PMC 74th Anniversary | पुणे महापालिकेच्या 42 व्या फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शनाचे उदघाटन आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते संपन्न! 

Categories
Breaking News cultural PMC social पुणे
Spread the love

PMC 74th Anniversary | पुणे महापालिकेच्या 42 व्या फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शनाचे उदघाटन आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते संपन्न!

PMC 74th Anniversary | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) ७४ व्या वर्धापन दिनानिमित्ताने (PMC 74th Anniversary) ४२ वे फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शन छत्रपती संभाजीराजे उद्यानात (Chhatrapati Sambhaji Garden Pune) आयोजित करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महानगरपालिका (Vikram Kumar PMC Commissioner) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमास अशोक घोरपडे, मुख्य उद्यान अधिक्षक तथा सदस्य सचिव, वृक्ष प्राधिकरण तसेच संतोषकुमार कांबळे, उद्यान अधिक्षक व  राहुल साळुंके, कार्यकारी अभियंता, उद्यान विभाग, संदीप काळे, द.स. पोळेकर, शिल्पा भोसले तसेच उद्यान विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (PMC Garden Department)
या प्रदर्शनामध्ये वेगवेगळे एकूण २६६ विभाग आहेत. त्यामध्ये शोभिवंत पानाफुलांच्या कुंड्यांची मांडणी, औषधी वनस्पतींचा संग्रह, गुलाब पुष्पांची मांडणी, हंगामी फुले, टेबल सजावट, वेगवेगळ्या प्रकारची फुले, भाजीपाला,bसॅलेड डेकोरेशन, बचत गटातील महिलांसाठी, फळे भाजीपाल्यावर प्रक्रिया करून तयार केलेले पदार्थ, विविध प्रकारचे हार, पुष्पगुच्छ, शिप, वेण्या प्रदर्शनात मांडण्यात आलेले होते तसेच निसर्ग व पर्यावरणावर आधारित छायाचित्रांसाठी स्वतंत्र विभाग ठेवण्यात आलेले आहेत. विविध प्रकारचे डेलिया, आर्किड, अॅन्थुरिअम, जरबेरा, गुलाब, कार्नेशन इ. प्रकारची हंगामी तसेच बहुवार्षिक फुलझाडे या प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण आहे. (Pune PMC News)
या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या उद्यानांच्या प्रतिकृती पाहण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आहेत. सदर प्रदर्शनानिमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये ११०० स्पर्धकांनी विविध विभागामध्ये एकूण ३००० इतक्या प्रवेशिका घेतलेल्या असून, सदर स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या सायंकाळी ५.०० वा. छ. संभाजीराजे उद्यान, जंगली महाराज रस्ता, या ठिकाणी विकास ढाकणे, अतिरिक्तमहापालिका आयुक्त (विशेष) यांचे अध्यक्षतेखाली व दीपक टिळक, मुख्य सल्लागार रोझ सोसायटी ऑफ पुणे यांचे शुभ हस्ते आयोजित करणेत आलेला आहे.
या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने घनकचरा विभाग, पर्यावरण केंद्र, पुष्करणी, निसर्ग सेवक, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, फ्रेंड्स ऑफ बोन्साय, ब्रम्ह कुमारीज विश्व विद्यालय, कृषी महाविद्यालय इ. संस्था सहभागी झालेल्या असून या प्रदर्शनामध्ये बोन्साय, फीचर्स गार्डन, पुष्करणीच्या विविध पुष्परचना तसेच पर्यावरणपूरक वाद्य निर्मितीची संकल्पना इ. नागरिकांना पहावयास मिळेल.
पुणे महानगरपालिकेचे PMC CARE यांचे वतीने या प्रदर्शनाच्या निमित्ताने नागरिकांना प्रदर्शनास भेट दिल्यानंतर PMC CARE APP वर सेल्फी पाठविण्याचे आवाहन करण्यात आलेले होते, त्यानुसार, PMC CARE APP मधील ४२ वे फळे,फुले व भाजीपाला प्रदर्शन २०२४ या ग्रुप वर नागरिकांनी उस्फुर्तपणे प्रतिसाद नोंदविलेला आहे.
सदरचे प्रदर्शन सर्व नागरिकांना आज पासून उद्या पर्यंत रात्री ९.०० वा. वाजेपर्यंत सर्वासाठी मोफत खुले राहील तरी सर्व नागरिकांनी सदरच्या प्रदर्शन पाहण्याच्या जास्तीत जास्त लाभ घेण्यात यावा. असे आवाहन उद्यान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.