Whats App Chat Bot | पुणे महापालिकेच्या ८० प्रकारच्या सेवा whats App वर | पुणे महापालिकेचा हा whats App नंबर तुमच्या कामाचा! 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

पुणे महापालिकेच्या ८० प्रकारच्या सेवा whats App वर

| पुणे महापालिकेचा हा whats App नंबर तुमच्या कामाचा!

पुणे – पुणे महापालिकेकडून नागरिकांना अनेक सुविधा ऑनलाइन देण्यात येतात. पण आता संकेतस्थळावर जाऊन किंवा ॲप डाऊनलोड करण्याची गरज पडणार नाही. 8888251001 हा मोबाईल क्रमांक तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा आणि मेसेज टाकून तुम्हाला हवा असलेला दाखल्याची सॉफ्ट कॉपी मिळवता येणार आहे. जवळपास ८० प्रकारच्या सेवा महापालिकेने whats App वर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. (Pune municipal corporation)

पहिल्या टप्प्यात  मिळकतरासंदर्भातील सेवा सुरू करण्यात आली आहे. आता जन्म-मृत्यू दाखला, पाळीव प्राणी दाखला, यासह इतर सेवा दिल्या जाणार आहे. अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख राहुल जगताप यावेळी उपस्थित होते. सेवा हमी कायद्यानुसार नागरिकांना सर्व प्रकारचे दाखले लगेच देणे आवश्‍यक आहे. अनेक नागरिकांना संकेतस्थळ वापरता येत नाही, तसेच संकेतस्थळावर गेले तर संबंधित विभाग निवडून त्याची प्रक्रिया करण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे हे नागरिक दाखले घेण्यासाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जावे लागते. पण आता ही दाखले मिळविण्याची प्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी वॉट्सॲप chatboat ही सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. (Whats app chat bot)
अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे म्हणाले, “नागरिकांना सहजतेने सर्वप्रकारचे दाखले मिळावेत यासाठी महापालिकेने वॉट्सॲप chatbot  ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात मिळकतकरा संदर्भातील दाखले, पावती व इतर सुविधा उपलब्ध आहे. मिळकतकर विभागाकडे नागरिकाचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकल्यास किंवा प्रॉपर्टी क्रमांक टाकल्यास सर्व माहिती उपलब्ध होईल. तसेच यावरून लगेच संकेतस्थळावर जाऊन बिल देखील भरता येणार आहे. पुढील काळात वाॅट्सअॅप वरूनच बिल भरता येईल अशी सुविधा केली जाईल. (PMC pune)
महापालिकेने यासाठी थेट वॉट्सॲपच्या मेटा कंपनीशी करार केला आहे. दाखल्याची माहिती घेणे, ती तपासून दाखला मिळवणे ही सर्व प्रक्रिया २४ तासात पार पाडली गेली तर महापालिकेकडून प्रति व्यवहार ५० पैसे इतके शुल्क वॉट्सॲप घेणार आहे. नागरिकांना यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही, असे बिनवडे यांनी सांगितले.
जन्म व मृत्यू दाखल्यांसाठी २०१९ नंतर केंद्र शासनाच्या सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीमचे (सीआरएस) सॉफ्टवेअर वापरले जात आहे. त्यामुळे २०१९ नंतरच्या जन्म व मृत्यू दाखल्याची माहिती महापालिकेच्या सर्व्हरवर उपलब्ध नाही. ही माहिती उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे वॉट्सॲप क्रमांकावर २०१९ पूर्वीचेच जन्म व मृत्यू दाखले उपलब्ध होणार आहेत. केंद्र शासनाकडून माहिती महापालिकेच्या सर्व्हरला आल्यानंतर २०१९ नंतरचे दाखलेही उपलब्ध होतील.