Pune Municipal Corporation Employees | पुणे महापालिकेत नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना कामकाजाचे प्रशिक्षण बंधनकारक 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

Pune Municipal Corporation Employees | पुणे महापालिकेत नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना कामकाजाचे प्रशिक्षण बंधनकारक

– 23 ते 25 मे या कालावधीत होणार प्रशिक्षण

Pune Municipal Corporation Employees | पुणे महापालिका प्रशासनाने (Pune civic body) नुकतीच भरती प्रक्रिया (Pune Mahanagarpalika Bharti) राबवली होती. यामध्ये बऱ्याच लिपिक/टंकलेखक यांचा समावेश आहे. महापालिकेचे (PMC Pune) कामकाज गतिमान होण्यासाठी आणि नवीन कर्मचाऱ्यांना कामाचा आवाका येण्यासाठी या कर्मचाऱ्यांना महापालिका कामकाजाचे (PMC Working Systems) प्रशिक्षण बंधनकारक करण्यात आले आहे. 23 ते 25 मे या कालावधीत हे प्रशिक्षण होणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. (Pune Municipal Corporation Employees)

नुकतीच भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती

पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) सरळसेवेने लिपिक टंकलेखक या पदावर 181 कर्मचाऱ्यांची  नव्याने नियुक्ती करण्यात आलेली आहे. महापालिकेत विविध खात्यामध्ये (PMC Department’s) विविध प्रकारचे काम केले जाते. सेवकास महापालिकेतील कामकाजाचे पूर्ण ज्ञान असणे आवश्यक असून कामात गतिमानता येण्यासाठी सेवकांना प्रशिक्षण देणे ही महत्वाची बाब आहे. (PMC Pune News)

नवनियुक्त लिपिक टंकलेखक संवर्गातील सेवकांना महापालिकेची तोंड ओळख होणे आवश्यक असून रुजू झालेल्या सेवकांना मनपाच्या कामकाजासंबंधित विविध विषयांचे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.
या प्रशिक्षणाने प्रशासनाच्या कामकाजात गतिमानता येण्यासाठी अधिकारी/कर्मचा-यांना प्रशिक्षण व तांत्रिक ज्ञान देणेस स्थायी समिती यांच्याकडून मान्यता देण्यात आलेली आहे. दैनंदिन कामकाजात आवश्यक विषयांची निवड करुन सदर तीन दिवसांचे प्रशिक्षण दिनांक २३.०५.२०२३ ते दिनांक २५.०५.२०२३ पर्यंत श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे सकाळी
१०.३० ते संध्याकाळी ६.०० वा. या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation News)

| महापालिकेचे अधिकारी देणार प्रशिक्षण

महापालिकेचे अधिकारी विविध विषयावर या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतील. सहायक आयुक्त संदीप खलाटे (PMC Assistant commissioner Sandip Khalate) हे महापालिका आकृतिबंध, सेवक वेतन भत्ते, सेवापुस्तक तपासणी याबाबत प्रशिक्षण देतील. सिस्टिम मॅनेजर राहुल जगताप (System Manager Rahul Jagtap) हे महापालिका संगणक प्रणाली, ई टेंडर, महापालिकेचे ऍप, विविध ऑनलाईन सुविधा, सायबर सुरक्षा बाबत प्रशिक्षण देतील. कामगार अधिकारी नितीन केंजळे (Labour Officer Nitin Kenjale) हे महापालिका अधिनियम, रजा नियम तसेच वर्तणूक नियम याबाबत शिकवतील. मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर (Chief Labour Officer Shivaji Daundkar) हे सर्वसाधारण सभा कामकाज, महापालिका कामकाजाबाबतचे कायदे, महापालिका सेवानियम, घाणभत्ता, वारस प्रकरणे याबाबत प्रशिक्षण देतील. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने (Disaster Management Officer Ganesh Sonune) हे आपत्तीच्या काळात घेतल्या जाणाऱ्या काळजी विषयी प्रशिक्षण देतील. सहायक आरोग्य अधिकारी डॉ प्रल्हाद पाटील (Assistant Health Officer Dr Prahlad patil) हे आरोग्य व्यवस्थापन, ताणतणाव आणि वेळेचे व्यवस्थापन याबाबत शिकवतील. तर उपायुक्त सचिन इथापे (PMC Deputy commissioner Sachin Ithape) हे सेवा हमी अधिनियम, माहिती अधिकार अधिनियम, नागरिकांची सनद याबाबत प्रशिक्षण देतील. (PMC Pune Marathi News)
News Title | Pune Municipal Corporation Employees | Job training is mandatory for newly joined employees of Pune Municipal Corporation- Training will be held from 23rd to 25th May