Illegal Hoardings | आरक्षित जागेवर अनधिकृत होर्डिंग्स | प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात जनआंदोलन

Categories
Breaking News PMC Political social पुणे
Spread the love

आरक्षित जागेवर अनधिकृत होर्डिंग्स

| प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात जनआंदोलन

पुणे |  वानवडी स.नं.६४ येथील अनधिकृत होर्डिंग व बेकायदेशीर राडारोडयाच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वात नागरी जनआंदोलन करण्यात आले. तसेच होर्डिंग नाही काढल्यास न्यायालयात खेचण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला.
प्रशांत जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार वानवडी सर्वे नंबर ६४ या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे प्ले ग्राउंड, पार्किंग, HCMTR  – रिंग रोड अशा विविध बाबींकरिता आरक्षण आहे. या आरक्षणाच्या जागेमध्ये मागील २०दिवसात तब्बल १५ होर्डिंग्स अनाधिकृतपणे उभी केलेली आहेत. क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांवर दबाव आणून,धमक्या देऊन अशाप्रकारे हे होर्डिंग उभे केलेले आहेत, असा आमचा थेट आरोप आहे. याबाबत प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही, ही कारवाई करावी याकरिता तसेच मार्केट यार्ड परिसरातील विविध बिल्डरचा राडारोडा या ठिकाणी टाकून पुराची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या विरोधामध्ये आज जनआंदोलन करण्यात आले. हे जनआंदोलन करण्यात येत असताना पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुढच्या काही दिवसांमध्ये कारवाई केली नाही, तर त्यांना थेट न्यायालयात खेचण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनासंदर्भात निवेदन स्वीकारण्याकरिता वानवडी रामटेकडी, क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त श्याम तारू हे उपस्थित होते.
 प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात केलेल्या आंदोलनामध्ये मा.नगरसेविका रत्नप्रभाताई जगताप, मा. नगरसेविका नंदाताई लोणकर, मा. नगरसेवक  अशोकभाऊ कांबळे,  प्रफुल्ल जांभुळकर,  केविन मॅन्युअल, प्रीती चड्डा, मृणालिनीताई वाणी, संदीप जगताप ,  स्वाती चिटणीस,   गणेश नायडू व वानवडी परिसरातील तसेच सोसायटीतील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.