित उद्दिष्टनुसार पार पडली. या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हंटले आहे कि, आजची भूमिगत मेट्रो चाचणी हा तांत्रिकदृष्ट्या अत्यंत्य आव्हानात्मक आणि किचकट अशी होती. या चाचणीसाठी पुणे मेट्रोचे कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करत होते. त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. पुणे मेट्रोचे ८५% काम पूर्ण झाले असून एक एक टप्पा पार पाडत ती पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. येत्या काही महिन्यात फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि गरवारे ते सिव्हिल कोर्ट या मार्गांची कामे पूर करून तो प्रवाश्यांसाठी
खुला करण्यात येईल.

Swarget-katraj Underground Metro | स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा केंद्र सरकारकडे |खडकवासला-स्वारगेट पुलगेट हडपसर-लोणी काळभोर या मार्गावर मेट्रो रेल्वे प्रकल्प राबविण्यासाठी डीपीआर

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा केंद्र सरकारकडे

|खडकवासला-स्वारगेट पुलगेट हडपसर-लोणी काळभोर या मार्गावर मेट्रो रेल्वे प्रकल्प राबविण्यासाठी डीपीआर

स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करून तो केंद्राला वित्तीय व तांत्रिक मान्यतेसाठी पाठवला आहे, केंद्राच्या मान्यतेनंतर या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येईल, आणि निधी उपलब्ध करून देण्यात येईल. खडकवासला-स्वारगेट पुलगेट हडपसर-लोणी काळभोर या मार्गावर मेट्रो रेल्वे प्रकल्प राबविण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पामध्ये तांत्रिक बाबींची तपासणी करून नागपूर मेट्रोच्या धर्तीवर डबल डेकरचा समावेश करण्याबाबत आवश्यकतेनुसार निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच पुणे शहरातील रिंगरोडच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला अडीचशे कोटी रुपये वर्ग केले आहेत. असे ही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर ते भंडारा, गोंदिया, आणि नागपूर ते गडचिरोलीपर्यंत पुढे वाढविण्यात येणार आहे. गडचिरोली पर्यंतच्या टप्प्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम प्रगतीपथावर असून भूसंपादन प्रक्रिया आणि इतर बाबींसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.

चालू आर्थिक वर्षाच्या नगरविकास, सार्वजनिक बांधकाम विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य आणि नियोजन विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देतांना मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम युद्धपातळीवर, तातडीने करण्यात येईल. रेवस-रेड्डी महामार्गाच्या भूसंपादनासाठी सुमारे दीडशे कोटी रुपयांची पूरक मागणी प्रस्तावित केली आहे. पुणे शहरातील रिंगरोडच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला अडीचशे कोटी रुपये वर्ग केले आहेत. रांजनोली- मानकोली उड्डाणपुलावरील काही भागातील खड्डे बुजविण्यासाठी कोल्डमिक्सचा वापर करण्यात आला आहे. दर्जेदार कामासाठी रेडीमिक्स वापरण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

आरे वसाहतीमधील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. मेट्रो मार्ग ५ चा विस्तार करण्यात येणार आहे. ही मार्गिका ठाणे-भिवंडी-कल्याण पुढे शहाड – टिटवाळा पर्यंत नेण्याबाबत आवश्यकतेनुसार विचार करण्यात येईल. ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून पठाणवाडी येथील रिटेनिंग वॉलसंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल. मुंबई महानगरात ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून स्कायवॉक बांधण्यात आलेले आहेत. या स्कायवॉकची उपयुक्तता पाहण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून आढावा घेण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी स्कायवॉकचा वापर ज्येष्ठांना करताना अडचणी निर्माण होतात, त्यासाठी सरकते जिने, अथवा उदवाहने बसविण्याचा विचार आहे.

काही नगरपालिकांची आर्थिक परिस्थिती पाहता विकासकामे थांबणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येईल. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नवीन रस्ते डांबरीकरणाचे आणि काँक्रीटीकरणाचे काम हाती घेतले आहे. गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते सुस्थितीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गोंदिया शहरात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तीन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आले आहेत, त्याला मंजुरी देखील मिळाली आहे, त्यात १५५५ लाभार्थी संख्या आहे. कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना देण्यात येतील. वसई-विरार महानगरपलिका क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासह उघड्या गटारींवरील झाकणे बसविण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. तुटलेल्या लोखंडी, सिमेंट झाकणांची मागणी नोंदविण्यात आली असून आतापर्यंत ५ हजारपेक्षा अधिक झाकणे बसविण्यात आली आहेत, उर्वरित बसविण्याच्या सूचना देण्यात येतील. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींना तातडीने वेळेवर पैसे देण्याचे निर्देश देण्यात येतील. पुरवणी मागणीद्वारे सदस्यांनी उपस्थित केलेल्या सर्व सूचनांची दखल घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री तथा नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस उत्तरात म्हणाले, निधी वाटपात कोणावरही अन्याय होवू नये हीच शासनाची भूमिका आहे. मागील सरकारच्या निर्णयांना स्थगिती दिलेली नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री कामांचा आढावा घेवून योग्य ती कार्यवाही करणार आहेत. निधी वाटपात सर्वांचा विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, राज्यात रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आणि खड्डे बुजवण्याचे काम लवकरात लवकर होईल यासाठी सकारात्मक प्रयत्न करणार आहे. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी आवश्यकतेनुसार निधी दिला जाईल तसेच हॅमच्या कामांसंदर्भात बैठक घेवून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.

यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या पुरवणी मागण्या मंत्री संजय राठोड यांनी मांडल्या होत्या.

नगरविकास विभागाच्या सन २०२२-२३ वर्षाच्या सुमारे १८८६ कोटी ४१ लाख रुपयांच्या मागण्या यावेळी विधानसभेत मंजूर करण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या सुमारे २४०० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या यावेळी मंजूर करण्यात आल्या.

Underground Metro : स्वारगेट ते कात्रज पूर्णत: भूयारी मेट्रो : राज्य सरकारची मान्यता

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

स्वारगेट ते कात्रज पूर्णत: भूयारी मेट्रो

: प्रकल्पास राज्य सरकारची मान्यता

मुंबई :- पुणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत अमूलाग्र सुधारणा आणि पायाभूत सुविधा निर्मितीच्या  प्रयत्नांना आज आणखी एक यश मिळाले असून पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-1 ची विस्तारीत मार्गिका स्वारगेट ते कात्रज (कॉरिडोर-2ए) या 5.464 कि.मी. लांबी, 3 स्थानके असलेल्या रु. 3668.04 कोटी प्रकल्प पूर्णत्व खर्चाच्या पूर्णत: भूयारी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (महामेट्रो) मार्फत अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली.

पुणे मेट्रोसंदर्भात आज राज्यमंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय पुढीलप्रमाणे :-

1. सदर प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून अनुदान स्वरूपात रु. 450.95 कोटी व केंद्र व राज्य शासनाचे कर/शुल्क यांवरील खर्चासाठी बिनव्याजी दुय्यम कर्ज स्वरूपात रु.440.32 कोटी असा एकूण रु. 891.27 कोटी निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली.

2. सदर प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेकडून रु.450.95 कोटीचे अनुदान आणि भूसंपादन, पूनर्वसन व पूनर्वसाहत व बांधकाम कालावधी दरम्यानचे व्याज याकरिता रु.204.14 कोटी असे एकूण रु.655.09 कोटी इतके वित्तीय सहाय्य महामेट्रोला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

3. सदर प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून रु.300.63 कोटी इतके अनुदान प्राप्त करण्यासाठी केंद्र शासनास विनंती करण्यात येणार आहे.

4. सदर प्रकल्पाकरिता द्विपक्षीय/बहुपक्षीय वित्तीय संस्थेमार्फत रु. 1803.79 कोटीचे अल्प व्याज दराचे कर्ज घेण्यास, सदर कर्जाची मुद्दल, व्याज व इतर शुल्क यांचा कोणताही भार राज्यशासनावर येणार नाही या अटीवर, महामेट्रो यांना प्राधिकृत करण्यास मान्यता देण्यात आली.

5. सदर प्रकल्प माहे एप्रिल, 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे.

6. पुणे शहरातील स्वारगेट व कात्रज प्रमुख उपनगरे असून त्यादरम्यान गुलटेकडी, पद्मावती, मार्केट यार्ड, बिबवेवाडी, धनकवडी, बालाजीनगर, साईबाबानगर, आंबेगाव अशी महत्वाची ठिकाणे आहेत. या परिसरातील वांरवार होणारी वाहतुकीची कोंडी टळून रस्त्यावरील दुर्घटना, प्रदूषण, इंधन खर्च, प्रवास कालावधी यामध्ये बचत होऊन सदर परिसरातील नागरीकांना तसेच एकंदरीच पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांना वातानुकूलित, सुरक्षित, आरामदायक प्रवासासाठी स्वारगेट ते कात्रज ही भूयारी मेट्रो रेल मार्गिका निश्चितच फायदेशीर ठरणार आहे.