PMC Ward no 2 | प्रभाग २ मधील विकासकामांना आयुक्तांचा हिरवा कंदील | भरघोस निधीची तरतूद ; माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे यशस्वी प्रयत्न

Categories
Breaking News PMC Political social पुणे
Spread the love

PMC Ward no 2 | प्रभाग २ मधील विकासकामांना आयुक्तांचा हिरवा कंदील

| भरघोस निधीची तरतूद ; माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे यशस्वी प्रयत्न

The Karbhari News Service | पुणे महापालिकेच्या प्रभाग २ मधील रस्ते विकसित करणे, नवीन ड्रेनेज लाईन टाकणे, सीसीटीव्ही बसविणे आदींसह विविध कामांसाठी आयुक्त विक्रम कुमार यांनी भरघोस निधींची तरतूद केली आहे. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे प्रभागातील विकासकामांना गती मिळणार आहे. या कामांसाठी निधीची तरतूद करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर निधीसाठी आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती डॉ. धेंडे यांनी दिली.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून प्रशासक राजवट आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने नागरिक समस्या घेऊन येत आहेत. काही ठिकाणी विकासकामे रखडली आहेत. प्रभाग क्रमांक दोन मध्ये अनेक कामांना गती देणे गरजेचे होते. यासाठी डॉ. धेंडे यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे सातत्याने निवेदन देऊन पाठपुरावा केला आहे. त्या बाबत आयुक्तांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत डॉ. धेंडे यांनी सुचविलेल्या कामांना निधींची तरतूद करून दिली आहे.

या कामांमध्ये विविध गोष्टींचा समावेश आहे. या मध्ये बीएसयुपी अंतर्गत येणाऱ्या चंद्रमानगर, येरवडा येथील नागरिकांच्या घरांचा प्रश्न आठ वर्षांपासून रखडला होता. त्यासाठी निधींची तरतूद करण्यात आली आहे. येरवडा पोस्ट कार्यालय ते मेंटल कॉर्नर दरम्यान असणाऱ्या येरवडा जेलसमोरील रस्ता विकसित करणे. तसेच कॉमरझोन चौक ते महिला बाल विकास कार्यालय रस्ता विकसित करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. प्रभागातील सर्व झोपडपट्टयांमधील रस्ते विकसित करणे तसेच ड्रेनेजलाईन टाकण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. शांतीरक्षक चौक ते सह्याद्री हॉस्पिटल दरम्यान ६०० मिमी मलवाहिनी टाकन्यात येणार आहे. महाराष्ट्र हौसिंग बोर्ड एलटाईप, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड एमटाईप, बैठी चाळ, नागपूर चाळ, तक्षशिला विहारासमोर, पंचशील नगर मधील गणपती मंदिर समोर ड्रेनेजलाईन टाकणे व कॉक्रिट करन्यात येणार आहे. जाधवनगर देवी मंदिरासमोरील ड्रेनेज लाईन टाकणे व कॉक्रिट करणे. श्रमिक वसाहत येथील ड्रेनेज लाईन टाकणे व कॉक्रिट करणे. शांतीनगर देवी मंदिर समोरील ड्रेनेज लाईन टाकणे व कॉक्रिट करणे. विविध उद्यानांमधील विकासाची कामे करणे. विविध ठिकाणचे सीसीटीव्ही देखभाल व दुरूस्ती करणे. विविध समाजमंदिराची देखभाल व दुरूस्ती करणे आदी कामांसाठी निधींची तरतूद करण्यात आली आहे. शहरात मागासवर्गीय कल्याण निधीसाठी भरीव निधी देण्यात आला आहे. येरवडा येथील अण्णा भाऊ साठे सभागृहासाठी एक कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी वरील कामांबाबत आयुक्तांकडे पत्रव्यहार करून निधीच्या तरतुदीबाबत सुचविले होते. त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे प्रभागातील विकासकामांना गती मिळणार आहे.

——
पुणे महापालिकेच्या प्रभाग २ मधील विविध विकासकामांना आयुक्तांनी सकरात्मक प्रतिसाद देत महापालिका अर्थसंकल्पात भरघोस निधी दिला आहे. या पूर्वी मी त्यांच्याकडे निवेदनाद्वारे कामे सुचवून निधीची मागणी केली होती. तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर निधीसाठी पाठपुरावा केला. प्रभागाच्या जनहिताच्या आणि विकासाच्या कामासाठी दोघांनीही घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांचे आभार.

डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका
———————