Lift | महापालिकेचे क्लास वन अधिकारी लिफ्ट मध्ये पडले अडकून | अर्धा तासपर्यंत मदत मिळाली नाही 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

महापालिकेचे क्लास वन अधिकारी लिफ्ट मध्ये पडले अडकून | अर्धा तासपर्यंत मदत मिळाली नाही

| विद्युत विभागाचा हलगर्जीपणा

पुणे | महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या (Water department pmc) मुख्य अभियंता (Chief Engineer) सहित महत्वाचे अधिकारी आणि कर्मचारी घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या (Ghole Road ward office) लिफ्ट मध्ये अडकले (stuck in lift). जवळपास अर्धा तास पर्यंत या अधिकाऱ्यांना मदत मिळाली नाही. लिफ्टला विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा सदोष असल्याने दुपारच्या सुमारास ही घटना घडली.  याला विद्युत विभागाचा हलगर्जीपणा कारणीभूत मानला जात आहे. (PMC Pune)
महापालिकेचे घोले रोड क्षेत्रीय कार्यालय हे महत्वाचे कार्यालय आहे. इथे नागरिक, कर्मचारी तर येतच असतात शिवाय महापालिका आयुक्त इथे महत्वाच्या बैठका घेत असतात. गेल्या काही दिवसापासून तर महापालिका आयुक्त इथे सर्वसाधारण सभा, स्थायी समिती व इतर समितीच्या बैठक घेऊ लागले आहेत. त्यामुळे महापालिका भवनातील महत्वाच्या अधिकाऱ्यांना इथे यावे लागते. आज देखील अतिरिक्त आयुक्तांनी बजेट बाबत बैठक बोलावली होती. यासाठी पाणीपुरवठा विभागाचे महत्वाचे अधिकारी बोलावले होते. यामध्ये मुख्य अभियंता यांचा देखील समावेश होता. क्षेत्रीय कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर ही बैठक बोलावण्यात आली होती. त्यामुळे हे सर्व लोक लिफ्ट ने वरती चालले होते. यामध्ये काही दिव्यांग महिला कर्मचारी देखील होते. मात्र अचानक लिफ्ट बंद झाली. Power सप्लाय न मिळाल्याने लिफ्ट बंद पडली. अचानक लिफ्ट बंद पडल्याने काही कर्मचारी घाबरले. मात्र या लोकांना लवकर मदत मिळू शकली नाही. अतिरिक्त आयुक्तांपासून सगळ्यांना आतून फोन करण्यात आले. लिफ्टला विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा सदोष असल्याने अर्धा तास पर्यंत यांना मदत मिळाली नाही. बऱ्याच प्रयत्नानंतर लिफ्ट सुरु झाली आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. (Ghole road ward office lift)
याबाबत आता विद्युत विभागाचा हलगर्जीपणा कारणीभूत मानला जात आहे. कारण लिफ्ट आणि विद्युत यंत्रणेची वेळेवर दुरुस्ती करणे आवश्यक असते. ती होताना दिसत नाही. आठवड्यातून किमान एकदा तरी maintainace होणे आवश्यक आहे. तसेच लिफ्ट अचानक बंद पडल्यावर  Automatic rescue device असणे गरजेचे असते. मात्र तेही इथे नव्हते. या यंत्रणेने किमान कोणी लिफ्ट मध्ये अडकून पडत नाही. लिफ्ट थांबली असेल तर तात्काळ जिथे दरवाजा असतो तिथे लिफ्ट उघडली जाते. तसेच आत मध्ये एखादा अडकला तर intercom ची सुविधा असणे गरजचे असते किंबहुना ती असायला पाहिजे. जेणेकरून तात्काळ सुरक्षा यंत्रणेला कळवले जाईल. मात्र ती ही सुविधा इथे दिसून आली नाही. (pune municipal corporation)
| आपण यातून काही धडा घेणार आहोत का? 
याआधी देखील लिफ्ट मध्ये अडकून पडल्याच्या किंवा लिफ्ट अचानक खाली आदळल्याच्या घटना घडल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते तसेच विधासभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना देखील असाच प्रसंग अनुभवास आला. महापालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटल मध्ये देखील एका महिलेला लिफ्ट मध्ये जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात देखील आयुक्त नेहमी बैठक घेत असतात. असे असताना एवढा हलगर्जीपणा का दाखवला जावा. असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावरून तरी आपण काही शिकणार आहोत का? लिफ्ट च्या सुरक्षेसाठी lift act बनवण्यात आला आहे. त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग केला जाणार आहे का? (Lift maintainance)