PMC Pune Employees | महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणे महापालिका कर्मचाऱ्यांना भोवणार 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune Employees | महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणे महापालिका कर्मचाऱ्यांना भोवणार

| अनुपस्थित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे महापालिका आयुक्ताचे आदेश

PMC Pune Employees | महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या (Maharashtra Day) निमित्ताने महापालिकेत 1 मे रोजी  ध्वजारोहनाच्या कार्यक्रम घेण्यात आला. यासाठी पालिकेच्या मुख्य इमारती मधील सुमारे अडीच हजार कर्मचाऱ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले होते. त्याबाबतचे आदेश आधीच देण्यात आले होते. याबाबत ‘द कारभारी’ (The Karbhari) वृत्तसंस्था कडून वृत्त देखील प्रसारित करण्यात आले होते. मात्र  कार्यक्रमासाठी अवघे दोनशे कर्मचारी उपस्थित राहिल्याचे समोर आले आहे. तर, ध्वजारोहनाची वेळ झाली तरी अनेक कर्मचारी उशिरा आल्याने गर्दीच नव्हती. त्यामुळे, संतापलेल्या महापालिका आयुक्तांनी (PMC Commissioner Vikram Kumar) अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. (PMC Pune Employees News)

काय होते आदेश!

महापालिका आयुक्तांच्या (IAS Vikram Kumar) आदेशानुसार महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनानिमित्त (Maharashtra Diwas) आयोजित राष्ट्रध्वज वंदन व संचलन कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व सेवकांची उपस्थित अनिवार्य आहे. या अनुषंगाने सर्व खातेप्रमुख यांनी आपल्या नियंत्रणाखालील सर्व विभाग व उप विभागातील सेवकांना ध्वजारोहण कार्यक्रमाचे अगोदर किमान १० मिनिटे महापालिका भवन प्रांगणात उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या अधिकारी / सेवकांची उपस्थिती घेण्यात यावी व उपस्थितीचा अहवाल सर्व खातेप्रमुख यांनी न चुकता दिनांक ४/५/२०२३ पर्यंत कामगार कल्याण विभागाकडे सादर करावा. ज्या अधिकारी / सेवकांना ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहणे शक्य नसेल त्यांनी नजिकच्या शासकीय अथवा सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहून तसे लेखी प्रमाणपत्र खातेप्रमुखांकडे सादर करावे. (PMC Administrator Vikram Kumar)

तरी, सर्व संबंधितांनी राष्ट्रीय पोषाख परिधान करून ध्वजारोहण कार्यक्रमाचे अगोदर किमान १० मिनिटे महापालिका भवन प्रांगणात उपस्थित रहावे. असे आदेशात म्हटले होते. (Maharashtra State Anniversary)


मुख्य इमारतीमधील सर्व कर्मचाऱ्यांना हा कार्यक्रम अनिवार्य होता, मात्र, मुख्य इमारतीमधील अडीच हजार कर्मचाऱ्यांपैकी केवळ दिडशें ते दोनशें कर्मचारीच या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्यातही सुरक्षा विभाग तसेच महापालिकेच्या विभाग प्रमुखांची संख्या अधिक होती. त्यामुळे, कार्यक्रमाच्या वेळेसच आयुक्त कुमार यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी, संबधित अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त करत अनुपस्थित राहिलेल्या सर्वांवर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.

Maharashtra Diwas | महाराष्ट्र दिवस का साजरा केला जातो? काय आहे महत्व? 

Categories
cultural Education social महाराष्ट्र संपादकीय

Maharashtra Diwas | महाराष्ट्र दिवस का साजरा केला जातो? काय आहे महत्व?

Maharashtra Diwas | महाराष्ट्र दिन (Maharashtra Day), ज्याला महाराष्ट्र दिवस असेही म्हणतात.  हा दिवस भारतातील महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेची (Maharashtra State Formation) आठवण करून देणारा दिवस आहे.  महाराष्ट्र दिन दरवर्षी १ मे रोजी (1 May Maharashtra Day) साजरा केला जातो.  1960 मध्ये या दिवशी, राज्य पुनर्रचना कायद्याचा भाग म्हणून मुंबई राज्याचे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये विभाजन करण्यात आले. (Why is Maharashtra Day celebrated?)
महाराष्ट्र राज्याची स्थापना का करावी लागली? (What is The History of Maharashtra Day?)
 महाराष्ट्राची निर्मिती ही भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना होती.  मुंबई, विदर्भ, मराठवाडा आणि हैदराबाद राज्याच्या काही भागांसह अनेक मराठी भाषिक प्रदेशांचे विलीनीकरण करून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.  महाराष्ट्राच्या वेगळ्या राज्याची मागणी प्रदीर्घ काळापासून होत होती आणि राज्याच्या निर्मितीने मराठी भाषिकांच्या आकांक्षा पूर्ण झाल्या.
महाराष्ट्र का प्रसिद्ध आहे? (Why Maharashtra very Famous in Country?)
 महाराष्ट्र हे एक समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि ज्वलंत इतिहास असलेले राज्य आहे.  हे राज्य मुंबई, पुणे आणि नागपूर यांसारख्या दोलायमान शहरांसाठी आणि अजिंठा आणि एलोरा लेणी, एलिफंटा लेणी आणि गेटवे ऑफ इंडिया यांसारख्या सांस्कृतिक खुणांसाठी ओळखले जाते.  महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिराव फुले यांच्यासारखे महापुरुष जन्मले आणि त्यांनी सामाजिक क्रांती घडवून आणली.
शाळांमध्ये साजरा केला जातो महाराष्ट्र दिन (Maharashtra Day Celebration in School)
 राज्यात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.  ध्वजारोहण समारंभ, परेड, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भाषणे यांनी हा दिवस चिन्हांकित केला जातो.  या दिवशी शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालये बंद राहतात आणि लोक विविध सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतात.  हा दिवस महाराष्ट्रातील लोकांसाठी त्यांच्या राज्याच्या कामगिरीचा उत्सव साजरा करण्याचा आणि राज्याच्या विकासासाठी त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी करण्याचा एक प्रसंग आहे.
महाराष्ट्र दिवसाचे महत्व काय आहे? (What is the importance of Maharashtra Day)
  महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्रातील लोकांसाठी महत्त्वाचा दिवस आहे आणि तो मराठी भाषिक लोकांच्या आकांक्षांचे प्रतीक आहे.  हा दिवस राज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि इतिहास साजरे करण्याचा आणि राज्याच्या विकासासाठी वचनबद्धतेची पुष्टी करण्याचा एक प्रसंग आहे.  महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्रातील लोकांसाठी अभिमानाचा दिवस आहे आणि तो राज्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वाची आठवण करून देणारा आहे.
1 मे लाच का झाली महाराष्ट्राची स्थापना? (1 May 1960 Maharashtra Day)
भाषिक धर्तीवर राज्यांची पुनर्रचना करण्यासाठी भारत सरकारने 1956 च्या राज्य पुनर्रचना कायद्याचा परिणाम म्हणून 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.  मुंबई राज्य, ज्यामध्ये सध्याचा महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील काही भाग समाविष्ट होते, हे द्विभाषिक राज्य होते जेथे मराठी आणि गुजराती दोन्ही भाषा बोलल्या जात होत्या.
 मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य का? (Why Maharashtra state of Marathi speakers?)
 महाराष्ट्राच्या वेगळ्या मराठी भाषिक राज्याची मागणी 20 व्या शतकाच्या सुरुवातीपासून केली जात होती, परंतु 1947 मध्ये भारताला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याला वेग आला. संयुक्त महाराष्ट्र समिती या राजकीय संघटनेची स्थापना 1956 मध्ये करण्यात आली.  वेगळ्या मराठी भाषिक राज्यासाठी आंदोलन झाली.
 स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या मागणीसाठी संयुक्त महाराष्ट्र समितीने अनेक आंदोलने आणि आंदोलने केली.  या चळवळीला महाराष्ट्रातील लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला आणि अखेरीस, 1960 मध्ये, मुंबई राज्याचे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये विभाजन झाले.
संयुक्त महाराष्ट्र समितीचे योगदान काय? (Sanyukt Maharashtra Samiti)
 1 मे हा दिवस अनेक कारणांमुळे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ म्हणून निवडला गेला.  सर्वप्रथम, 1 मे, ज्याला मे दिवस देखील म्हणतात, कामगार चळवळीच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण दिवस आहे आणि तो आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.  संयुक्त महाराष्ट्र समितीने महाराष्ट्र राज्याची निर्मिती हा महाराष्ट्रातील सामान्य लोकांचा आणि कष्टकरी वर्गाचा विजय म्हणून पाहिला.  त्यामुळे १ मे हा महाराष्ट्र राज्य निर्मितीचा दिवस म्हणून साजरा केला जात होता. (On which day was Maharashtra formed?)
 दुसरे म्हणजे, महाराष्ट्रातील मराठी भाषिक प्रदेशातही १ मे या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व आहे.  १ मे हा महाराष्ट्र दिन किंवा महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो आणि हा दिवस आहे जेव्हा महाराष्ट्रातील लोक एकत्र येऊन त्यांची संस्कृती आणि वारसा साजरा करतात. (Which State was formed on 1 May 1960)

CM Eknath Shinde | महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना अजून एक सवलत | राज्य सरकारची घोषणा

Categories
Breaking News Education Political social महाराष्ट्र

महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात २५ टक्के सवलत

| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई |मुंबई मेट्रोमधून (Mumbai Metro) आता ज्येष्ठ नागरिक (senior Citizens), दिव्यांग (Divyang) तसेच विद्यार्थ्यांना (Students) सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. एक मे महाराष्ट्र दिनापासून (Maharashtra Day) २५ टक्के सवलत त्यांना मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांनी केली आहे. मुंबई 1 नॅशनल कॉमन मोबिलिटी (Mumbai one national common mobility card) कार्ड वापरणाऱ्या या श्रेणीतील हजारो प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे.

महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एमएमआरडीए (MMRDA)  यांच्यातफे महाराष्ट्र दिनाची ही भेट असणार आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना ४५ ट्रिप किंवा ६० ट्रिपसाठी मुंबई-1 पासावर ही सवलत मिळेल.

यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांच्या गरजा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही मुंबई मेट्रो नेटवर्क तयार केले आहे, त्यामुळे त्यांना या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ मिळणे आवश्यक आहे. आम्ही यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत केला आहे तर महिलांना सुद्धा एसटी बसेसमधून ५० टक्के प्रवास सवलती दिली आहे. सामाजिक भावनेतून हे निर्णय आम्ही घेतले असून मेट्रो प्रवासातील या सवलतीमुळे देखील अधिक संख्येने लोक यातून प्रवास करतील अशी मला आशा आहे.

कोणाला सवलत मिळेल?

ही सुविधा ६५ वर्षांवरील वरिष्ठ नागरिक, इयत्ता १२ वी पर्यंत शिकणारे विद्यार्थी आणि कायमस्वरूपी दिव्यांग लोकांसाठी आहे. या ३ श्रेणीतील प्रवाशांना सवलतीसाठी काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. दिव्यांगांसाठी सरकारी/वैद्यकीय संघटनेचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पुरावा आणि विद्यार्थ्यांसाठी पॅन (विद्यार्थी किंवा पालक पॅन) सोबत शाळा ओळखपत्र यासारखी वैध कागदपत्रे आवश्यक आहेत.

या सर्व सवलती मेट्रो लाइन २ ए आणि ७ च्या मेट्रो स्टेशनवरील कोणत्याही तिकीट खिडकीत आवश्यक कागदपत्र दिल्यावर मिळू शकतील. नवीन आणि पूर्वी खरेदी केलेल्या मुंबई-1 कार्डवर देखील सवलत असेल तसेच याला ३० दिवसांची वैधता राहील. मुंबई 1 कार्ड रिटेल स्टोअर, पेट्रोल पंप आणि बेस्ट बस प्रवासादरम्यान देखील वापरले जाऊ शकते व रिचार्जही करता येईल.

Maharashtra Day | राज्य स्थापनेच्या वर्धापनदिनाला महापालिका कर्मचाऱ्यांबाबत महापालिका आयुक्तांचे हे नवीन आदेश 

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

राज्य स्थापनेच्या वर्धापनदिनाला महापालिका कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य

| महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे |. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त (Maharashtra Day) सोमवार दिनांक १ मे २०२३ रोजी सकाळी ७.१०. ( सात वाजून दहा मिनिटे) वाजता  प्रशासक तथा महापालिका आयुक्त (PMC Pune commissioner) यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण समारंभ महापालिका भवन प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आला आहे. यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य आहे. असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC commissioner Vikram Kumar) यांनी जारी केले आहेत. (PMC Pune)

महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनानिमित्त (Maharashtra state Anniversary) आयोजित राष्ट्रध्वज वंदन व संचलन कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व सेवकांची उपस्थित अनिवार्य आहे. या अनुषंगाने सर्व खातेप्रमुख यांनी आपल्या नियंत्रणाखालील सर्व विभाग व उप विभागातील सेवकांना ध्वजारोहण कार्यक्रमाचे अगोदर किमान १० मिनिटे महापालिका भवन प्रांगणात उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या अधिकारी / सेवकांची उपस्थिती घेण्यात यावी व उपस्थितीचा अहवाल सर्व खातेप्रमुख यांनी न चुकता दिनांक ४/५/२०२३ पर्यंत कामगार कल्याण विभागाकडे सादर करावा. ज्या अधिकारी / सेवकांना ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहणे शक्य नसेल त्यांनी नजिकच्या शासकीय अथवा सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहून तसे लेखी प्रमाणपत्र खातेप्रमुखांकडे सादर करावे.

तरी, सर्व संबंधितांनी राष्ट्रीय पोषाख परिधान करून ध्वजारोहण कार्यक्रमाचे अगोदर किमान १० मिनिटे महापालिका भवन प्रांगणात उपस्थित रहावे. असे आदेशात म्हटले आहे. (Maharashtra State Anniversary)

Maharashtra Day : विकासकामांमध्ये महाराष्ट्राला कायम पुढेच ठेऊ :  उपमुख्यमंत्री अजित पवार

Categories
Breaking News cultural पुणे महाराष्ट्र

विकासकामांमध्ये महाराष्ट्राला कायम पुढेच ठेऊ
:  उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : कोरोना काळात राज्य शासनाने नागरिकांच्या आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य दिले असले तरीही विकासकामांना कोणतीही खीळ बसणार नाही याकडे आम्ही विशेष लक्ष दिले. सर्वच क्षेत्रात राज्याला पुढे ठेवले असून पुढेच राहील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या विविध योजना आणि गेल्या दोन वर्षातील ठळक कामगिरीचे सचित्र दर्शन घडवणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुणे विभागीय प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे उपस्थित होते. पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर यांनी उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्व जनतेला शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री म्हणाले, आता कोरोनाच्या संकटातून आपण सावरलो असून विकासकामांवर अधिक जोमाने लक्ष देऊ. अर्थसंकल्पात तरतूद केलेली कामे आणि जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण कशी होतील यासाठी वेळोवेळी आढावा घेऊन प्रयत्न करू असेही ते म्हणाले.

प्रदर्शनाची उत्तम मांडणी

गेल्या दोन वर्षात केलेल्या विकासकामांची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून उत्कृष्टपणे देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे शासकीय योजना नागरिकांपर्यंत चांगल्यारीतीने पोहोचतील, अशी प्रतिक्रियादेखील श्री. पवार यांनी यावेळी दिली. त्यांनी प्रत्येक फलकाजवळ जाऊन सविस्तर माहिती घेतली.

यावेळी प्रदर्शनामध्ये ३६० अंश सेल्फी पॉईंटवर आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उभारण्यात आलेल्या सेल्फी फलकाजवळ उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी मोबाईल सेल्फी चित्रफीत काढली.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुणे विभागीय माहिती कार्यालयामार्फत उभारण्यात आलेले हे आकर्षक प्रदर्शन ‘दोन वर्षे जनसेवेची; महाविकास आघाडीची’ ५ मे पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

‘असे आहे प्रदर्शन’

प्रदर्शनात सचित्र मजकूराच्या माध्यमातून  कृषी, महसूल, आरोग्य, पर्यावरण, ग्रामविकास, उर्जा, अन्न व पुरवठा, कामगार कल्याण, सामाजिक न्याय, आदिवासी, जलसंधारण, शिक्षण, क्रीडा, उद्योग, मराठी भाषा, पाणीपुरवठा व स्वच्छता, वने, वस्त्रोद्योग, वैद्यकीय शिक्षण, सहकार, पणन, गृहनिर्माण, महिला व बालविकास, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, नगरविकास आदी विभागांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहितीदेखील प्रदर्शित करण्यात आली आहे.

त्याचबरोबरच पुणे विभागात ५ जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, उद्योग, वैद्यकीय सुविधा, पयर्टन, तीर्थक्षेत्र विकास यांसह विविध विकास योजनांची व कामाची माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे.

State Co-operative Bank : राज्य सहकारी बँक कैद्यांना देणार कर्ज!

Categories
Breaking News Commerce social पुणे महाराष्ट्र

राज्य सहकारी बॅंकेचा कैद्यांना मिळणार ‘जिव्हाळा’

जगातील पहिलीच कर्ज योजना महाराष्ट्र दिनापासून होणार सुरू

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

राज्य सहकारी बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांची माहिती

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतर्फे ‘जिव्हाळा’ या कारागृहातील कैद्यांसाठी तयार करण्यात आलेल्या जगातील पहिल्या कर्ज योजनेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी (१ मे) दुपारी दीड वाजता येरवडा कारागृहात करण्यात येणार असल्याची माहिती बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.

अनास्कर म्हणाले, ‘दीर्घ मुदतीची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, आरोग्य, मुलांचे शिक्षण आणि शिक्षेच्या कालावधीनंतर कैद्यांचे पुनर्वसन सोपे व्हावे या उद्देशाने ही योजना राबविण्यात येणार आहे. कैद्यांना कारागृहातून मिळणाऱ्या उत्पन्नातून (मोबदला) कर्जाची परतफेड होणार आहे. या योजनेमुळे कैदी आणि त्याच्या कुटुंबातील सलोखा वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ‘जिव्हाळा’ असे या योजनेचे नामकरण करण्यात आले आहे. राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक आणि कारागृह सुधारसेवा महानिरीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, पश्चिम विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.’

अनास्कर म्हणाले, ‘प्रथमच गुन्हा केलेला कैदी या योजनेसाठी पात्र राहणार आहे. वार्षिक ७ टक्के दराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. कर्जासाठी तारण किंवा जामीनदाराची आवश्यकता असणार नाही. कर्जाची जबाबदारी राज्य शासनावर राहणार नाही. राज्य बॅंकेत कर्जदाराचे खाते उघडण्यात येणार असून, त्यामध्ये त्याचे उत्पन्न जमा करण्याची जबाबदारी कारागृह प्रशासनाची राहणार आहे. या खात्यातून कर्जाची परतफेड होणार आहे. कर्ज परतफेड रकमेच्या १ टक्के निधी कैद्यांच्या कल्याण निधीत जमा केला जाणार आहे.’

अनास्कर पुढे म्हणाले, ‘राज्य बॅंकेने डिसेंबर २०२१ मध्ये या योजनेचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला होता. राज्य शासनाने या वर्षी २२ मार्चला या प्रस्तावाला मंजुरी दिली. याच वर्षी २४ एप्रिल रोजी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत भाषण करताना कारागृहातील कैद्यांसाठी राष्ट्रीय योजनेअंतर्गत आदर्श कायदा करण्याची घोषणा केली होती. त्यामध्ये कैद्यांसाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याची तरतुद करण्यात आली होती. अशा प्रकारे केंद्र सरकारच्या धोरणाला सुसंगत योजना देशात राबविण्याचा मान राज्य सहकारी बॅंकेने पटकाविला आहे.’