Pune Rain | Pramod Nana Bhangire | तीव्र पावसामुळे पुणे शहरात झालेल्या पडझड व इतर नुकसानीबाबत तात्काळ मदत देण्याची शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांची मागणी 

Categories
Breaking News PMC Political social पुणे
Spread the love

Pune Rain | Pramod Nana Bhangire | तीव्र पावसामुळे पुणे शहरात झालेल्या पडझड व इतर नुकसानीबाबत तात्काळ मदत देण्याची शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांची मागणी

Pramod Nana Bhangire – (The Karbhari News Service) – तीव्र पावसामुळे पुणे शहरात झालेल्या पडझड व इतर नुकसानीबाबत तात्काळ मदत देण्याची मागणी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

भानगिरे यांच्या पत्रानुसार शहरात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे शहरातील विविध ठिकाणी रस्त्यांवरून पाणी वाहून रस्त्यांना नदीचे रूप आले आहे. नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. रस्त्यांवरच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. ते खड्डे रहदाऱ्यांना दिसत नसल्याने ते जीव धोक्यात टाकणारे ठरत आहेत.

भानगिरे यांनी पुढे म्हटले आहे कि, पुणे शहरातील विविध ठिकाणी ड्रेनेज पाईपलाईन फुटली आहे, झाडांची पडझड होत आहे. झाडे पडून काही लोक जखमी झाल्याच्या घटना देखील या दिवसात समोर आल्या आहेत. एकंदरीत या मुसळधार पावसामुळे पुणेकर नागरिकांच्या अडचणी वाढल्या असून या अडचणी तितक्याच धोकादायक ही ठरत आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्था ही या पावसामुळे आलेल्या अडचणींमुळे खोळंबली आहे. तरी पावसामुळे पुणे शहरावर ओढावलेल्या या समस्यांचे निवारण करण्यासाठी त्वरित आपल्या आपात्कालीन यंत्रणा व मदतकार्य कार्यान्वित करावे जेणेकरून शहरातील नागरिक सुटकेचा श्वास घेऊ शकतील.
|

हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत पारित नियंत्रण कक्षामध्ये काम करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध करून द्या  | भानगिरे

भानगिरे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी केली आहे कि, मागील काही दिवसांपासून पावसामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी देखील आहेत तरी
पावसाळ्याच्या कालावधीमध्ये हडपसर क्षेत्रीय कार्यालयाकडे पूर्णवेळ अधिकचा एक जेसीबी निय यावा, सेटिंग मशीन, टायगर मशीन पूर्ण वेळ उपलब्ध करून मिळाव्यात.  तसेच मुख्य खात्याकडे ड्रेनेज
लाईन देखभाल दुरुस्ती विभागाचे टेंडर असल्यामुळे त्यांचे इंजिनीयर आणि कंत्राटी कर्मचारी हे देखील हडपसर क्षेत्रीय कार्यालयात पूर्ण वेळ उपलब्ध असले पाहिजेत.
त्याचप्रमाणे हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाची हद्द मोठी असल्यामुळे व हडपसर क्षेत्रीय कार्यालयात नव्याने गावे समाविष्ट झालेली असून पूर्णवेळ दोन उपअभियंता आवश्यक आहेत. परंतु आपल्या कार्यालयाकडे एकही उपअभियंता नाही तरी आपल्या कार्यालयास पूर्ण वेळ दोन उपाभियंता त्वरित
मिळावा. तसेच हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयातून तीन कनिष्ठ अभियंत्यांची बांधकाम विभागात बदली झाली परंतु त्यांच्या जागी सेवक वर्ग विभागातून तीन अभियंता आले नाहीत.  त्यामुळे विकास कामांवर मोठा परिणाम होत असून नागरिकांच्या तक्रारी देखील वाढत आहेत. तरी आपण तीन कनिष्ठ अभियंता हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालयास देण्यात यावे. अशी मागणी भानगिरे यांनी केली आहे.
—–