Marathi Language | आजच्या युवा पिढीने मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर पोहोचवावे – डॉ. पुरुषोत्तम काळे

Categories
Breaking News cultural Education पुणे महाराष्ट्र
Spread the love

आजच्या युवा पिढीने मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर पोहोचवावे – डॉ. पुरुषोत्तम काळे

 

जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर, ता-जुन्नर, जि-पुणे येथे १४जानेवारी ते २८ जानेवारी २०२३ दरम्यान *मराठी भाषा संवर्धन पंधरवडा* महोत्सव आयोजित करण्यात आला. त्यानिमित्ताने महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.* *मराठी भाषेचे संवर्धन* या विषयावर निबंध लेखन स्पर्धा, स्वरचित *काव्य लेखन स्पर्धा, मराठी भाषेशी संबंधित. *घोषवाक्य लेखन स्पर्धा* ,*प्रश्नमंजुषा*, *मराठी हस्ताक्षर स्पर्धा.*,*भिंतीपत्रक- पोस्टर्स स्पर्धा*,*कथा अभिवाचन स्पर्धा”, काव्यवाचन स्पर्धा “मराठी भाषेचे संवर्धन” या विषयावर प्रा.डॉ.पुरुषोत्तम काळे(महाराष्ट्र साहित्य पत्रिका, संपादक) यांचे विशेष व्याख्यान शनिवार,दिनांक २८ जानेवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आले होते.

ते आपल्या व्याख्यानात म्हणाले,”मराठी ही एक अत्यंत प्रगल्भ भाषा आहे.तिचा इतिहास हा दोन हजार वर्षाचा आहे. मराठी भाषेत अभिजात ग्रंथांचा ठेवा आहे. अनेक बोली मिळून मराठी भाषेची निर्मिती झालीआहे. आजच्या युवा पिढीने मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर बसवावे. आज इंग्रजी माध्यमांच्या शाळेच्या दर्जांपेक्षा मराठी माध्यमांच्या शाळेचा दर्जा सरस आहे. महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या मातीत आदर्शांचा फार मोठा ठेवा आहे तो सर्व मराठीत प्रतिबिंबित झाला आहे. जगातला सर्वात मोठा कवी म्हणून मला तुकाराम महाराज हे श्रेष्ठ वाटतात. मराठी भाषेत अनेक नीती मूल्यांचे शिक्षण आहे. मराठीच्या अस्तित्वावर जर कोणी प्रहार करण्याचा प्रयत्न करणार असेल तर मराठी माणूस तो कदापिही सहन करणार नाही कारण मराठी बाणा हा ताठ कण्यासारखा आहे.”

महाराष्ट्रीय पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करून महोत्सवाचा समारोप करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभय खंडागळे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.वसंत गावडे यांनी केले, सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.व्ही.एम.शिंदे, उपप्राचार्य डॉ.एस. एफ.ढाकणे, उपप्राचार्य,डॉ.के.डी.सोनावणे, डॉ. रमेश काशिदे हे मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.सृष्टी महाकाळ या विद्यार्थिनीने केले., प्रा.रोहिणी मदने यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे आभार डॉ. छाया तांबे यांनी मानले.