PMC Pune Encroachment Department | पुरेसा बंदोबस्त असल्याशिवाय अतिक्रमण कारवाया करणार नाही 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

PMC Pune Encroachment Department | पुरेसा बंदोबस्त असल्याशिवाय अतिक्रमण कारवाया करणार नाही

| अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांची भूमिका

PMC Pune Encroachment Department | पुणे शहरात (Pune News) ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या (Dhole Patil ward office) हद्दीत अतिक्रमण कारवाई (Encroachment Action) करत असताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना (PMC Pune employees) तिथल्या व्यावसायिकाकडून मारहाण झाली. याचा निषेध म्हणून अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मनपा भवनात आंदोलन (PMC employees Agitation) केले. तसेच महापालिका प्रशासनाकडे (Pune civic body) मागणी केली कि महापालिकेचा आणि पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त असल्याशिवाय आम्ही कारवाईला जाणार नाही. याबाबत कर्मचाऱ्यांनी आणि कर्मचारी संघटनेने महापालिका अतिरिक्त आयुक्तांना निवेदन दिले. (PMC Pune encroachment Department)

व्यावसायिकांवर गुन्हा दाखल

सध्या पुणे शहरामध्ये जी-२० बैठकांच्या अनुषंगाने शहरातील रस्ते, पदपथांवरील सर्व प्रकारची अनधिकृत अतिक्रमणे हटविणेबाबत उप आयुक्त (अतिक्रमण) यांनी यापूर्वी आढावा बैठकांमध्ये वेळोवेळी आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने सर्व क्षेत्रिय कार्यालयांमधील अतिक्रमण निर्मुलन पथकांमार्फत रस्ता, पदपथांवरील सर्व अतिक्रमणे हटविणेची मोहीन अतिक्रमण विभागामार्फत प्रखरपणे राबविली जात आहे. त्या अनुषंगाने दि. १६/०५ रोजी ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालय हद्दीमध्ये अतिक्रमण निर्मुलनाची कारवाई पुणे स्टेशन ते कैलास स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता (नायडू हॉस्पिटल वसाहत) या दरम्यान करीत असताना तेथील पथारी व्यवसायिकांनी या कार्यालयाकडील सेवक   प्रशांत कोळेकर, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक,   रवी जाधव, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक व  आकाश लोखंडे, सुरक्षा रक्षक यांचेवर जीवघेणा हल्ला करून मोठ्या प्रमाणात धक्काबुक्कीसह मारहाण करण्यात आलेली आहे. सदर घटनेबाबत बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्या आलेला असून मारहाण
करणाऱ्यांपैकी ५ जणांना स्थानिक पोलीसांनी अटक केली असून २ जनांचा शोध घेणे चालू आहे. (PMC Pune News)

: याआधी देखील मारहाणीची घडली होती घटना

यापूर्वी १९/०३/२०२३ रोजी मध्यवर्ती पथकांचे सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक श्री. अंकुश बादाड हे शिंदे पूल, (एनडीए ग्राउंडलगत) वारजे माळवाडी, एनडीए रस्ता अतिक्रमण निर्मुलनाची कारवाई करीत असताना फेरीवाला व्यवसायिकाने मारहाण करून त्यांचे हाताची बोटे फ्रॅक्चर केलेली असून त्यांचे खांदयाची हाडे देखील फ्रॅक्चर झालेली असल्याने त्याबाबत देखील स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तसा गुन्हा दाखल करून कलम ३५३, ३३२, ३३३, १८३, १८६ ५०४, १४१, १४३, १४७, १४९ इत्यादी कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संबंधीत सेवक आजमितीस त्याबाबत उपचार घेत आहेत. (Pune Municipal Corporation)

 मनपा भवनात हिरवळीवर आंदोलन

अशा  घटना सातत्याने घडत असून त्याची मूळ कारणे म्हणजे कारवाईचे वेळी आवश्यक तो पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध न होणे, पोलीस कर्मचाऱ्यांऐवजी सुरक्षा रक्षकाच्या मदतीने कारवाया कराव्या लागणे, स्थानिक पोलीस स्टेशनकडून कारवायांच्यावेळी मागण्या करून देखील पोलीस बंदोबस्त उपलब्ध न होणे, तसेच क्षेत्रिय कार्यालय स्तरावर संवेदनशील कारवाईवेळी कोणतेही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसणे इ. विविध बाबींमुळे सद्यस्थितीत अतिक्रमण निर्मुलन पथकांवर जीवघेणे हल्ले सातत्याने होत असल्याने आमच्यामध्ये व आमच्या कुटुंबांमध्ये भितीचे वातारणात तयार होऊन अभया मानसिकतेवर देखील परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे काल घडलेल्या मारहाणीच्या अनुषंगाने १७/०५/२०२३ रोजी मनपा जुन्या इमारतीच्या मुख्य गेटबाहेर मनपा कामगार युनियन व अतिक्रमण विभागाकडील सर्व अधिकारी व कमर्चारी यांचेमार्फत निषेध सभा घेण्यात आली आहे. (PMC Pune employees)
निषेध सभेमध्ये मनपा कामगार युनियनचे पदाधिकारी व अतिक्रमण विभागाकडील सर्व अधिकारी व  कर्मचाऱ्यांकडून या मागण्या करण्यात आलेल्या आहेत.

१) सर्व प्रकारच्या अतिक्रमण निर्मुलन कारवाया करतेवेळी पुरेसा मनपाकडील अथवा स्थानिक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून दिल्याशिवाय अतिक्रमण निर्मूलनाच्या कारवाया करण्यात येणार नाहीत.
२) कारवायांच्यावेळी आवश्यक ती यंत्रसामुग्री / मनुष्यबळ व वाहने सतत उपलब्ध करून दिली जावीत.
३) कोणत्या ही संवेदनशील कारवायांच्या वेळी स्थानिक पोलीस बंदोबस्त त्वरित उपलब्ध करून देण्याची कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी.
४) या विभागामधील सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक / अतिक्रमण निरीक्षक / क्षेत्रिय अतिक्रमण निरीक्षक यांच्या या एकाच विभागामध्ये सातत्याने वादविवादाचे कामकाज कराने लागत असल्याने कार्यकुंठीतता
येऊन मानसिकतेवर परिणाम होऊ लागल्याने आमच्या मनपाच्या इतर समकक्ष विविध विभागांमध्ये २ तातडीने बदल्या करण्याचे धोरण तयार करून बदल्या करण्यात याव्यात. (Pune News)
—–
News Title | PMC Pune Encroachment Department | No trespassing operations will take place unless adequate security is in place| Role of Encroachment Department Staff