Bill checking work | वेतन लवकर करण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही बिल तपासणीचे काम सुरु  | मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांचे आदेश 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

वेतन लवकर करण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही बिल तपासणीचे काम सुरु

| मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांचे आदेश

पुणे | महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगापोटी मिळणारी पहिल्या हफ्त्याची रक्कम उशीराच मिळणार असे दिसत आहे. कारण संगणक प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे हा उशीर होत आहे. त्यामुळे आता हफ्त्याच्या अगोदर वेतन होणार आहे. त्यासाठी बिल तपासणीची लगबग सुरु आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार बिल तपासनीस शनिवार आणि रविवार देखील काम करणार आहेत. त्यानुसार काम सुरु आहे.
महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी तसेच माध्यमिक, उच्च माध्यमिक, तंत्र शाळांकडील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगापोटी पाच समान हत्यांपैकी पहिल्या हत्याची रक्कम जुलै २०२२ मध्ये अदा करणे बाबतची संगणक प्रणाली  अद्ययावत करण्यात आलेली होती. संगणक प्रणालीचा वापर करून पहिल्या हफ्त्याची रक्कम अदा केली जाणार आहे. त्यानुसार लेखा व वित्त विभागाचे परिपत्रक बाकी होते. विभागाने हे परिपत्रक जारी केले. 5 ऑगस्ट पर्यंत ही बिले तपासून घेण्याचे आदेश लेखा विभागाने सर्व विभागांना दिले होते. त्यामुळे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पहिला हफ्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. हफ्त्याची रक्कम मिळाल्यानंतर जुलै महिन्याचे वेतन होणार आहे. असे ही लेखा व वित्त विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र आता वेतनच पहिले दिले जाणार आहे.

काय आहेत आदेश?

पुणे महानगरपालिका सर्व अधिकारी/कर्मचारी यांना ७ व्या वेतन आयोगानुसार जुलै-२०२२ पेड इन ऑगस्ट महिन्याचे वेतन (वेतनवाढी सह ) अदा करणेबाबत मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) यांनी आदेश दिलेले असून, त्यानुसार नियमित वेतन बिलांची तातडीने तपासणी करणे आवश्यक आहे. जेणेकरून सर्व मनपा कर्मचाऱ्यांचे माहे जुलै २०२२ वेतन अदा करता येईल.

सांख्यिकी व संगणक विभागाने तयार केलेल्या संगणक प्रणालीमध्ये अनेक तांत्रिक अडचणी असल्याने तसेच मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) यांनी दिलेल्या आदेशानुसार पगार बिल ऑडीट विभागाकडील सर्व ऑडिटर सेवकांनी शनिवार दि.०६/०८/२०२२ व रविवार दि. ०७/०८/२०२२ रोजी कामावर उपस्थित राहून माहे जुलै २०२२ या महिन्याचे नियमित पगार बिलांची तपासणी करण्यात यावी.
तसेच मनपा भवनातील सर्व कार्यालये व १५ क्षेत्रीय कार्यालये, परिमंडळ कार्यालय १ ते ५ मधील संबंधित बिल लेखनिक व वरिष्ठ कर्मचारी यांनी देखील शनिवार दि. ०६/०८/२०२२ व रविवार दि. ०७/०८/२०२२ रोजी प्रत्यक्ष कामावर उपस्थित राहून माहे जुलै २०२२ या महिन्याचे नियमित पगार
बिलांची तपासणी करून घेण्याची दक्षता सर्व संबंधित खातेप्रमुख / विभागप्रमुख यांनी घ्यावी.