PMC Sport Complex | PMC Swimming Tank | शहरातील 10 क्रीडा संकुलाची पुणे महापालिका करणार दुरुस्ती 

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

PMC Sport Complex | PMC Swimming Tank | शहरातील 10 क्रीडा संकुलाची पुणे महापालिका करणार दुरुस्ती

| मेडिकल कॉलेज च्या निधीतून वर्ग केला जाणार निधी

PMC Sport Complex | PMC Swimming Tank |  पुणे | शहरात पुणे महापालिकेची (Pune Municipal Corporation) क्रीडा संकुले (PMC Sport complex) आणि जलतरण तलाव (PMC Swimming Tank) आहेत. मात्र त्यांची देखभाल दुरुस्ती न केल्याने त्याचा वापर करता येत नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात महापालिका प्रशासन 10 क्रीडा संकुलाची दुरुस्ती करणार आहे. यासाठी जवळपास 2 कोटी निधीची आवश्यकता आहे. हा निधी मेडिकल कॉलेज (PMC Medical College) च्या कामातून वर्ग केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून मंजुरीसाठी स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवला आहे. (PMC Pune News)
क्रीडा संकुले वापरता येत नसल्याची तक्रार नागरिक तसेच खेळाडू करतात. त्यामुळे महापालिकेने यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या कामांसाठी पुरेशी तरतूद उपलब्ध नाही. 1 कोटी 94 लाखाची यासाठी आवश्यकता आहे. हा निधी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय च्या कामातून घेतला जाणार आहे.

| या क्रीडा संकुलाची केली जाणार आहेत कामे

1. खराडी स.नं.4/१/१ व ४/१/२ येथील जलतरण तलावाचे दुरुस्ती विषयक कामे करणे.
2. प्रभाग क्र. २६ कौसरबाग, कोंढवा येथील स्वातंत्रवीर सावरकर जलतरण तलाव येथे स्थापत्य विषयक कामे करणे.
3. निळू फुले जलतरण तलाव येथे दुरुस्ती विषयक कामे करणे.
4. वडगाव बु. . येथील वांजळे जलतरण तलावाची दुरुस्ती विषयक कामे करणे.
5.  पुणे महानगरपालिका कै. शिवाजीराव ढुमे बॅडमिंटन हॉल व क्रीडा संकूल येथे स्थापत्य विषयक कामे करणे
6. प्र. क्र. २५ बापुसाहेब केदारी जलतरण तलाव, वानवडी येथे विविध विकास कामे करणे.
7. प्रभाग क्र. २३ हडपसर येथील पिराजी कोयाजी डांगमाळी, जलतरण तलाव येथे स्थापत्य विषयक कामे करणे.
8. वारजे मा. बारटक्के जलतरण तलाव येथे क्रीडा संकुलाच्या स्थापत्य विषयक दुरुस्ती विषयक कामे करणे.
9. वारजे येथील छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावाची दुरुस्तीची कामे करणे.