PMC Pune Property Tax Department |कर आकारणी विभागात पुन्हा येण्यासाठी कर निरीक्षक यांची लॉबिंग 

Categories
Breaking News PMC Political पुणे
Spread the love

PMC Pune Property Tax Department |कर आकारणी विभागात पुन्हा येण्यासाठी कर निरीक्षक यांची लॉबिंग

| कॉंग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांचा आरोप

PMC Pune Property Tax Department | कॉंग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे (Congress city president Arvind Shinde) यांनी आरोप केला आहे कि, सामान्य प्रशासन विभागाच्या वरिष्ठांना हाताशी धरून येनकेन मार्गाने पुन्हा कर संकलन विभागात घुसखोरी करण्याच्या हालचाली  कर निरीक्षक (Tax inspector) लॉबिंग द्वारे करत आहेत . त्यामुळे  कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडील बदली झालेल्या सेवकांची तसेच ३ वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या कर्मचारी यांची पुन्हा कोणत्याही कारणास्तव कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडे तात्पुरती बदली अथवा प्रशासकीय कामकाजासाठी बदली अथवा प्रत्यक्ष कामास घेण्यात येऊ नये. अशी मागणी अरविंद शिंदे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांच्याकडे केली आहे.

शिंदे यांच्या पत्रानुसार महानगरपालिका (Pune Municipal Corporation) प्रशासानाकडील कार्यकारी अभियंता, उप अभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, अनुरेखक, अधिक्षक, उप अधिक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक अशा हुद्द्यावरील अधिकारी व कर्मचारी हे अनेक वर्ष एकाच खात्यात एकाच क्षेत्रासाठी काम करीत असून (उदा.बांधकाम विभागाकडील अभियंते, विभागीय निरीक्षक, पेठ निरीक्षक) पर्यायाने त्यांची मक्तेदारी तयार होत असल्याने अनेक लोकप्रतिनिधींनी मनपा अधिकारी व कर्मचारी यांची बदली करणेची मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्यानुसार पुणे महानगरपालिका प्रशासानाकडील अधिकारी व कर्मचारी यांच्या शासन धोरणानुसार २०% नियतकालिक बदल्या झालेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने महसुलाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे खाते कर आकारणी व कर संकलन विभागाकडील गेली १० ते १२ वर्षे सेवकांची बदली न झाल्याने मक्तेदारी झाली होती. सबब संदर्भ क्र.१ ते ६ अन्वये कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडील सेवकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. (PMC pune)

शिंदे यांनी पुढे म्हटले आहे कि, कर आकारणी व कर संकलन विभाग हा मनपाच्या महसुलाच्या दृष्टीने महत्वाचा विभाग आहे. या विभागात अनुभवी सेवक यांची अत्यंत गरज दाखवण्यासाठी कर संकलन विभागाच्या कामकाजात जाणीवपूर्वक विस्कळीतपणा आल्याचे भासविला जात आहे. वास्तविक संगणक युगात अवघ्या चार दिवसाच्या प्रशिक्षणाने कोणीही नवीन सेवक कर आकारणी विभागाचे कामकाज आत्मसात करू शकतो. यापूर्वी प्रस्थपित सेवकवर्ग बदलून नवीन सेवक वर्ग आणल्यावर मनपाचे महसुली उत्पन्न वाढल्याचा प्रशासनाला अनुभव आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या वरिष्ठांना हाताशी धरून येनकेन मार्गाने पुन्हा कर संकलन विभागात घुसखोरी करण्याच्या हालचाली आर्थिक हितसंबंध दुरावलेले कर निरीक्षक लॉबिंग द्वारे करीत असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. उपनगरामध्ये कर निरीक्षक पदी तात्पुरता अधिभार घेण्यास आर्थिक गैरव्यवहार सुरु आहेत अशी चर्चा आहे. (PMC pune news)

आमची या पत्राद्वारे मागणी आहे कि कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडील बदली झालेल्या सेवकांची तसेच ३ वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या कर्मचारी यांची पुन्हा कोणत्याही कारणास्तव कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडे तात्पुरती बदली अथवा प्रशासकीय कामकाजासाठी बदली अथवा प्रत्यक्ष कामास घेण्यात येऊ नये. यापूर्वी कर आकारणी व कर संकलन विभागाकडील गैरव्यवस्थापन आपल्या निदर्शनास आणून दिले असून त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झाल्याचे दिसून आले नाही. अनेक लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या मागणीतील तथ्य न तपासण्याचा आलेला दुर्दैवी पायंडा आपण बदलावा, कर निरीक्षकाच्या लॉबिंग पुढे प्रशासनाने न झुकता खंबीरतेने शहराच्या महसूल वाढीसाठी कार्यरत राहावे. असे शिंदे यांनी म्हटले आहे. (Pune Property Tax)


News Title | PMC Pune Property Tax Department |Lobbying of tax inspectors to rejoin taxation department| Allegation of Congress City President Arvind Shinde