Maharashtra Day | राज्य स्थापनेच्या वर्धापनदिनाला महापालिका कर्मचाऱ्यांबाबत महापालिका आयुक्तांचे हे नवीन आदेश 

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र
Spread the love

राज्य स्थापनेच्या वर्धापनदिनाला महापालिका कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य

| महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे |. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त (Maharashtra Day) सोमवार दिनांक १ मे २०२३ रोजी सकाळी ७.१०. ( सात वाजून दहा मिनिटे) वाजता  प्रशासक तथा महापालिका आयुक्त (PMC Pune commissioner) यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण समारंभ महापालिका भवन प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आला आहे. यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य आहे. असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC commissioner Vikram Kumar) यांनी जारी केले आहेत. (PMC Pune)

महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनानिमित्त (Maharashtra state Anniversary) आयोजित राष्ट्रध्वज वंदन व संचलन कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व सेवकांची उपस्थित अनिवार्य आहे. या अनुषंगाने सर्व खातेप्रमुख यांनी आपल्या नियंत्रणाखालील सर्व विभाग व उप विभागातील सेवकांना ध्वजारोहण कार्यक्रमाचे अगोदर किमान १० मिनिटे महापालिका भवन प्रांगणात उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या अधिकारी / सेवकांची उपस्थिती घेण्यात यावी व उपस्थितीचा अहवाल सर्व खातेप्रमुख यांनी न चुकता दिनांक ४/५/२०२३ पर्यंत कामगार कल्याण विभागाकडे सादर करावा. ज्या अधिकारी / सेवकांना ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहणे शक्य नसेल त्यांनी नजिकच्या शासकीय अथवा सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहून तसे लेखी प्रमाणपत्र खातेप्रमुखांकडे सादर करावे.

तरी, सर्व संबंधितांनी राष्ट्रीय पोषाख परिधान करून ध्वजारोहण कार्यक्रमाचे अगोदर किमान १० मिनिटे महापालिका भवन प्रांगणात उपस्थित रहावे. असे आदेशात म्हटले आहे. (Maharashtra State Anniversary)