PMC Employees Income Tax | वेतनातून Income tax कपात होऊनही पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना आयकर विभागाची नोटीस!

Categories
Breaking News Commerce PMC पुणे
Spread the love

PMC Employees Income Tax | वेतनातून Income tax कपात होऊनही पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना आयकर विभागाची नोटीस!

| बिल क्लार्क च्या चुकांमुळे महापालिका कर्मचारी हैराण

PMC Employees Income Tax | (Author : Ganesh Mule) | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनातून आयकर (Income tax) कपात केली जाते. काही कर्मचारी दर महिन्याला देतात तर काही वर्षातून एकदा. वेळच्या वेळी आयकर भरूनही बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना आयकर भरा, अशा प्रकारच्या नोटीसा आयकर विभागाकडून (Income Tax Department) येत आहेत. यामुळे महापालिका कर्मचारी हैराण झाले आहेत. याबाबत महापालिका प्रशासनाकडून योग्य ते पाऊल उचलले जावे, अशी मागणी कर्मचारी करत आहेत. ( PMC Employees Income Tax)
आयकर नियमानुसार आणि कर रचनेनुसार महापालिकेचे कर्मचारी आयकर सरचार्ज भरण्यासाठी पात्र होतात. अशा कर्मचाऱ्यांचा वेतनातून आयकर कापला जातो. काही कर्मचारी प्रत्येक महिन्याला आयकर भरतात तर काही वर्षातून एकदाच. महापालिकेच्या वित्त व लेखा विभागाकडून  वेतनातून रक्कम कापली जाते. दरम्यान वेतनातून आयकर कपात झाल्यानंतर तो आयकर विभागाकडे भरून त्याची नोंद होणे गरजेचे असते. हे काम प्रत्येक विभागाच्या बिल क्लार्क चे असते. तशी जबाबदारी त्यांच्याकडे दिली गेली आहे. काही विभागाकडे दोन ते तीन बिल क्लार्क देखील असतात. असे असतानाही थोड्याशा तांत्रिक चुकांमुळे कर्मचाऱ्यांच्या आयकर भरल्याची नोंद होत नाही. यामध्ये पॅन क्रमांक व्यवस्थित न टाकणे, नावात गफलत असणे, अशा तांत्रिक चुका होत आहेत. परिणामी आयकर विभागाकडे आयकर भरला नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आयकर भरला नसल्याच्या नोटीसा आयकर विभागाकडून कर्मचाऱ्यांना येत आहेत. (Pune Municipal Corporation)
यातील काही प्रकरणे ही 2010 च्या आधीपासूनची आहेत. यामुळे कर्मचारी हैराण झाले आहेत. कारण यात सुधारणा करण्याची मागणी कर्मचारी जेव्हा संबंधित बिल क्लार्क कडे करतो, तेव्हा तो क्लार्क टाळाटाळ करतो. माझ्या आधीच्या लोकांच्या या चुका आहेत, असे म्हणून तो हात वर करतो. यात कर्मचाऱ्यांचे काम तसेच प्रलंबित राहते. तसेच काही कर्मचाऱ्यांनी लेखा व वित्त विभागाकडे देखील तक्रार केली. त्यांच्याकडून सांगण्यात येते कि हे काम संबंधित विभाग आणि त्याकडील बिल क्लार्क चे आहे. आम्ही फक्त वेतनाबाबत काम करतो. मात्र आयकर ची नोटीस असल्याने काही लोक भांबावून जातात. त्यामुळे त्यांना खाजगी सीए चा सल्ला घेऊन काम करावे लागते. त्यासाठी त्यांना पैसे देखील मोजावे लागतात. मात्र बिल क्लार्क च्या चुकांचे खापर आमच्या माथी का, असा प्रश्न कर्मचारी विचारत आहेत. (PMC Pune Employees)
वस्तुतः आयकर असा कर आहे, ज्याच्या रचनेत सरकार दरवर्षी बदल करते. याची अद्ययावत माहिती बिल क्लार्क कडे असणे गरजेचे आहे. बिल क्लार्क ही सगळी अद्ययावत माहिती लेखा व वित्त विभागाने देणे आवश्यक आहे. लेखा विभाग म्हणतो कि आम्ही याबाबत बिल क्लार्क ना प्रशिक्षण देखील देतो. तरीही त्यांच्याकडून चुका होतात. यावर आळा घालण्यासाठी प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. (Pune Municipal Corporation Employees)
—-
महापालिका कर्मचाऱ्यांचे आयकर भरल्याची सिस्टम मध्ये नोंद करण्याचे काम बिल क्लार्क चे आहे. मात्र त्यांच्या हातून होत असलेल्या छोट्याश्या तांत्रिक चुकांमुळे नोंद होत नाही. परिणामी आयकर भरल्याचे दिसत नाही. बिल क्लार्कनी आपल्या कामात सुधारणा करण्यासाठी आम्ही त्यांना लवकरच प्रशिक्षण देऊ.
उल्का कळसकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी. 
—-
News Title | PMC Employees Income Tax | Income tax department notice to Pune municipal employees despite income tax deduction from salary!